Home » Rahul Dravid भारतीय क्रिकेट टीमची भक्कम ‘द वॉल’ राहुल द्रविड

Rahul Dravid भारतीय क्रिकेट टीमची भक्कम ‘द वॉल’ राहुल द्रविड

by Jyotsna Kulkarni
0 comment
Rahul Dravid
Share

आपल्या भारतमध्ये अनेक असे खेळ आहे, जे आपल्याला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गुंतवून ठेवतात. मात्र असे असूनही जी क्रेझ आपल्याला क्रिकेटबद्दल दिसून येते तेवढी इतर खेळांच्या बाबतीत थोडी कमी दिसते. भारतात क्रिकेट हा खेळ नाही तर ही एक भावना समजली जाते. जर महत्वाची मॅच असली तर ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी मॅच बघणारे लोकं देखील भारतात आहे. (Rahul Dravid)

याच क्रिकेटने भारताला नव्हे नव्हे संपूर्ण जगाला एक असा खेळाडू दिला ज्याच्या भरवशावर, ज्याच्या खेळामुळे आपण अशक्य असणाऱ्या अनेक मॅच अगदी सहज जिंकून घेतल्या. या खेळाडूच्या भारतीय संघाला असलेल्या पाठिंब्यामुळेच त्याला नाव देखील तसेच दिले गेले ‘द वॉल’. सगळ्यांना लक्षात आलेच असेल आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत. जेव्हा जेव्हा देशाला, टीमला भिंतीसारखा भक्कम आणि कणखर पाठिंबा आवश्यक होता तेव्हा तेव्हा या वॉलने आपल्याला कधीही निराश केले नाही. (Indian Cricket Team)

भारतीय संघाचा ‘द वॉल’ असलेला एकमेव खेळाडू म्हणजे राहुल द्रविड. या खेळाडूशिवाय भारतीय क्रिकेट कायम अपूर्णच आहे. राहुलने त्याच्या कारकीर्दीमध्ये कायम भारताला एक मोठा विजय मिळवून दिला. त्याने कायम संपूर्ण देशाचा त्याच्यावर असणारा विश्वास सार्थ केला. आज राहुल द्रविड त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती. (Rahul Dravid Birthday)

Rahul Dravid

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक असलेला राहुल द्रविड आज ५२वा वाढदिवस साजरा करत आहे. राहुल द्रविडचा जन्म ११ जानेवारी १९७३ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील एका मराठी कुटुंबात झाला. पुढे त्याच्या जन्मानंतर त्याचे कुटुंब बंगलोरला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. (Marathi News)

राहुलचे बालपण बंगलोरमध्येच गेले. राहुलचे वडील शरद द्रविड (Shard Dravid) हे एका जॅम आणि प्रिझर्व्हज् बनविणाऱ्या कंपनीत काम करायचे. त्यामुळे राहुलला जॅमी हे टोपणनाव पडले. तर त्याची आई पुष्पा (Pushpa) ह्या बंगलोर येथील विश्वेश्वरैया अभियांत्रिकी महाविद्यालयात वास्तुशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. (The Wall)

राहुल द्रविडला विजय नावाचा लहान भाऊ आहे. राहुलने त्याचे शिक्षण बंगलोरमधील सेंट जोसेफ बॉइज हायस्कूलमध्ये त्याने शालेय शिक्षण घेतले, तर सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली. एमबीए करत असताना त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. क्रिकेट खेळण्याआधी राहुल हॉकी खेळायचा. राहुलने शालेय स्तरावर खेळामध्ये अनेक किताब जिंकले आहेत. तो त्याच्या वडिलांकडून क्रिकेट शिकला. (Top Stories)

Rahul Dravid

राहुलने वयाच्या १२ व्या वर्षांपासून द्रविडने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पुढे त्याने १५, १७ आणि १९ वर्षांखालील कर्नाटकच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. चिन्नास्वामी मैदानच्या उन्हाळी शिबीरात प्रशिक्षण देत असताना, माजी क्रिकेट खेळाडू आणि कोच केकी तारापोर यांना सर्वप्रथम द्रविडची प्रतिभा लक्षात आली. द्रविडने शाळेच्या संघातून खेळताना शतक झळकावले होते. तो एक यष्टीरक्षक म्हणून सुद्धा खेळला आहे. (Latest Marathi News)

