Home » रिल्स स्टार सुरज चव्हाण ठरला बिग बॉसचा विजेता

रिल्स स्टार सुरज चव्हाण ठरला बिग बॉसचा विजेता

by Jyotsna Kulkarni
0 comment
Suraj Chavan
Share

मराठी बिग बॉसचा यंदाचा पाचवा सिझन कमालीचा गाजला. या पर्वाने न भूतो न भविष्यती अशी लोकप्रियता मिळवली. बिग बॉसचे हे पर्व खऱ्या अर्थाने वेगळे ठरले. मुख्य म्हणजे या पर्वामध्ये घरात फक्त कलाकार नाही तर सोशल मीडिया स्टार देखील सामील झाले होते. यासोबतच बिग बॉसचा खेळ हा १०० दिवसांचा असतो मात्र या पर्वामध्ये हा खेळ केवळ ७० दिवसांचा झाला. नुकताच बिग बॉसचा ग्रँड फिनाले संपन्न झाला. यात बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता म्हंणून सूरज चव्हाणने ट्रॉफीवर नाव कोरले.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी प्रसिद्ध रिलस्टार झापूक झुपूक सूरज चव्हाणने जिंकली आहे. घरातल्या सगळ्यांच सदस्यांना धोबीपछाड करत ‘गुलीगत धोका’ सूरज चव्हाणने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले कोरले आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. यंदाच्या सीझनमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली होती. या १६ जणांपैकीफक्त सहा जणांचा घरात शेवटपर्यंत टिकाव लागला.

प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवत पाचव्या पर्वामध्ये अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर या सहा सदस्यांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली होती. अशातच जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य या खेळातून बाद झाले आणि टॉप-२ ठरले सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत. या दोघांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली. आणि सुरजने यात बाजी मारली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

सूरज चव्हाण विजेता होणार याची चर्चा सोशल मीडियावर चालूच होती. टॉप सहा स्पर्धकांमधून देखील सुरजचं जिंकणार असा विश्वास त्याच्या फॅन्सला होता. सुरुवातीला जास्त सक्रिय नसलेल्या सुरजने आपल्या वागणुकीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्याने घरातील सर्वच स्पर्धक सदस्यांना प्रत्येक टास्कमध्ये जोरदार टक्कर दिली. त्याच्या खेळाचे आणि वागणुकीचे लोकांनी आणि खुद्द रितेश देशमुखने देखील कौतुक केले होते. बिग बॉसच्या घरातील कॅप्टन होण्याचीही संधी सूरजने मिळवली होती.

सूरज चव्हाण बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर आता त्याच्यावर बक्षीसांचा वर्षाव होत आहे. हा शो जिंकल्यामुळे तो आता लखपती झाला आहे. बिग बॉसचा अंतिम विजेता ठरल्यानंतर त्याला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून 14 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. यासोबतच बिग बॉसचे स्पॉन्सर पु. ना. गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रुपये जाहीर करण्यात आले. सोबतच त्याला एक इलेक्ट्रिक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आली. शिवाय कलर्स मराठीचे सर्वेसर्वा आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणा देखील केली.

=======

हे देखील वाचा : नवरात्रीची पाचवी माळ – स्कंदमाता पूजन

=======

सुरज चव्हाण आहे कोण?
मूळचा बारामतीचा असलेला सूरज हा टीकटॉकमुळे प्रकाशझोतात आला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. मात्र सूरजचे वैयक्तिक आयुष्य हे फार खडतर होते. सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडीलांचे निधन झाले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेता आले. सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजला वाढवले आहे. बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रिल्समुळे सूरज चांगलाच फेमस झाला.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.