Skin Care Tips : ऊन, धूळ – माती आणि प्रदूषण हे तीन मुख्य कारण आहेत ज्यामुळे तुमची त्वचा कमी वेळातच डल दिसू लागते. तुम्ही चेहऱ्यावर कितीही महागडे प्रोडक्ट्स लावले तरीही कालांतराने त्वचसंबधित समस्या होऊ शकतात. पण डाएटकडे लक्ष दिल्यास त्वचा चिरतरुण राहू शकते. खरंतर, वाढत्या वयासह चेहऱ्यावर सुरकुत्या आणि पिग्मेंटेशनची समस्या होणे सामान्य बाब आहे. पण वेळोवेळी योग्य डाएट फॉलो केल्यास ही समस्या दूर राहू शकते. जाणून घेऊया कोणत्या ज्यूसचे सेवन केल्याने त्वचेचे आरोग्य राखले जाईल याबद्दल सविस्तर…
ग्रीन टी प्या
ग्रीन टी हे एक उत्तम अँटी एजिंग ड्रिंक आहे, यामधील अँटीऑक्सिडेंट्स तुमच्या त्वचेला नेचुरल ग्लो देण्यास मदद करते आणि याचे रोज सेवन केल्यास तुमच्या त्वचेला ग्लो येतो.
डाळिंबाचा ज्यूस
डाळिंबा मध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टिज असतात जे त्वचे साठी खूप फायदेशीर असतात. याचा रोज सेवन केल्यास तुम्हाला हे तीव्र उन्हाच्या नुकसानपासून देखील आराम देते आणि शरीरातलं कॉलेजन वडवते जे त्वचा मऊ आणि सॉफ्ट करण्यास मदत करते.
बीटाचा ज्यूस
चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर आपल्या डाइटमध्ये बीटाचा ज्यूस प्या. बीटरूटमध्ये असलेली पोषण तत्त्वे जसे व्हिटमिन सी, लोह, मॅग्नेशियममुळे चेहऱ्याला ग्लो येण्याल मदत होईल.
हळदीचे दूध
हळदी मध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटीऑक्सिडेंट्स गुण असतात, जे त्वचेचा रंग उजळण्यास मदत करते.याशिवाय त्वचेसंबंधित काही समस्याही दूर होण्यास मदत होते. यामुळे रात्रीच्या वेळेस हळदीचे दूध पिऊ शकता.(Skin Care Tips)
======================================================================================================
हेही वाचा :
Juice : लोकप्रिय ABC ज्यूस म्हणजे काय? या ज्यूसचे फायदे कोणते?
शरीरातील व्हिटॅमिन K च्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती होईल प्रभावित, करा हे उपाय
=======================================================================================================
टोमॅटोचा ज्यूस
टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स असल्यामुळे याचा ज्यूस किंवा डाएटमध्ये समावेश केल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात. जसे की, सुरकुत्या, डाग आणि बारीक रेषा या समस्यांपासून मुक्ती मिळते आणि त्वचा अधिक तरुण व तजेलदार दिसते.