Home » Youtuber : यूट्यूबर ते पाकिस्तानची हेर बनलेली ज्योती मल्होत्रा आहे कोण?

Youtuber : यूट्यूबर ते पाकिस्तानची हेर बनलेली ज्योती मल्होत्रा आहे कोण?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Youtuber
Share

आजच्या सोशल मीडियाच्या काळात असंख्य लोकं आपले सोशल मीडिया अकाऊंट ओपन करून त्यावर विविध व्हिडिओ शेअर करतात. यात खाण्याचे, विविध फिरण्याच्या ठिकाणांचे, माहितीपर असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यालाच व्हिडिओ ब्लॉगर म्हटले जाते. असे व्हिडिओ टाकणे म्हणजे उत्पनाचे साधन झाले आहे. या आधुनिक काळात सोशल मीडिया देखील करियरची आणि उत्पन्नाचे मोठे महत्वाचे साधन झाले आहे. या यूटुबरला देखील सेलेब्रिटी स्टेट्स मिळते आणि लोकांमध्ये ते प्रसिद्ध होतात. (Youtuber)

मात्र आता असे काही घडले आहे, ज्यामुळे आपल्याला या यूटुबरवर विश्वास ठेवणे आणि ते किती खरे आहे याबद्दल नक्कीच साशंकता निर्माण होऊ शकते. कारण आपल्या देशातील एक प्रसिद्ध यूटुबर चक्क पाकिस्तानची जासूस अर्थात हेर निघाली. ज्योती मल्होत्रा असे त्या यूटुबरचे नाव असून, ‘ट्रॅव्हल विथ जो’ असे तिच्या चॅनेलचे नाव आहे. हा मोठा आणि धक्कादायक खुलासा झाल्यानंतर ज्योतीला अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. हरियाणा राज्यातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला देशातील संवेदनशील माहिती पाकड्यांना पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिला १७ मे रोजी अटक केली. न्यायालयाने तिला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पाकिस्तान अधिकाऱ्यांनी ती संवेदनशील माहिती पुरवत होती आणि पाकसाठी हेरगिरी करत असल्याची माहिती समोर आली. (Marathi News)

======

हे देखील वाचा : Tourism : एक असा देश ज्याची लोकसंख्या आहे केवळ 800

=======

Youtuber

हरियाणातील हिसार येथील रहिवासी असलेली ज्योती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या तीन अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. त्या तिघांच्याही खूप जवळची होती. पाकिस्तान दूतावासात काम करणाऱ्या दानिशने ज्योतीची या अधिकाऱ्यांशी ओळख करुन दिली होती. लोकप्रिय ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्युबर ज्योती मल्होत्रा, जिचे ‘ट्रॅव्हल विथ जो’ हे यूट्यूब चॅनेल लाखो लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. (Marathi Latest News)

दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्ताच्या इफ्तार पार्टीत ती सहभागी झाल्याचे आणि पाकिस्तानी अधिकारी दानिश याच्यासोबत गुप्तगू करतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. दानिश हा पूर्वीपासूनच भारतीय गुप्तहेर संघटनांच्या रडारवर होता. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्याला १३ मे रोजीच ‘परसोना नॉन ग्राटा’ घोषीत करून देश सोडण्यास सांगितले. (Marathi Top News)

​​कोण आहे ज्योती मल्होत्रा ?
ज्योती मल्होत्रा ही हरियाणामधील ​​हिसारची रहिवासी आहे. ती​​ ३३ वर्षाची असून हिसारमधील अग्रसेन कॉलनीत राहते. तिने बीए पदवीचे शिक्षण पूर्ण केलं आहे. ज्योती मल्होत्रा अद्याप अविवाहित आहे. ती दिल्लीत राहते. हरीश कुमार मल्होत्रा असे ज्योतीच्या वडिलांच नाव ​​आहे. ते हरियाणा पॉवर डिस्कमचे निवृत्त अधिकारी आहे. ज्योती गुरुग्राममधील खासगी कंपनीत काम करत होती. मात्र कोरोना काळात तिची नोकरी गेली. त्यानंतर तिनं सोशल मीडियाच्या जगात पाऊल टाकलं आणि ब्लॉगिंग सुरू केलं. (Marathi Trending NEws)

