दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष बेपत्ता झाले आहेत. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल हे अचानक बेपत्ता झाल्याने दक्षिण कोरियामध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्याभरापासून दक्षिण कोरियाचे राजकीय वातावरण तापलेले आहे. राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी 3 डिसेंबर रोजी देशावर मार्शल लॉ जाहीर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर जनतेनं आंदोलन सुरु केलं. राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीनं केलेल्या घोटाळ्याची चौकशी कऱण्याची आणि त्या दोघांना शिक्षा देण्याची मागणी होऊ लागली. (Yoon Suk Yeol)
त्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी अवघ्या काही तासात मार्शल लॉ ची घोषणा मागे घेतली. तेव्हापासून त्यांच्यावर अटकेची तलवार टांगत होती. याच दरम्यान राष्ट्राध्यक्षांना अटक करण्यासाठी गेलेल्या लष्कराला परत यावे लागले होते. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल आपल्या कुटुंबासह गायब झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दक्षिण कोरियामध्ये डिसेंबर 2024 पासून सुरु असलेला राजकीय ड्रामा आता वेगळ्या टप्यावर पोहचला आहे. येथे चक्क राष्ट्राध्यक्षच गायब झाल्याची घटना घडली आहे. आधीच राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी मार्शल लॉ ची घोषणा केल्यापासून ते वादात सापडले होते. त्यानंतर त्यांना अधीही अटक होण्याची अटकळ होती. (International News)
मात्र अशाच तणावाच्या दिवसात ते कुठे गेले, याचे गुढ निर्माण झाले आहे. अटकेच्या धमकीमुळे ते घरातून पळून गेल्याच्या अफवा आहेत. त्यांच्याविरुद्ध नॅशलन असेब्लीमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर केल्यानंतर यून यांनी स्वतःला मध्य सोलमधील निवासस्थानी बंदिस्त करुन घेतले होते. त्यानंतर यून यांना अटक करायला गेलेल्या तपास अधिका-यांना राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा दल आणि समर्थकांनी घेराव घातला होता. त्याचवेळी यून यांनी आपल्या कुटुंबियांसह आपले निवासस्थान सोडल्याची माहिती पुढे येत आहे. यून हे त्यांच्या कार्यालयातही दिसले नाहीत. त्यामुळेच त्यांनी देश सोडून पलायन केल्याची चर्चाही होत आहे. राष्ट्राध्यक्ष यून आणि त्यांच्या पत्नींविरोधात भ्रष्ट्राचाराचे गंभीर आरोप होते. त्याची चौकशी चालू असतांनाच यून यांनी देशात मार्शल लॉ ची घोषणा केली. स्वतःला वाचवण्यासाठी देशातील जनतेला वेढीस धरण्याच्या यून यांच्या या निर्णयाचा जनतेनं रस्त्यावर येत विरोध केला. तसेच यून यांच्या पक्षानेही देशातील मार्शल लॉ चा विरोध केला. (Yoon Suk Yeol)
यामुळे यून यांनी आपला निर्णय मागे घेतला, मात्र त्यांच्यावर होणा-या चौकशीमध्ये या निर्णयाचीही भर पडली. यून यांच्यावरील भ्रष्ट्राचाराचे आरोप सिद्ध झाले तर त्यांना शिक्षा होण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियाच्या इतिहासातील राष्ट्राध्यक्षांना शिक्षा होण्याची आणि त्यांची चौकशी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपल्या पदाचा गैरवापर करून आणि बंडखोरीला चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली यून यांना तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचा वॉरंट जाहीर केला. न्यायालयाने यून यांच्या विरोधात जाहीर केलेल्या या अटक वॉरंटचे त्यांच्या विरोधकांनी स्वागत केले. तर यून यांचे समर्थकही मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आणि त्यांनी यून यांना अटक करण्यास मज्जाव केला. हा सर्व विरोध रात्रभर झाला. दक्षिण कोरियाचे तापमान कमालीचे घटले आहे. अशा कडाक्याच्या थंडीत यून यांचे समर्थक आणि विरोधक आंदोलन करत असताना राष्ट्राध्यक्ष निवासातून यून यांनी आपल्या कुटुंबियांसह पलायन केल्याचे वृत्त आहे. (International News)
================
हे देखील वाचा : Steve Jobs : स्टीव्ह जॉब्सची बायको कुंभ मेळ्यात…
Sam Altman : ChatGPT च्या सीईओवर झाले गंभीर आरोप !
===============
या आंदोलनाच्या वेळी यून यांच्या निवासस्थानासमोर हजारो पोलिस तैनात होते. मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण आंदोलक आणि पोलिस यांच्यात चकमक झाल्यामुळे तेथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, याचाच फायदा घेऊन यून राष्ट्राध्यक्षनिवास स्थानापासून दूर गेल्याची अटकळ व्यक्त होत आहे. या दरम्यान यून सुक येओल यांच्यावर न्यायालयाने दुस-यांदा अटक वॉरंट जाहीर केले. पोलीसांनी यून आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या अन्य एका निवासस्थानी स्थानबद्ध केल्याची माहितीही पुढे आली आहे. यून कुठे आहेत याची माहिती दक्षिण कोरियातील फक्त मोजक्याच अधिक-यांना असून त्यांच्यावर महाभियोग खटला चालवण्यात येणार आहे. यून यांना स्थानबद्ध केल्यामुळे त्यांना जिथे स्थानबद्ध कले आहे, तिथे दक्षिण कोरियाच्या गुप्तचर विभागाचा कडक पाहरा आहे. त्यामुळेच यून नेमके देशात आहेत, की देशाबाहेर गेले आहेत, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. (Yoon Suk Yeol)
सई बने