Ulcer Remedies : सतत तोंड येण्यामागील समस्येमागे काही कारणे असू शकतात. सर्वसामान्यपणे, तोंड आल्यानंतर एक-दोन आठवड्यात ठिक होते. तोंड येण्याची समस्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. या समस्येमध्ये पांढरी, लाल आणि पिवळ्या रंगाची त्वचा होते. जर सतत तोंड येण्याची समस्या उद्भवत असल्यास हा एक गंभीर आजार असू शकतो. या समस्येकडे वेळीच लक्ष द्यावे. यावर उपाय काय जाणून घेऊया.
तोंड आल्यानंतर तोंडात लहान-लहान जखमा होतात. ओठ, जीभ किंवा घश्यामध्ये तोंड येण्याची समस्या उद्भवू शकते. सर्वसामान्यपणे तोंड येण्याची समस्या पोटात गडबड झाल्यास होऊ शकते. याशिवाय व्हायरल आणि व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेही तोंड येण्याची समस्या होऊ शकते. तोंड आल्यानंतर खूप दुखते. ही समस्या एक-दोन आठवड्यामध्ये ठीक न झाल्यास स्थिती गंभीर होऊ शकते. ही स्थिती माऊथ कॅन्सरचे संकेत असू शकतात.

Mouth Ulcer
या कारणास्तव तोंड येते
तोंड येण्यामागील प्रमुख कारणे म्हणजे तणाव, व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता, लोहाची कमतरता आणि व्हायरस. तोंड येण्याची समस्या व्हायरस, ऑटोइम्यून आजार किंवा पोटासंबंधित समस्यांमुळेही होऊ शकते. काहीवेळेस तोंड येण्याच्या समस्येत भयंकर त्रास होऊ शकतो. याचे काही प्रकार असतात. ज्यामध्ये एफ्थस अल्सर, ओरल लाइकेन प्लेनस, ल्यूकोप्लाकिया, एरिथ्रोप्लाकिया, ओरल थ्रश आणि ओरल कॅन्सर. तर तोंडात अल्सर असल्यास तीन आठवड्यानंतरही बरा न झाल्यास डॉक्टरांची संपर्क साधा. (Ulcer Remedies)
===================================================================================================
हेही वाचा :
डिमेंशियाची समस्या अनुवांशित असते का? घ्या जाणून
Ice Apple : रानमेवा असलेल्या ताडगोळा खाण्याचे लाभ
=======================================================================================================
असा करा बचाव
तोंड येण्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तोंडाची स्वच्छता करा. यासाठी दिवसातून दोनदा ब्रश करा. अत्याधिक तळलेले, मसालेदार पदार्थ खाऊ नका. आहारामध्ये फळ, भाज्या, दूध आणि दह्याचे सेवन करा. तंबाखूचे सेवन करणे टाळा. तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. यासाठी योगाभ्यास आणि मेडिटेशन करा. वारंवार तोंड येण्याची समस्या उद्भवत असल्यास डॉक्टरांना भेटा.