Home » हिवाळ्यातील सुपरफूड असलेल्या ओल्या हळदीचे फायदे

हिवाळ्यातील सुपरफूड असलेल्या ओल्या हळदीचे फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Raw Turmeric
Share

हळद आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्वाचा घटक. हळद अन्नाची चव वाढवण्यासोबतच, अन्नाला रंग देण्याचे आणि अन्नाचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम करते, हळद फक्त स्वयंपाकापुरतीच मर्यादित नाही. जेवणाशिवाय देखील हळदीचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक मोठे आणि महत्वाचे फायदे आहेत. त्यातही जर हळद ओली किंवा कच्ची असेल तर ती अधिक जास्त लाभदायक ठरते.

हळद पावडरपेक्षा कच्ची हळद आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. साधारणतः हिवाळ्यामध्येच ओली हळद बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते. हिवाळयात कच्ची हळद खाणे अतिशय प्रभावशाली मानले जाते. ही कच्ची हळद विविध पद्धतीने करून खाता येते. मात्र बहुतकरून या ओल्या हळदीचे लोणचे केले जाते. चला तर जाणून घेऊया कच्च्या हळदीचे फायदे.

– ओली हळद आहारात वापरल्यास भूक वाढते, पोट साफ होते आणि प्रतिकारशक्ती चांगली होते. या हळदीच्या वापरामुळे जुलाब थांबतात.

– याशिवाय ही हळद स्वयंपाकामधे वापरल्यास अन्नाची चव वाढते.

– चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर ओली हळद बारीक करून लावता येते. चेहऱ्याची त्वचा सैल पडली असेल तर ओली हळद व लोणी याचा लेप करून लावावा.

– खोकला येत असेल तर ओल्या हळदीचा रस व मध चाटवावा. ओली हळद आहारात नियमित वापरल्यास मधुमेह होण्यास प्रतिबंध निर्माण होतो.

– संधिवातादरम्यान जळजळ कमी करण्यासाठी वर्षानुवर्षे कच्च्या हळदीचा वापर केला जात आहे. कच्ची हळद सांधेदुखी कमी करण्यास प्रभावी आहे. तसेच, कच्ची हळद शरीराच्या नैसर्गिक पेशी नष्ट करणारे फ्री रॅडिकल्स देखील काढून टाकते.

– कच्च्या हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. ही हळद सर्दी, पडसे, खोकला आणि ताप रोखण्यास मदत करते. या हळदीमध्ये भरपूर प्रमाणात आढळणारे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीरातील बुरशीजन्य संक्रमण काढून टाकतात.

– कच्च्या हळदीचे नियमित सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि त्यामुळे हृदयाशी संबंधित सर्व समस्यांचा धोका कमी होतो.

– पुरुषांमध्ये आढळणाऱ्या प्रोस्टेट कर्करोगावर कच्ची हळद अतिशय गुणकारी ठरते. कच्ची हळद कर्करोग पेशींना वाढण्यास प्रतिबंधित करते. कच्च्या हळदीचे सेवन ट्युमरला प्रतिबंधित करते.

– कच्ची हळद शरीरातील इन्सुलिन संतुलित करते. तसेच, ग्लूकोज नियंत्रित करते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठीही कच्ची हळद खूप फायदेशीर ठरते. हळद यकृतासाठीही खूप फायदेशीर आहे, असे बर्‍याच संशोधनात समोर आले आहे. यामुळे यकृताचे कार्य सुधारते.

– चेहऱ्यावर काळे डाग पडले असल्यास, अर्धीवाटी बेसन पिठात 2 चमचे लिंबाचा रस आणि कच्च्या हळदीचा छोटासा तुकडा पेस्ट करून घाला. थोडेसे दूध टाकून या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून, पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट 10 मिनिटांसाठी चेहऱ्यावर किंवा डागांवर लावा. व्यवस्थित सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतील.

(टीप : कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ओल्या हळदीचे लोणचे

प्रथम ओली हळद स्वच्छ धुवून सुती कपडाने ती कोरडी करून घेणे. आता त्याचे सॅलरीने वरची साले काढून घेणे. आता ही हळद एका प्लेट मध्ये खिसणीने खिसुन घेणे. व ती एका बाउल मध्ये घेणे. आता त्या मध्ये चवीनुसार मीठ, आवडीनुसार लिंबू लोणचे मसाला, आणि तिखट हवे असेल तर लाल तिखट ही घालू शकता.

आता या मध्ये ३ – ४ लिंबाचा रस घालून सगळे मिश्रण हलवून घेणे. लिंबू मुळे रस ही सुटतो आणि चटपटीत टेस्टी लागते. आता एका छोटया कढई मध्ये 5 मोठे चमचे फोडणीसाठी तेल घेणे. ते गरम झाले कि त्या मध्ये मोहरी व हिंग घालून घेणे.फोडणी खमंग झाली कि गॅस बंद करणे.

फोडणी थंड झाली कि त्या मिश्रानावर ओतावी. व ते लोणचे छान एकजीव करून घेणे.व हवा बंद काचेच्या बाटली मध्ये भरून ठेवावे. फ्रिज मध्ये ठेवावे. बाहेर ही ८ दिवस राहते. मस्त टेस्टी असे जिभेला चव येणारे चटपटीत लोणचे तयार झाले. रोजच्या जेवनामध्ये वेगवेगळे लोणचे, चटण्या तोंडी लावायला आवडतात त्या मध्ये हे लोणचे ही खूप आवळा लोणचे सारखे टेस्टी चटपटीत लागते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.