Home » Virat-Anushka : विराट-अनुष्काच्या हातात दिसली ‘इलेक्ट्रॉनिक जपमाळ’

Virat-Anushka : विराट-अनुष्काच्या हातात दिसली ‘इलेक्ट्रॉनिक जपमाळ’

by Jyotsna Kulkarni
0 comment
Virat-Anushka
Share

सध्याचे युग हे मॉडर्न, स्मार्ट आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सने भरलेलं आहे. दैनंदिन जीवनात लहानलहान बाबींपासून मोठमोठ्या अवघड वाटणाऱ्या गोष्टींपर्यंत सर्वच डिजिटल आणि स्मार्ट झाले आहे. आपल्या आयुष्यावर या सर्व गॅझेटचा मोठा प्रभाव असल्याचे आपल्याला दिसते. पूर्वी आपण जर पाहिले तर आपल्या आई, आजी देवाचे नामस्मरण करताना, देवाचा जप करताना जपमाळ वापरायच्या. मात्र इथं देखील जपमाळीची जागा डिजिटल अंगठीने घेतल्याचे चित्र आहे. सर्वच जग स्मार्ट होताना देव कसे मागे राहतील? मात्र आता अचानक हा इलेक्ट्रिक अंगठीचा, स्मार्ट जगाचा विषय कुठून आला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हो ना…? (Virat-Anushka)

झाले असे नुकतंच अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे स्वामी प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी वृंदावन इथे पोहचले होते. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट पत्नी अनुष्कासह प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात त्यांचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. यावेळचे या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघंही प्रेमानंद महाराजांसमोर बसून त्यांच्यकडून अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली. (Marathi Trending News)

Virat-Anushka

यातील एका व्हिडिओने सोशल मीडियावर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एका व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराट यांच्या बोटात एक अंगठी दिसत आहे. ही हटके अंगठी पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. विराट आणि अनुष्काच्या हातात यावेळी एक गुलाबी रंगाची इलेक्ट्रॉनिक अंगठी दिसली. ही गुलाबी अंगठी नेमकी कशासाठी आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. या भेटी दरम्यान अनुष्का आणि विराटचा अतिशय साधा लूक सगळ्यांनाच भावला. (Top Marathi News)

प्रेमानंद महाराजांच्या भेटीदरम्यान अनुष्काने काळा-पांढरा साधा सूट घातला होता, तर विराटने हलक्या हिरव्या रंगाचा शर्ट आणि गडद हिरव्या रंगाची पँट घातली होती. दोघांच्याही चेहऱ्यावर भेटीचा आनंद, शांतता आणि समाधान पहायला मिळाले. विराट आणि अनुष्का यांनी हातात इलेक्ट्रॉनिक अंगठी घेतली होती त्याचा वापर देवाचं नाव जपण्यासाठी केला जातो. आपण याला आपल्या सध्याभोळ्या भाषेत स्मार्ट जपमाळ देखील म्हणू शकतो. (Latest Marathi News)

Virat-Anushka

या दोघांनी त्यांच्या हातातील बोटात डिजिटल टॅली इलेक्ट्रॉनिक फिंगर क्लिकर रिंग घातली होती. विराटने जेव्हा प्रेमानंद महाराजांसमोर हात जोडले, तेव्हा त्याच्या बोटात ही इलेक्ट्रॉनिंग अंगठी स्पष्ट दिसून आली. परंतु यावेळी अनुष्काने तिच्या बोटातील अंगठी लपवण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओमध्ये विराटच्या हातात गुलाबी रंगाची ही अंगठी सहज पहायला मिळतेय. देवाचं नाव किती वेळा जपलं गेलं, यासाठी ही डिजिटल टॅली काऊंटर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक टॅली काऊंटर रिंग वापरली जाते. जपमाळेऐवजी अनेकजण आजकाल या रिंगचा वापर करताना दिसतात. या रिंगची किंमत नक्की हे जरी समजू शकले नसले तरी ऑनलाइन अशा रिंग १०० रुपयांपासून पुढे आपल्याला पाहायला मिळतात. (Social News)

दरम्यान प्रेमानंद महाराजच्या भेटीला विराट आणि अनुष्का पहिल्यांदाच आले असे नाही. याआधी देखील ते २०२३ साली महाराजांच्या भेटीला आले होते. त्यानंतर एकदा ते त्यांची मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांना घेऊन महाराजांच्या भेटीला आले होते. आता विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते पुन्हा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात भेटीसाठी आले होते. (Top Stories)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.