शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. सगळीकडे देवीची पूजा, आरती, गरबा अशा जल्लोषात नवरात्रीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. आज शारदीय नवरात्राची सातवी माळ आहे. नवरात्राचे नऊही दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवस एका देवीच्या रुपाला समर्पित असतो. अशातच आज सातवी माळ असल्याने आजच्या दिवशी पूजा होते ती, देवी कालरात्रीची.
आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी ही ९ ऑक्टोबरला साजरी होत आहे. शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा देवीचे सातवे रुप देवी कालरात्रीची पूजा केली जाते. कालरात्री देवी दुष्टांचा नाश करणारी, अनेक संकटांवर मात करणारी देवी आहे. कालरात्री देवी ही नेहमीच तिच्या भक्तांचे विविध संकटांपासून, भीती पासून रक्षण करते.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजेच सप्तमीला देवी कालरात्रीची पूजा केली जाते. देवीचे कालरात्री हे रूप अनेक विनाशकारी रूपांपैकी एक मानले जाते. शुंभ निशुंभ या दृष्ट राक्षसांचा विनाश करण्यासाठी दुर्गा मातेने कालरात्रीचे रूप धारण केले होते अशी मान्यता आहे. कालरात्री देवीचा रंग कृष्ण वर्ण आहे. तिच्या रंगवरूनच तिला कालरात्री हे नाव मिळाले असल्याचे सांगितले जाते. कालरात्री देवीचे रूप हे कालिका अर्थात काळ्या रंगाचे असून देवीचे केस मोकळे आहे आणि सर्व दिशांना पसरलेले आहेत. कालरात्री मातेला चार हात आणि तीन डोळे असून, देवी कालरात्री हे भगवान शंकराचे अर्धनारीनटेश्वर रूप दर्शवते. देवी कालरात्रीच्या गळ्यातचमकणारी माळ आहे.
कालरात्री देवीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. कालरात्री देवीचे वाहन गाढव हे आहे. तर तिच्या उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे. तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कट्यार) आहे.
कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयानक आहे. मात्र ती नेहमी शुभ फळ देणारी देवी असल्यामुळे तिचे नाव ‘शुभंकारी’ सुद्धा आहे. म्हणूनच भक्तांनी भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांना दूर करणारी आहे. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे.
कालरात्री देवीच्या पूजेचे महत्त्व
माता कालरात्री हे नवदुर्गेचे रूप असून शक्तीचे प्रतीक मानले जाते. कालरात्री माता अज्ञान आणि अंधकाराचा नाश करते. देवीच्या या रुपाची उपासना केल्याने मनात सकारात्मकता येते आणि जीवनात प्रकाश येतो. ती शक्तीची देवी आहे आणि तिच्या भक्तांना शक्ती देते. देवीची उपासना केल्याने व्यक्तीमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. माता कालरात्री भक्तांचे सर्व भय दूर करते. त्याच्या कृपेने मनुष्य सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त होतो. कालरात्रीला मालपुआ अर्पण केला जातो. त्यामुळे या दिवशी विधीनुसार मातेची पूजा केल्यानंतर मालपुआचा नैवेद्य दाखवावा. ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै। या मंत्राचा जप करावा.
कालरात्री देवी कथा
पौराणिक मान्यतेनुसार एकेकाळी रक्तबीज नावाचा राक्षस होता. त्यामुळे मानवासह सर्व देवता कोपले. रक्तबीज राक्षसाचे वैशिष्ट्य असे की त्याच्या रक्ताचा एक थेंब पृथ्वीवर पडताच त्याच्यासारखा दुसरा राक्षस निर्माण व्हायचा. या राक्षसामुळे सर्वजण त्रासले आणि समस्या सोडवण्यासाठी भगवान शंकराकडे गेले. भगवान शिव ज्ञानी आहेत, त्यांच्यापासून काहीही लपलेले नाही. भगवान शिव म्हणाले की केवळ माता पार्वतीच या राक्षसाचा नाश करू शकते.
भगवान शिवाने माता पार्वतीला विनंती केली. यानंतर माता पार्वतीने स्वतः माँ कालरात्रीला शक्ती आणि तेजाने निर्माण केले. त्यानंतर जेव्हा माता दुर्गेने रक्तबीज राक्षसाचा वध केला आणि ते जमिनीवर पडण्याआधीच त्याच्या शरीरातून रक्त निघत होते तेव्हा माता कालरात्रीने तिचे तोंड रक्ताने भरले. तेव्हापासून माता पार्वतीच्या या रूपाला माता कालरात्री असे नाव पडले.
देवी कालरात्रीचा मंत्र
एक वेधी जपाकरर्णपूरा नग्ना खरास्थित।
लम्बोष्ठी कर्णिकाकणी तैलाभयुक्तशरीरिणी।।
वामपदोल्लसल्लोहलताकण्टक भूषणा।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकारी।।
जय त्वं देवि चामुण्डे जय भूतार्ति हारिणि।
जय सार्वगते देवि कालरात्रि नमोस्तुते॥
ॐ ऐं सर्वाप्रशमनं त्रैलोक्यस्या अखिलेश्वरी।
एवमेव त्वथा कार्यस्मद् वैरिविनाशनम् नमो सें ऐं ॐ।।
=======
हे देखील वाचा : कामाख्या देवीशी संबंधित रोचक गोष्टी
=======
कालरात्री देवी आरती
कालरात्रि जय-जय-महाकाली ।
काल के मुंह से बचाने वाली ॥
दुष्ट संघारक नाम तुम्हारा ।
महाचंडी तेरा अवतार ॥
पृथ्वी और आकाश पे सारा ।
महाकाली है तेरा पसारा ॥
खडग खप्पर रखने वाली ।
दुष्टों का लहू चखने वाली ॥
कलकत्ता स्थान तुम्हारा ।
सब जगह देखूं तेरा नजारा ॥
सभी देवता सब नर-नारी ।
गावें स्तुति सभी तुम्हारी ॥
रक्तदंता और अन्नपूर्णा ।
कृपा करे तो कोई भी दुःख ना ॥
ना कोई चिंता रहे बीमारी ।
ना कोई गम ना संकट भारी ॥
उस पर कभी कष्ट ना आवें ।
महाकाली मां जिसे बचाबे ॥
तू भी भक्त प्रेम से कह ।
कालरात्रि मां तेरी जय ॥