पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्लाबोल केला. यात पाकमधल्या ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यापासून ते पाकिस्तानची रडार सिस्टिम नेस्तनाबूत करण्यापर्यंत अनेक घटना या दरम्यान घडल्या. यावेळी विशेष म्हणजे भारताच्या तिन्ही दलांनी म्हणजेच इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स यांनी एकत्रितपणे शत्रूवर अशाप्रकारे हल्ला केला की त्यावर जगभरात चर्चा सुरु झाली. ऑपरेशन सिंदूरचं यश हे या तिन्ही सैन्य दल प्रमुखांच्या अचूक नियोजन आणि मजबूत नेतृत्वामुळे आहे. पण हे प्रमुख नक्की कोण आहेत आणि त्यांच्यात एक खास connection आहे ते नेमकं काय ? जाणून घेऊ. (Operation Sindoor)
सध्या सुरु असलेल्या operation सिंदूरची रणनीती आखली होती आपल्या तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी ! हे सैन्यप्रमुख म्हणजेच आपले तीन योद्धे जनरल उपेंद्र द्विवेदी, Admiral दिनेश कुमार त्रिपाठी आणि एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग ! भारतीय सैन्याच्या इतिहासात कदाचित हे पहिल्यांदाच घडल असेल की तिन्ही सैन्याचे प्रमुख हे बॅचमेट असतील. कारण हे तिन्ही प्रमुख एनडीएच्या १९८४ च्या बॅचचे पासआउट आहेत. त्यात हे तिघेही एनडीएमध्ये बॅचमेट होते. आता आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ … (Operation Sindoor)
मध्य प्रदेशच्या रीवामध्ये 1 जुलै 1964 ला जन्मलेले उपेंद्र द्विवेदी सैनिक स्कूलमध्ये दिनेश त्रिपाठी यांच्यासोबत शिकले. जे सध्या इंडियन नेव्ही Admiral आहेत. उपेंद्र द्विवेदी यांनी एनडीएत ब्लू अवॉर्ड आणि डेहराडूनच्या IMA मध्ये गोल्ड मेडल पटकावलं. 1984 मध्ये जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या 18व्या बटालियनमध्ये रुजू झाल्यापासून त्यांनी काश्मीर, LAC,आणि नॉर्थ इस्टमध्ये दहशतवादविरोधी कारवायांमध्ये मोठी भूमिका बजावली. त्यांची ३० जून २०२४ रोजी इंडियन आर्मी जनरल म्हणून नियुक्ती झाली.
दुसरे नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी यांचा जन्म १५ मे १९६४ रोजी उत्तर प्रदेशमध्ये झाला. गावातल्याच एका सरकारी शाळेत त्यांनी पाचवीपर्यंत शिक्षण घेतलं, त्यानंतर १९७३ मध्ये सैनिक स्कूल रीवामध्ये प्रवेश घेतला, त्यानंतर, त्यांनी एनडीएमधून ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर इंडियन नेव्हल अकादमी इथून ट्रेनिंग घेतली. त्रिपाठी यांनी डीएसएससी वेलिंग्टन येथे स्टाफ कोर्समध्ये मेडल जिंकल आणि न्यूपोर्ट येथील यूएस नेव्हल वॉर कॉलेजमध्येही प्रशिक्षण घेतल. त्यांनी पश्चिम नौदल कमांडचं फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ हे पदही भूषवल आहे. तर २०२३ -२४ दरम्यान नेव्हीचे व्हाईस admiral म्हणून त्यांनी नौदल ऑपरेशन्स आणि धोरण ठरवण्यातही भूमिका बजावली आहे. यानंतर ३० मे २०२४ रोजी दिनेश कुमार त्रिपाठी यांनी नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. (Operation Sindoor)
===============
हे देखील वाचा : Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला धडकी!
===============
तिसरे आपले एअर मार्शल अमर प्रीत सिंग, त्यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९६४ ला झाला. अमर प्रीत सिंग यांनीही एनडीए मधून आपल शिक्षण पूर्ण केलं. एनडीएत ते लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी आणि नौदलप्रमुख दिनेश त्रिपाठी यांच्यासोबतचे बॅचमेट होते. याशिवाय, त्यांनी वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि दिल्लीतल्या नॅशनल डिफेन्स कॉलेज येथून ट्रेनिंग घेतली आहे. एअर मार्शल सिंग हे एक अनुभवी लढाऊ पायलट आहेत. ज्यांनी मिग-२१, मिग-२९ आणि सुखोई-३० एमकेआय अशी लढाऊ विमाने उडवली आहेत. ते फ्लाइंग इन्स्ट्रक्टर आणि टेस्ट पायलट देखील राहिले आहेत. दरम्यान ३० सप्टेंबर २०२४ रोजी, एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. (Operation Sindoor)
आता तुम्ही नीट लक्ष दिलं असेल, तर या तिन्ही सुरक्षा दलांच्या प्रमुखांची प्रमुख म्हणून नियुक्ती ३० तारखेलाच झाली आहे. हा एक योगायोग आहे. या तिन्ही धडाकेबाज सैन्य अधिकाऱ्यांनी , NDA batchmates नी मिळून ऑपरेशन सिंदूर ची स्क्रिप्ट लिहिली आणि ती यशस्वीपणे execute केली. त्यांच्याच नेतृत्वात आपल्या डिफेन्स फोर्सेस निर्भीडपणे भारताचं रक्षण करतायेत.