राहुल द्रविडने फेब्रुवारी १९९१ साली रणजी करंडकमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्याने पुण्यामध्ये महाराष्ट्राविरुद्ध अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांच्या सामने खेळले होते. भविष्यात हेच खेळाडू त्याचे सहकारी झाले. राहुलच्या क्रिकेटमधील कामगिरीमुळे त्याची दुलीप करंडकाच्या दक्षिण विभाग क्रिकेट संघात निवड झाली. (The start of Rahul Dravid’s career)

टीम इंडियाकडून राहुल द्रविडला १९९४ साली निवड झाली. मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. १९९६ च्या विश्वचषकात देखील राहुल द्रविडला स्थान मिळाले नव्हते. मात्र ३ एप्रिल १९९६ रोजी, इंग्लंडविरुद्ध खेळताना राहुल द्रविडने कसोटी करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने अनेक कसोटी आणि एकदिवशीय सामने खेळले.

Rahul Dravid
राहुल द्रविडने त्याच्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १६४ कसोटी आणि ३४४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे १३२८८ आणि १०८८९ धावा केल्या. या क्रमात त्याने ३६ आणि १२ शतके झळकावली. द्रविडने एकमेव टी-२० सामना खेळला, ज्यामध्ये त्याने ३१ धावांची खेळी केली. द्रविडने आपल्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक विक्रम केले आणि तोडले देखील. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील राहुल द्रविड हा पहिला खेळाडू आहे ज्याने 300 पेक्षा जास्त धावांची भागीदारी दोनदा केली आहे. (Internatinal Cricket)

राहुल द्रविडने त्याच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत ४४,१५२ मिनिटे म्हणजेच ७३५ तास ५२ मिनिटे क्रीजवर घालवली आहेत, हा एक विश्वविक्रम आहे. यादरम्यान त्याने १६४ सामन्यांमध्ये ५२.३ च्या सरासरीने ३६ शतकांसह १३,२८८ धावा केल्या आहेत. तर कसोटी क्रिकेटमध्ये ३०००० पेक्षा जास्त चेंडू खेळणारा राहुल द्रविड हा जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ३१२५८ चेंडूंचा सामना केला आहे. (Rahul Dravids Records)

Rahul Dravid

सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकरनंतर कसोटी क्रिकेटमध्ये १० हजारहून अधिक धावा करणारा तो तीसरा भारतीय खेळाडू आहे. कसोटी सामने खेळणाऱ्या सर्वच्या सर्व १० देशांच्या विरुद्ध शतक झळकवणारा तो पहिलाच फलंदाज आहे. यासोबतच राहुल द्रविडने १८ वेगवेगळ्या खेळाडूंसोबत ७५ वेळा शतकी भागिदारी केली आहे. हा एक जागतिक विक्रम आहे. (Rahul Dravid Information)

=======

हे देखील वाचा : Ramgiri Maharaj : टागोरांनी जन-गण-मन ब्रिटिश राजासाठी लिहिलं होतं ?

OYO ने अचानक नियम का बदलले ? कपल्सचं की ओयोचं नुकसान ?

======

इंग्लंडविरुद्ध सोफिया गार्डन्स, कार्डीफ येथे १६ सप्टेंबर २०११, रोजी तो त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. २०११-१२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्याने ९ मार्च २०१२ रोजी कसोटी आणि स्थानिक क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली.  राहुल द्रविडला अर्जुन पुरस्कार, विस्डेन क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर, आयसीसी (ICC) टेस्ट प्लेयर ऑफ द इयर, आयसीसी क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर, पद्मश्री पुरस्कार, कॅप्टन ऑफ द आयसीसी टेस्ट टीम, पॉली उम्रीगर पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, आय.सी.सी हॉल ऑफ फेम आदी अनेक सन्मान देऊन गौरवले आहेत. (Rahul Dravid Awards)

४ मे २००३ रोजी राहुल द्रविडने नागपूर स्थित शल्यविशारद विजेता पेंढारकरशी विवाह केला त्यांना समित आणि अन्वय ही दोन मुलं आहेत. राहुल मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी ह्या भाषा कुशलतेने बोलू शकतो. (Rahul Dravids Personal Life)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.