पाच वर्षापूर्वीचा कोरोनाचा काळ आठवतो का ? त्याकाळात अनेक भविष्यवेत्ते पुढे आले होते. सोशल मिडियावर कोरोनासंदर्भातील भविष्यवाणी असणारे अनेक व्हिडिओ लोकप्रिय होत होते. अशावेळी अनेक भविष्यवेत्ते कोरोनाचा काळ कधी संपणार यासंदर्भात सांगत होते. या सर्वात एक चौदा वर्षाचा मुलगा, कोरोना संदर्भात शास्त्रोक्त दाखले देत भविष्यवाणी करत होता. या मुलानं कोरोनाचा पीक पॉईंट काय असेल हे पहिल्यांदा सांगितले. तसेच कोरोना संपल्यासारखा वाटल्यावर पुन्हा त्याचे संक्रमण वाढेल असेही सांगितले होते. तेव्हा या चौदा वर्षाच्या मुलावर टीका करत, त्याच्या वयाप्रमाणे त्याचा अभ्यासही कमी असल्याचा उल्लेखही काहींनी केला होता. (Abhijna Anand)
मात्र त्यानंतर या मुलांनं सांगितलेली भविष्यवाणी तंतोतंत खरी झाली, आणि हा लहान मुलगा अभ्यासू ज्योतिषी असल्याचे मान्य करण्यात आले. हा चौदा वर्षाचा मुलगा आता वीस वर्षाचा झाला आहे, आणि पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. अभिज्ञ आनंद नाव असलेल्या या मुलानं काही दिवसापूर्वीच थायलंड आणि म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाबाबत भविष्यवाणी केली होती. अभिज्ञने म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपासंदर्भात तीन आठवडे आधीच भविष्यवाणी करत मोठा विध्वंस होण्याची शक्यताही वर्तवली होती.
म्यानमार आणि थायलंडमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या मोठ्या भूकंपानंतर या देशांमध्ये आणखी तीन मोठे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपानं या देशांमध्ये मोठा विध्वंस झाला आहे. इमारतीच्या इमारती कोसळल्या असून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप जखमी आणि मृतांचा निश्चित आकडा आला नसला तरी मोठी मनुष्यहानी झाल्याचे स्पष्ट आहे. कारण या भूकंपाचे तीव्रताच एवढी होती. आता या भूकंपानंतर यासंदर्भात भारतीय ज्योतिषी अभिज्ञ आनंदची भविष्यवाणी व्हायरल झाली आहे. अभिज्ञने या भूकंपाची सूचना तीन आठवडे आधीच दिली होती. 1 मार्च रोजी त्याच्या यूट्यूब चॅनलवर यासंदर्भात एक व्हिडिओ अभिज्ञने अपलोड केला आहे. यात पुढील काही आठवड्यामध्ये एक मोठा भूकंप होणार असल्याचे त्यांन स्पष्ट केलं होतं. त्याचा हाच व्हिडिओ या भूकंपानंतर व्हायरल होत असून आधुनिक तंत्रज्ञानापेक्षा भारतीय ज्योतिषशास्त्र अधिक प्रभावी असल्याचे सांगण्यात येत आहे. (Abhijna Anand)
20 वर्षाचा अभिज्ञ वयाच्या 11 व्या वर्षापासून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहे. तो मुळचा कर्नाटक राज्यातील म्हैसूरचा रहिवासी आहे. प्रचंड आकलन क्षमता असलेला अभिज्ञ वयाच्या 7 व्या वर्षी चर्चेत आला होता. या सातव्या वर्षात त्यानं संपूर्ण भगवद्गीता तोंडपाठ केली होती. त्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला आणि हा अभिज्ञ लोकप्रिय ठरला. अभिज्ञने लहानपणापासूनच संस्कृतचा अभ्यास केला असून आता तो संस्कृतमधील ग्रंथांचा अर्थ सांगतो. त्याच्या आईची प्रेरणा यामागे असून संस्कृतचे महत्त्व सांगणारे आणि सुलभपणे संस्कृत शिकवणारे त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर लोकप्रिय आहेत. वयाच्या सातव्या वर्षापासून अभिज्ञ भारतातील प्राचीन मंदिरांना भेट देऊन तिथला इतिहास जाणून घेत आहे.
================
हे देखील वाचा : Vladimir Putin : पुतिन यांच्या ताफ्यातील अलिशान लिमोझिन गाडीमध्ये स्फोट
================
य़ातूनच त्याला भविष्यशास्त्र शिकण्याची ओढ लागली. अभिज्ञच्या मते त्याला यासाठी आईकडून प्रोत्साहन मिळालेच, पण मंदिरातील भेटी दरम्यान देवाकडूनही आशीर्वाद मिळाल्याचे त्यांने सांगितले आहे. अभिज्ञ भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे. भगवान श्रीकृष्णानेच त्याला भारतीय धर्मशास्त्राचा आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्याबाबत मार्गदर्शन केल्याचे तो सांगतो. आता तो संस्कृत पंडित झाला असून त्याच्या प्रज्ञा ज्योतिष संस्थेद्वारे सध्या 1200 मुलांना तो संस्कृत आणि धर्मग्रंथाचे शिक्षण देत आहे. यात 150 संशोधकांचा समावेशही आहे. प्रज्ञावान असलेल्या अभिज्ञने अवघ्या 12 व्या वर्षांत वास्तुशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. त्याबाबतही तो आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. (Abhijna Anand)
अभिज्ञने आत्तापर्यंत अनेक भविष्यवाणी केल्या असून त्या ख-या झाल्या आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता येणार ही त्याचीच भविष्यवाणी होती. याशिवाय अभिज्ञची पहिली गाजलेली भविष्यवाणी ही कोरोनाबाबतची होती. त्यानंतर 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्धाबाबतही अभिज्ञने भविष्यवाणी केली होती. तसेच इस्रायलमध्ये झालेल्या हमासच्या हल्ल्याबाबतही त्याने आपल्या भविष्यवाणीतून इशारा दिला होता. गेल्यावर्षी बंगलामध्ये झालेल्या दंगलीबाबतही अभिज्ञने आधीच सांगून ठेवले होते. आता थायलंडमधील भूकंपानंतर पुन्हा अभिज्ञ चर्चेत आला आहे.
सई बने