Youtuber

सोशल मीडियावर ज्योती खूप सक्रिय होती. तिला तिच्या व्हिडिओंमुळे खूप लोकप्रियता मिळू लागली आणि ती पाहता पाहता सोशल मीडियाच्या जगात स्टार झाली. ज्योती मल्होत्राचे यूट्यूबवर ३.७७ लाखहून अधिक सबस्क्राइबर आहेत. तर फेसबुकवर तिचे ३.२१ लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर देखील १.३२ लाख फॉलोवर्स तिला फॉलो करतात. ज्योती मल्होत्रा काश्मीरला गेली होती. जानेवारी २०२५ मध्ये पहलगामला भेट दिली होती. तिनं सोशल मीडियावर सैन्यदलाचे फोटो देखील पोस्ट केले होते. ज्योतीने ‘देसी-इंडो-जो’ नावाने सुद्धा तिने कंटेट तयार केला आहे. ज्योतीनं पाकिस्तानला भेट देत अनेक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले आहेत. (Marathi Top News)

हिसार पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपावरून ज्योती मल्होत्राला तिच्या घरातून ताब्यात घेतलं. तिच्याविरुद्ध हिसार सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. २०२४ मध्ये ज्योतीने इफ्तार पार्टीचा एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिचे या कार्यक्रमाचे कौतुक केले होते. त्यात ती आणि दानिश यांच्यातील ओळख आणि संवाद स्पष्टपणे दिसत होता. यावरूनच तपास यंत्रणांनी ज्योतीवर लक्ष केंद्रित केले.

Youtuber

ज्योती मल्होत्रा २०२३ मध्ये प्रथमच एका शिष्टमंडळासह पाकिस्तानला गेली होती. यावेळीच तिची दानिशशी भेट झाली. भारतात परतल्यानंतरही ती त्याच्या संपर्कात होती. त्यानंतर ती दुसऱ्यांदा पाकिस्तानात गेली. या वेळी तिची ओळख अली अहसान या व्यक्तीशी झाली. पाकिस्तानात तिच्या राहण्याची आणि प्रवासाची जबाबदारी अलीवर होती. त्यानेच तिला शकीर आणि राणा शाहबाज या पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली.  इतकेच नाही तर पाकिस्तानमध्ये तिला व्हीआयपी ट्रेंटमेन्ट मिळायची. पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या मुलीपासून ते अनेक लष्करी अधिकाऱ्यांसोबत तिचे जवळचे संबंध पुढे आले. तर देशातंर्गत संवेदनशील माहिती तिने दिल्याचे पण तपासात समोर येत आहे. (Social News)

======

हे देखील वाचा : Beer : बिअरप्रेमींसाठी खुशखबर! २०० रुपयांची बिअर आता फक्त ५० रुपयांमध्ये

=======

 

दानिश कोण आहे?
२०२३ मध्ये ज्योती पाकिस्तानला गेली होती. तेव्हा ती व्हिसासाठी दिल्ली येथील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात पोहचली होती. तेव्हा तिची ओळख तेथील दानिश उर्फ एहसान-उर-रहीम याच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक झाली. दानिशच्या मदतीने ती पाकिस्तानात पोहचली. तिथे ती पाकिस्तानातील गुप्तहेरांच्या संपर्कात आली. त्यानंतर जेव्हा ती दुसऱ्यादा पाकिस्तानमध्ये गेली तेव्हा तिची अली अहसान आणि शाकिर उर्फ राणा शहबाज सारख्या एजंटशी ओळख झाली. (National TOp News )


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.