आपल्या देशामध्ये नानाविध प्रकारची असंख्य फळं मिळतात. सर्वच एकापेक्षा एक गोड आणि आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असतात. आता तर परदेशी फळं देखील खूपच सहज आपल्याकडे मिळतात. प्रत्येक फळं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायक आणि फायदेशीर असते. काही फळं वर्षभर मिळतात तर काही सिझनल असतात. (Black Grapes)
अशातच नवीन वर्षाची सुरुवात झाली की, लगेच बाजारात सगळीकडे कमी जास्त प्रमाणात द्राक्ष दिसायला लागतात. टपोरी, गोड, रसाळ द्राक्ष आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. हिरवी, काळी सर्वच द्राक्ष आपल्याला बाजारात पहिल्या पहिल्या घ्यावीशी वाटतात. द्राक्ष आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सगळ्यांनाच आंबट गोड चवीची द्राक्ष आवडतात आणि सगळे या द्राक्षांची वर्षभर वाट पाहत असतात. मात्र तुम्हाला माहित आहे का जिभेची चव वाढवणारे हे द्राक्ष आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील लाभदायक आहे. खासकरून काळी द्राक्ष (Black Grapes) खाल्ली तर त्याचे अनेक उत्तम परिणाम आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर दिसून येतात. (Black Grapes Benefits)
– काळी द्राक्ष व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. या द्राक्षांचे सेवन केल्याने आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते. ज्यामुळे आपल्याला अनेक रोग आणि संक्रमणांपासून दूर राहते. (Health Care Tips)
– मधुमेह असलेल्या लोकांनी तर काळी द्राक्षे खाणे फायदेशीर ठरते. काळ्या द्राक्षांमध्ये मधुमेहविरोधी घटक असतात, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.
– काळ्या द्राक्षांतील रेसवटॉल अल्झायमर रोगाची वाढ कमी करण्यास मदत करू शकते. तसंच स्मृती आणि मेंदूचे कार्य सुधारते. (Top Stories)
– यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढण्यासाठी आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असल्याचं म्हटलं जातं.
– काळी द्राक्षे हाडे मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. यामध्ये असलेले रेस्वेराट्रोल नावाचे रसायन हाडांसाठी फायदेशीर आहे, ज्यामुळे हाडांची घनता वाढण्यास मदत होते. यासोबतच काळ्या द्राक्षांमध्ये हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त असलेले कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. (Latest Marathi News)
– शरीरात रक्तप्रवाह नीट होत नसेल तर काळे द्राक्षे फायदेशीर ठरतात. यांच्या सेवनाने शरीरातील रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते. काळे द्राक्षे महिलांच्या निरोगी आरोग्याकरता गरजेचे आहेत.
– काळ्या द्राक्षात अँटीबॅक्टीरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशी संबंधित सर्व आजार दूर राहतात.
– काळी द्राक्षे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यात ८२% पाणी असल्याचे स्पष्ट झालं आहे. तसंच यात 31 कॅलरीज, 8 ग्रॅम कर्बोदके, 7 ग्रॅम शर्करा असते . त्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, के, मॅग्नेशियम, तांबे आणि कॅल्शियम भरपूर असल्याचेही स्पष्ट झालं आहे. जे निरोगी राहिण्यासाठी चांगलं आहे.
– काळ्या द्राक्षाच्या सेवनाने किडनीचे कार्य चांगले होते.यामुळे किडनीचे नुकसान होत नाही. UTI सारखे आजार दूर राहतात.
– काळी द्राक्षे हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. काळ्या द्राक्षांमध्ये असलेले पोटॅशियम आणि सायटोकेमिकल्स सारखे घटक हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
– काळी द्राक्षे दृष्टी सुधारण्यासाठी ओळखली जातात. यामध्ये डोळे निरोगी ठेवणारे घटक असतात.
====================
हे देखील वाचा : Salt : 30 हजार किलो दर असणारे मीठ असते का ?
Maghi Ganesh जाणून घ्या माघी गणेशोत्सव पूजा विधी आणि मुहूर्त वेळ
===================
– काळी द्राक्षे अँटिऑक्सिडेंट आणि इतर पोषकतत्वांनी समृद्ध असतात. त्यामुळे जे लोक त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेतात ते ही द्राक्ष घेतात. त्यामुळे त्याला मागणी आहे. काळी द्राक्षे डोळ्यांसाठी खूप चांगली असतात. त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते.
– रेझवेराट्रोल आणि क्वेर्सेटिन सारख्या संयुगे, कर्करोग विरोधी गुणधर्म असल्याचे दर्शविले गेले आहे. काळ्या द्राक्षातील अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करून आणि पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. यामुळे कर्करोगापासून बचाव करण्यास मदत होते.
(टीप : कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)