युगांडा प्रजासत्ताक हा पूर्व आफ्रिकेतील देश आहे. याच देशातील भारतीय वंशाचे उद्योगतपी पंकज ओसवाल आणि त्यांची मुलगी वसुंधरा ओसवाल यांचे नाव सर्वत्र गाजत आहे. अब्जोपती उद्योजक असलेल्या पंकज ओसवाल यांच्या वसुंधरा या मुलीला युगांडामध्ये अटक करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्यातच पंकज ओसवाल यांनी युगांडा सरकारच्या विरोधात थेट संयुक्त राष्ट्रात धाव घेतली आहे. पंकज ओसवाल यांच्या म्हणण्यानुसार युगांडा सरकारनं त्यांच्या मुलीला अटक असून तिला रक्त आणि घाणीने भरलेल्या बाथरूममध्ये डांबून ठेवले आहे. (Vasundhara Oswal)
युगांडा हा पूर्व अफ्रिकी देश वादात सापडला आहे. भारतीय वंशाचे उद्योगपती पंकज ओसवाल यांच्या मुलीचे युगांडा पोलीसांनी अपहरण केल्याचा आरोप केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पंकज ओसवाल यांनी युगांडा सरकाराच्या विरोधात थेट संयुक्त राष्ट्रात अपील दाखल केले आहे. त्यांची 26 वर्षांची मुलगी वसुंधरा ओसवाल हिला गेल्या 17 दिवसांपासून युगांडामध्ये बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले असून तिचा छळ चालू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. गेल्या 17 दिवसापासून ओसवाल हे आपल्या मुलीबरोबर संपर्क करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना अपयश आल्यानं त्यांनी संयुक्त राष्ट्राकडे याप्रकरणी तातडीनं दखल देण्याची मागणी केली आहे. वसुंधरा ओसवाल हिला युगांडा सरकारनं एका गुप्त जागी ठेवलं आहे. (International News)
तिच्यापर्यंत कुठलीही कायदेशीर मदत पोहचवता येत नसल्याचेही ओसवाल यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात आता भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघ काय भूमिका घेत आहे, याकडे सर्वांचे लक्ष आहे. पंकज ओसवाल यांची मुलगी वसुंधरा ही पीआरओ इंडस्ट्रीजची कार्यकारी संचालक आहे. युगांडामध्ये त्यांच्या व्यवसायाचे मोठे जाळे आहे. वसुंधराला अटक झाली, ही बातमी तिच्या पालकांपर्यंत एका सोशल मिडियाच्या पोस्टमार्फत देण्यात आली. सध्या वसुंधरा यांचा फोन हिसकावण्यात आल्याने त्यांच्याशी कोणीही संपर्क करू शकत नसल्याचे सांगण्यात आले. वसुंधरा यांना अटक करुन जिथे ठेवले आहे, तो फोटोही सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. ती जागा अत्यंत भयानक असून तिथे सर्वत्र रक्त पडल्याचे दिसत आहे. त्यावरुन वसुंधरा यांच्यावर अत्याचार झाल्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. (Vasundhara Oswal)
यासंदर्भात आलेल्या माहितीवरुन वसुंधरा ओसवाल हिला 1 ऑक्टोबर रोजी सुमारे 20 सशस्त्र लोकांनी तिच्या कुटुंबाने उभारलेल्या एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल प्लांटमधून पकडले होते. अटक करण्यापूर्वी त्यांनी आपली ओळख किंवा वॉरंट दाखवले नाही. वसुंधरा यांना अटक करण्यामागे मोठे राजकीय कारस्थान असल्याचा त्यांच्या वडिलांना संशय आहे. वसुंधरा यांनी कुठलाही गुन्हा केला नाही, असे असतांनाही त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले असल्याचे पंकज ओसवाल यांचे म्हणणे आहे. यामागे युगांडामधील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा हात असल्याचाही आरोप आहे. ओसवाल यांच्या भावाने युगांडा सरकारला लिहिलेल्या एका खुल्या पत्रात आरोप केला आहे की, हे सर्व एका 68 वर्षीय पुरुषाच्या कॉर्पोरेट ईर्षेमुळे झाले आहे. वसुंधराच्या कुटुंबियांचे युगांडामध्ये उद्योग व्यापारामध्ये मोठे योगदान आहे. 1999 मध्ये जन्मलेल्या वसुंधरा ओसवाल या प्रसिद्ध उद्योगपती पंकज ओसवाल आणि राधिका ओसवाल यांच्या कन्या आहेत. वसुंधरा ओसवाल यांनी स्वित्झर्लंड विद्यापीठातून फायनान्समध्ये बॅचलर पदवी पूर्ण केली आहे. (International News)
======
हे देखील वाचा : २००० वर्षांपूर्वीच तयार झालं होतं कॉम्प्युटर !
======
वसुंधरा पीआरओ इंडस्ट्रीजच्या सर्वेसर्वा आहेत. वसुंधरा ओसवाल सध्या एक्सिस मिनरल्सच्या कार्यकारी संचालक म्हणून काम करत असून, औद्योगिक क्षेत्रात त्यांच्या नावाचा स्वतंत्र ठसा आहे. कार्बन डायऑक्साइड कॅप्चरिंग प्लांटच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार आहे. तसेच वसुंधरा यांनी शीतपेय कंपन्यांना रिसायकल केलेले पाणी पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 1,649 कोटींचे घर असलेले ओसवाल कुटुंबिय त्यांच्या भव्य जीवनशैलीसाठीही ओळखले जातात. अलीकडेच, पंकज आणि राधिका ओसवाल यांनी जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक खरेदी केल्यावर ते चर्चेत आले. स्वित्झर्लंडमधील गिंगिन्स येथे स्थित व्हिला हरी नावाची इस्टेट त्यांनी खरेदी केली आहे. 4.3 लाख चौरस फूट पसरलेली ही वास्तू त्यांनी रु. 1649 कोटीला विकत घेतली आहे. (Vasundhara Oswal)
सई बने