Home » चेहऱ्याला दररोज दही लावण्याचे फायदे-नुकसान घ्या जाणून

चेहऱ्याला दररोज दही लावण्याचे फायदे-नुकसान घ्या जाणून

by Team Gajawaja
0 comment
Curd
Share

Dahi Benefits for Skin : वाढत्या प्रदुषणामुळे स्किन टोनमध्ये बदल होऊ लागतो. याशिवाय बिघडेलली लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याचा परिणाम आरोग्यासह त्वचेवरही होतो. अशातच त्वचा डल, कोरडी होऊ लागते. या स्थितीपासून दूर राहण्यासाठी बहुतांशजण वेगवेगळे उपाय करतात. जसे की, दररोज त्वचा एक्सफोलिएट करणे, डीप क्लिनिंग किंवा मॉइश्चराइजिंग करणे अशा गोष्टींचा समावेश आहे. पण काहीजण त्वचेला मऊसरपणा आणि ग्लो येण्यासाठी दही लावतात. दही त्वचेसाठी उत्तम मानले जाते. पण दररोज त्वचेला दही लावल्याने कोणते फायदे आणि नुकसान होतात हे जाणून घेऊया.

चेहऱ्यावर दररोज दही लावू शकतो?
चेहऱ्यावर दही लावणे उत्तम मानले जाते. यामुळे त्वचा एक्सफोलिएट होण्यास स्वच्छ होते. सध्याच्या बिघडलेल्या लाइफस्टाइल आणि त्वचेची योग्य काळजी न घेतल्याने त्वचेवर परिणाम होऊ शकतो. अशातच चेहऱ्याची चमक दूर होऊ शकते. दररोज त्वचेवर दही लावून त्वचा स्वच्छ होऊ शकते असे एक्सपर्ट्स सांगतात. पण यावेळी अशा गोष्टीची काळजी घ्यावी की, तुमचा स्किन टाइप ओखळावा. दररोज दही त्वचेला लावल्याने अॅलर्जीची समस्या होऊ शकते.

Curd

दही लावण्याचे फायदे
त्वचा एक्सफोलिएट होते
दह्याचा वापर करुन त्वचेला मसाज करू शकता. यामुळे त्वचेवरील घाण दूर होत त्वचा डीप क्लिन होते. याशिवाय त्वचा एक्सफोलिएट होण्यासह स्किन टोन सुधारला जातो.

त्वचा मॉइश्चराइज होते
चेहऱ्याला दररोज दही लावल्याने त्वचा मॉइश्चराइज राहते. काहीवेळेस त्वचेवर चुकीचे प्रोडक्ट लावल्याने त्वचा खेचल्यासारखी होते. यामुळे त्वचेमधील ओलसरपणाही कमी होऊ शकतो. जर दररोज दही त्वचेला लावल्यास त्वचा मऊसर होऊ शकते.

======================================================================================================

हेही वाचा : 

Multani Mati : मुलतान मातीचे सौंदर्यवर्धक फायदे

Mother’s Day : मदर्स डे चा इतिहास आणि त्याची सुरूवात कशी झाली?

=======================================================================================================

सूदिंग इफेक्ट मिळतो
दही थंड असल्याने त्वचेला लावल्यास त्वचेला सूदिंग इफेक्ट मिळत. त्वचेवर खाजेची समस्या आणि काही प्रकारच्या त्वचेसंबधित समस्या दह्यामुळे दूर होऊ शकतात. (Dahi Benefits for Skin)

चेहऱ्यावर दही लावण्याचे नुकसान
-त्वचा संवेदनशील असल्यास दररोज दही लावू नये
-चुकीच्या पद्धतीने दही त्वचेला लावल्यास त्वचेसंबंधित समस्या होऊ शकतात
-दह्याची अ‍ॅलर्जी असल्यास याचा फेसपॅक लावू नये
-दह्याचा अत्याधिक प्रमाणात वापर करत असाल तर त्वचा कोरडी होऊ शकते


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.