अनदर राउंड… अनदर राउंड… अनदर राउंड… दारू ढोसून शंभरच्या स्पीडने गाडी चालवत एका महिलेला उडवल्यानंतर तो पुन्हा आणखी एक गाडीचा राउंड मागत होता. आपल्यामुळे एका महिलेने जीव गमावलाय, याचा काहीही पत्ता त्याला नव्हता. शुद्धीत नसलेल्या त्या अमीर बाप की बिगडी औलादने पुन्हा मला गाडी चालवायची आहे, असा हट्ट रोडवरच सुरु ठेवलेला. मुळात गेल्या काही वर्षांमध्ये दारूच्या नशेत गाडी चालवत अपघात घडल्यामुळे कितीतरी लोकांचा मृत्यू झालाय. त्यातच नोएडामध्ये आणखी एक असा प्रकार घडलाय, जे बघूनच तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल. माणसाचं मरण माणूसच किती हलक्यात घेतो, हे तुम्हाला दिसून येईल, जे संपूर्ण नोएडा अपघात प्रकरण काय आहे, जाणून घेऊ. (Noida Case)
पुण्याचं पोर्शे प्रकरण तर तुम्हाला माहितीच असेल. वेदांत अग्रवाल या १७ वर्षांच्या धनाढ्य पोराने दारूच्या नशेत पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये त्याच्या पोर्शे या लक्झरी कारने दोघांना जोरदार धडक दिली, त्यात दोघांचाही मृत्यू झाला. त्याला अटक झाली… जेलमध्ये पिझ्झा, बर्गर खायला मिळाला. पुढे १५ तासात जामीन मंजूर झाली. जामीन कशी मंजूर झाली तर त्याने एक ३०० शब्दांचा निबंध लिहून दिला. यानंतर त्याच्या रक्ताच्या चाचणीत फेरफार झाली. त्यात काही अधिकाऱ्यांचं निलंबन झालं. त्याच्या बापाला अटक झाली यानंतर त्याच्या आजोबालाही अटक झाली. प्रकरण खूप गाजलं. नंतर थंडावलं… आता तो अल्पवयीन कुठे आहे, कोणाला काही माहित नाही. पण ज्या दोघांनी त्यात आपला जीव गमावला, त्याच्या घरी अजूनही शोक सुरु आहे.
हे प्रकरण झालं न झालं की, आणखी एक भयानक अपघात देहरादूनमध्ये घडला. दारूच्या नशेत सहा युथ दीडशेच्या स्पीडने गाडी चालवत होते. यानंतर ते एका ट्रकला ठोकले. हा अपघात इतका खतरनाक होता की, अक्षरश: तीन जणांची मुडकी तुटून तीस एक मीटर लांब पडली होती. यानंतर जे वरती सांगितलं ते अनदर राउंडवालं प्रकरण… त्या महिलेला उडवल्यानंतर तो तरुण अनदर राउंड ओरडत गाडीच्या बाहेर आला. यानंतर त्याला बाहेर पब्लिकने चांगलाच तुडवला. जेलमध्ये गेल्यानंतर तो म्हणतो की, मी दारू प्यायलो नव्हतो, आमची गाडी खड्ड्यात गेली, नंतर माझा balance बिघडला आणि हा अपघात घडला. पण कोणता माणूस एकाला जीवे मारून नंतर गाडीतून खाली उतरून जोरजोरात ओरडत आणखी एक राउंड मागतो, हा संशोधनाचा विषय आहे.(Noida Case)
आता नोएडाच्या प्रकरणावर येऊया. आलिशान गाडी असली की ती फुल स्पीडमध्येच चालवावी, हाच धनाढ्यांच्या पोरांचा फंडा असतो. पण त्यासाठी भारतातले रस्ते अशा गाड्यांसाठी आहेत का ? याचा विचार अनेक लोकं करत नाहीत…अपवाद हायवे ! ३० मार्चला संध्याकाळी नोएडामध्ये एका लँम्बोर्गिनी कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या तीन मजुरांना उडवलं. ५ करोडची गाडी १४० किलोमीटरच्या स्पीडने दिपक नावाचा अतिश्रीमंत तरुण चालवत होता. अपघातानंतर त्याची गाडी रस्त्याच्या कडेला वळली. यानंतर काही मजूर त्याच्या जवळ आले आणि विचारलं “क्या भाई, स्टंट ज्यादा सीख लिये हो ?” यानंतर तो म्हणाला, “तुमको पता हे यहाँ कितने लोग मर गए ?” असाही प्रश्न त्या मजुराने विचारला.(Noida Case)
================
हे देखील वाचा : Blue City : तुम्हाला माहित आहे का…? भारतातील कोणत्या शहराला ”ब्लू सिटी” म्हटले जाते?
================
यानंतर ड्राईव्ह करणाऱ्या दीपकने अगदी Casually विचारलं, ‘कोई मर गया है क्या इधर ? हे त्याने इतक्या हलक्याने विचारलं की, अपघात घडलाच नाही किंवा कोणतीतरी सुपरपावर त्याच्या मागे होती. सुदैवाने कोणाचा जीव गेला नाही, पण दोन मजुरांचे पाय Fracture झाले. हा फोटो तुम्ही पाहू शकता. पोलिसांनी तक्रार दाखल केली. पण इथे हाय प्रोफाईल माणसांनी कोणाला उडवलं, कोणाचा जीव घेतला, तरी फेरफार करून कसंतरी त्याला सोडवायला पूर्ण यंत्रणा कामाला लागते. जखमी झाले तर कोणी अशा केसेस सिरीयसली घेणारच नाहीत. काही सोशल मिडीया युजर्सचं म्हणणं आहे की, तो नशेत नव्हता, त्यात कोणाचा जीव गेला नाही आणि दुसरं म्हणजे त्याने Panic होऊन कोई मर गया क्या ? असं विचारलं. मग इथे जीव जाण आणि तो नशेत असण महत्त्वाचं आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो. प्रश्न अलिशान गाडीची रेस लावण, त्या स्पीडने चालवण हा आहे. त्यामुळे भारतात भविष्यात असे कितीतरी प्रकरण घडत राहणार, लोकं दोन दिवस त्यावर चर्चा करतील, पुन्हा विसरतील. पण याला आळा बसवण्यासाठी सरकार काही कडक कायदे काढतंय, हा हेसुद्धा तितकच महत्त्वाच आहे.