संपूर्ण जगाला जगण्याचा योग्य मार्ग शिकवणारे गौतम बुद्ध गौतम बुद्ध म्हणजे सर्वच मानव जातीचे दैवत. गौतम बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक होते. त्यांनी त्यांचे राजसी आणि सुखसोयींनी परिपूर्ण जीवन त्याग करत ज्ञानप्राप्ती आणि समाजकल्याणाचा मार्ग निवडला. आज याच गौतम बुद्धांचा जन्मदिन आहे. बौद्ध धर्मियांसाठी अत्यंत महत्वाचा असा सण म्हणजे ‘बुद्ध पौर्णिमा’ भगवान गौतम बुद्धांचा जन्म दिवस म्हणून हा दिन मोठ्या उत्साहात बौद्धधर्मीय साजरा करतात. (Buddha Purnima)
भगवान बुद्धांचा जन्म इ.स.पूर्व ५६३ मध्ये भारताच्या शेजारीच असलेल्या दक्षिण नेपाळच्या तराई प्रदेशातील लुंबिनीच्या बागेत झाला. ही तारीख वैशाख महिन्यातील पौर्णिमा होती. म्हणून दरवर्षी गौतम बुद्धांचा जन्मदिवस ‘बुद्ध पौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. भगवान बौद्ध विष्णू धर्माचे संस्थापक होते आणि त्यांना विष्णूचा नववा अवतार मानले जाते. गौतम बुद्ध हे राजघराण्यातील होते. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी झाला. त्यांनी या बाळाचे नाव सिद्धार्थ ठेवले. मात्र दुर्दैवाने त्यांच्या जन्मांतर लगेच आठव्या दिवशी त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. पुढे त्यांचा संभाळ त्यांची मावशी आणि सावत्र आई गौतमी यांनी केला. (Marathi Top News)
राजघराण्यात जन्म झाल्यामुळे सिद्धार्थ यांना दु:ख माहीतच नव्हते. यथावकाश त्यांचे शिक्षण झाले. योग्य वयात राजकुमारी यशोधरासोबत त्यांचा विवाह झाला आणि त्यांना राहुल नावाचा एक मुलगा देखील झाला. सर्व सुरळीत सुरु होते. पण एकदा फेरफटका मारताना त्यांना जगातील वेगवेगळ्या दु:खांचा अनुभव आला. हे पाहून त्यांनी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी संसाराचा त्याग केला आणि ते तपस्वी झाले. गौतम बुद्ध यांनी २९ वर्ष घरामध्ये राहून त्यानंतर गृह त्याग केला. जगातील दु:ख निवारण्यासाठी त्यांचे मूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली आणि त्यांना ते मूळ सापडले त्यांनी सत्य शोधून काढले. ज्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली तो दिवस हा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. (Marathi Latest NEws)
गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली गौतम बुद्ध ध्यानस्थ बसले असतान, वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे तर ती उपाधी आहे. याचा अर्थ ज्ञानाची अवस्था असा होतो. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधी वृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात. (Marathi Trending News)
भगवान बुद्धाच्या जीवन काळातील त्यांचा ‘जन्म’, त्यांची ‘ज्ञानप्राप्ती’ आणि त्यांचं ‘महापरिनिर्वाण’ या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला झाल्यामुळं या पौर्णिमेला ‘बुद्ध पौर्णिमा’ असं म्हटलं जातं. बुद्ध धर्मामध्ये हा दिवस म्हणजे अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो. गौतम बुद्धांचे अनुयायी हे संपूर्ण जगात पसरलेले आहे. भारतासोबतच बौद्ध धर्मांचे अनुयायी जगभरात आहेत. चीन, जपान, कंबोडिया, मलेशिया,नेपाळ, व्हिएतनाम, थायलंड, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका अशा तब्बल १८० देशांमध्ये गौतम बुद्धांचे अनुयायी आहेत. (Social NEws)
भारतात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांच्या अस्थी दर्शनासाठी बाहेर काढल्या जातात. त्यांच्या दर्शनसाठी अलोट गर्दी असते. त्या अस्थीचे दर्शन घेऊन लोकं प्रार्थना करतात. हिव्य गौतम बुद्धांशी संबंधित ठिकाणांना भेट दिली जाते. लुम्बिनी, सारनाथ,गया, कुशीनगर, दीक्षाभूमी अशा पवित्र स्थळांनाही या दिवशी भेट दिली जाते. गौतम बुद्धांच्या शिकवणीचे स्मरण केले जाते. त्यांची शिकवण आचरणात आणायचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. (Top Stories)
=======
हे देखील वाचा : India : भारत-पाकमध्ये शस्त्रसंधी, जाणून घ्या शस्त्रसंधी म्हणजे काय?
=======
बुद्ध पौर्णिमेला बौद्ध घरांमध्ये दिवे लावले जातात. घर फुलांनी सजवले जाते. या दिवशी बोधिवृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी मासांहार हा वर्ज्य असतो. गरिबांना भोजन आणि वस्तूंचे दान केले जाते. बुद्ध मंदिरामध्ये जाऊन अगरबत्या लावल्या जातात आणि मूर्तीवर फळ आणि फुलं चढवली जातात. २ मे १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतात पहिल्यांदाच ‘बुद्ध जयंती’ दिल्ली येथे सार्वजनिक रूपात साजरी करण्यात आली होती. तेव्हापासूनच बुद्ध जयंती साजरी करण्यास सुरुवात झाली होती.