Home » Pushpa ने ते करून दाखवलं, जे कोणालाही जमलं नाही !

Pushpa ने ते करून दाखवलं, जे कोणालाही जमलं नाही !

by Team Gajawaja
0 comment
Pushpa 2
Share

झुकेगा नही साला, फ्लावर नही फायर है में इथपासून ते नॅशनल नही इंटरनॅशनल है में आणि फायर नही वाईल्ड फायर है में इथपर्यंतचा पुष्पाचा प्रवास खरच बॉक्स ऑफिसवर आग ओकणारा राहिला आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ज्या बहुचर्चित चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती, तो ‘पुष्पा २ – द रूल’ सिनेमा थीएटर्समध्ये धडकला आहे. आणि असा धडकला की, आतापर्यंतचे सगळेच रेकोर्ड तुटले. पहिल्याच दिवशी मुव्हीने तब्बल २५० कोटी रुपये कमावले आहेत. अल्लू अर्जुनच्या या दमदार पुष्पाने सिनेमा इतिहासातले कोणकोणते रेकॉर्ड मोडले, जाणून घेऊया. (Pushpa 2)

२०२१ साली पुष्पाचा पहिला भाग द राईज आला होता. डीरेक्टर सुकुमारचा अल्लू अर्जुनसोबत हा चौथा मुव्ही ! याने हाईप तर कमावली होतीच यासोबतच जवळपास ४०० कोटींचा गल्ला जमवला होता. कोविडचा काळ असल्यामुळे कलेक्शनवर परिणाम झाला, पण हा मुव्ही आगामी काळात डबल धमाका करणार, हे निश्चितच होत. त्यातच आता ‘पुष्पा द रूल’ चित्रपटाने एकाच दिवसात आज पर्यंत वर्ल्डवाइड तब्बल २५० कोटी रुपये कलेक्शन करून बॉक्स ऑफिसवर वेगळच वादळ आणलं आहे. आजपर्यंतच्या इंडियन सिनेमाच्या इतिहासात एकाच दिवसात २५० कोटी कमावण्याची किमया कोणालाही करता आली नव्हती. यासोबतच पुष्पा न झुकता RRR चा २२३ कोटींच्या कलेक्शनचा रेकोर्ड ब्रेक करत हायेस्ट फर्स्ट डे कलेक्शनच्या यादीत दिमाखात नंबर वन स्पॉटवर बसला आहे. जर तुम्ही आजपर्यंतचे हायेस्ट वर्ल्डवाइड कलेक्शन पाहिले, तर नंबर वन होता RRR त्याने वर सांगितल्या प्रमाणे २२३ कोटी रुपये पहिल्याच दिवशी कमावले होते. त्यानंतर २०१७ साली आलेल्या बाहुबली २ ने २१७ कोटी कमावले होते. नुकतच प्रभासच्या कल्की या मुव्हीने १८० कोटी तर यशच्या केजीएफ टू ने १६४ कोटी कमावले होते. या सर्वांना मागे सरत पुष्पाने २५० कोटी रुपये कमावले आहेत. (Pushpa 2)

रिजनल Language मुव्ही असूनही डब करून हिंदी इंडस्ट्रीवर पुष्पा अक्षरशः भारी पडला आहे. पुष्पाने तेलुगु आणि वर्ल्डवाईड कलेक्शनसोबत हिंदी बेल्टमध्ये हायेस्ट Grossing सिनेमाचा रेकॉर्ड केला आहे. आतापर्यंत हा रेकॉर्ड शाहरुख खानच्या जवान मुव्हीच्या नावावर होता. जवानने पहिल्याच दिवशी Hindi मध्ये ६५.५ कोटी रुपये कमावले होते. मात्र पुष्पाने थेट ७० कोटींवर उडी मारून पूर्ण बॉलीवूडलाच शॉक दिला आहे. एक तेलुगु डब मुव्हीने बॉलीवूडमध्ये अख्ख मार्केट खाल्ल आहे. चित्रपट Analysts च्या मते, पुष्पा बॉलीवूडचा म्हणजेच Hindi मधला सर्वात जास्त कमाई करणारा मुव्ही बनू शकतो आणि याचं कलेक्शन ७०० कोटींपर्यंत जाऊ शकतं. आतापर्यंत Hindi मध्ये सर्वात जास्त पैसा कमावण्याचा रेकॉर्ड स्त्री २ चा आहे. स्त्रीने Hindi मध्ये ६२५ कोटी कमावण्याचा रेकॉर्ड केला आहे. (Entertainment News)

========

हे देखील वाचा :  ओटीटीवर ‘हे’ चित्रपट पहा आणि विकेंड एन्जॉय करा

========

त्यामुळे एक म्हणजे फर्स्ट डे वर्ल्डवाइड कलेक्शन, फर्स्ट डे हिंदी कलेक्शन आणि फर्स्ट डे तेलुगु कलेक्शन या तिन्हीमध्ये पुष्पा २ किंग ठरला आहे. पुष्पाच्या नावे आणखी एक रेकॉर्ड होऊ शकतो, तो म्हणजे सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा ! हा रेकॉर्ड सध्या दंगलच्या नवे असून दंगलने जवळपास २ हजार कोटी कमावले होते. पुष्पाने कमाईची पेस कायम ठेवली तर कदाचित हा रेकॉर्ड लवकरच अल्लू अर्जुनच्या नावे येऊन शकतो. तेलुगु इंडस्ट्रीमध्येच पहायचं झालं तर बाहुबली २ ने १८०० कोटी कमावले होते. त्यामुळे २ हजार हा आकडा पुष्पासाठी Cakewalk ठरेल, हे येणारे काही दिवस दाखवतीलच पुष्पामध्ये अल्लू अर्जुनसोबत रश्मीका मंधाना, फहाद फासील, जगपती बाबू अशी तगडी स्टार Cast आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांसाठी दुसरा भाग हा मसाला आणि Action ची ट्रिट ठरला आहे. विशेष गोष्ट म्हणजे पुष्पाने रिलीज होण्याच्या आधीच Satellite राईट्स, ओटीटी आणि म्युझिक राईट्सच्या माध्यमातून १००० कोटी कमावले आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी पुष्पाने धुमाकूळ घातलाच आहे. आता पुढच्या महिन्याभरात पुष्पा काय काय धमाका करतोय, हे आता दिसूनच येईल. (Pushpa 2)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.