Home » Bhushan Gavai : महाराष्ट्राचे भूषण गवई बनले देशाचे ५२वे सरन्यायाधीश

Bhushan Gavai : महाराष्ट्राचे भूषण गवई बनले देशाचे ५२वे सरन्यायाधीश

by Jyotsna Kulkarni
0 comment
Bhushan Gavai
Share

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी मराठी सुपुत्राची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाला अधिकृत मान्यता दिली. न्यायमूर्ती भुषण रामकृष्ण गवई यांनी बुधवारी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ते भारताचे ५२वे सरन्यायाधीश बनले आहेत. १३ मे रोजी विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाले आणि त्यानंतर लगेच १४ मे रोजी न्यायमूर्ती गवई यांचा शपथविधी संपन्न झाला. (Bhushan Gavai)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या. गवई यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. न्या. गवई हे पहिले बौद्ध सरन्यायाधीश आणि २००७ मध्ये सरन्यायाधीशपद भूषवलेले के. जी. बालकृष्णन यांच्यानंतर दलित समाजातील दुसरे सरन्यायाधीश आहेत. न्यायमूर्ती गवई हे २३ नोव्हेंबरपर्यंत सरन्यायाधीश राहणार आहेत. त्यांच्या कार्यकाळात, सरन्यायाधीश गवई वक्फ प्रकरणासह अनेक महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी करतील. न्यायमूर्ती गवई हे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होईपर्यंत सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी सरन्यायाधीशपदावर राहतील. जाणून घ्या भूषण गवई यांच्या प्रवासाबद्दल. (Marathi News)

भूषण रामकृष्ण गवई यांचा प्रवास
न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. भूषण गवई हे दिवंगत खासदार रामकृष्ण गवई यांचे पुत्र आहेत. भूषण गवई यांनी १६ मार्च १९८५ रोजी वकिली सुरू केली. १९९० नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर भूषण गवई यांनी वकिली केली. २००७ ते २०१० पर्यंत मुख्य न्यायाधीश म्हणून काम करणाऱ्या न्यायमूर्ती के जी बालकृष्णन यांच्यानंतर बीआर गवई हे दलित समुदायातील दुसरे सर न्यायाधीश आहेत. (Marathi Latest News)

Bhushan Gavai

न्यायमूर्ती गवई यांचे वडील, न्यायमूर्ती रामकृष्ण सूर्यभान गवई हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे संस्थापक होते. ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होते आणि १९९८ मध्ये आरपीआय उमेदवार म्हणून अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. २००६ ते २०११ दरम्यान त्यांनी बिहार, सिक्कीम आणि केरळचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. (Marathi Trending News)

भूषण गवई १६ मार्च १९८५ रोजी बारमध्ये सामील झाले. त्यांनी सरकारी वकील म्हणून आणि नंतर महाराष्ट्र सरकारसाठी सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. १४ नोव्हेंबर २००३ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी १६ वर्षे तिथे काम केले. त्यांनी मुंबई येथील प्रधान खंडपीठ आणि नागपूर, औरंगाबाद आणि पणजी येथील खंडपीठांमध्ये विविध प्रकरणांची सुनावणी केली. २४ मे २०१९ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. (Top Stories)

=======

हे देखील वाचा : E-Passport : भारतात सुरु झाली ई-पासपोर्ट सेवा

RTO : महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्यात होणार नवीन आरटीओ ऑफिस

=======

सर्वोच्च न्यायालयाच्या Website मध्ये असलेल्या माहितीनुसार गेल्या सहा वर्षांत भूषण गवई हे जवळपास ७०० खंडपीठांचा भाग राहिले आहेत. ज्यांनी संवैधानिक आणि प्रशासकीय कायदा, दिवाणी, फौजदारी, व्यावसायिक वाद, मध्यस्थी, वीज कायदा, शिक्षण, पर्यावरण इत्यादी विविध विषयांवरील खटल्यांची सुनावणी केली. त्यांनी जवळजवळ ३०० निर्णय लिहिले आहेत, ज्यात कायद्याचे राज्य आणि नागरिकांच्या मूलभूत, मानवी आणि कायदेशीर हक्कांचे संरक्षण करणारे असंख्य संविधान खंडपीठाचे निकाल समाविष्ट आहेत. (Marathi Top News)

न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश पद भूषवणारे महाराष्ट्रातील दुसरे न्यायाधीश आहेत. यापूर्वी १९५० च्या दशकात न्यायमूर्ती एस. एम. सी. सिवत्सन हे मराठी मात्र मूळचे दक्षिण भारतीय सरन्यायाधीश होते. त्यानंतर गवई हे पूर्णपणे मराठी पार्श्वभूमीचे पहिले सरन्यायाधीश ठरणार आहेत. (Social NEws)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.