विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील क्रांतीने 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची हकालपट्टी झाली. त्यानंतर बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. या सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस आहेत. या सर्व आंदोलनादरम्यान बांगलादेशमधील हिंदू धर्मियांना मोठ्या प्रमाणात लक्ष कऱण्यात आले. हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली. अनेक हिंदू कुटंबांना देश सोडण्यास भाग पाडण्यात आले. हिंदू सरकारी नोकरदारांवर नोकरी सोडण्यासाठी जबदरदस्ती करण्यात आली. फारकाय पण हिंदू शिक्षकांचेही जबरदस्तीनं राजीनामे घेण्यात आले. (Durga Pooja)
हिंदू धर्मियांच्या उद्योगधंद्यांची लूट करण्यात आली. बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियांवर होणा-या या अत्याचारावर गप्प रहाणा-या तेथील सरकारनं आता हद्द केली आहे. कारण बांगलादेशमध्ये दुर्गा पूजा साजरी कराल तर खबरदार असा खुला इशारा देण्यात येत आहे. यासाठी तेथील आतंकवादी संघटना खुलेपणानं मोर्चे काढून हिंदूना धमकावत आहेत. मात्र या सर्वांकडे बांगलादेश सरकारनं परस्पर दुर्लक्ष करीत या अतिरेकी मोर्चेक-यांना खुली सुट दिली आहे. (International news)
दुर्गा पूजा हा हिंदू धर्मातील एक प्रसिद्ध आणि महत्त्वाचा सण आहे. सलग दहा दिवस चालणारा हा उत्सव आपल्या शेजारील बांगलादेशमध्येही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मात्र यावर्षी बांगलादेशमधील हिंदूसमोर हा उत्सव साजरा करायचा की नाही, प्रश्न उभा राहिला आहे. कारण त्यांना बांगलादेशमधील मुस्लिम धर्मियांकडून दुर्गा पूजा साजरी कराल तर आमच्याशी गाठ आहे, अशा खुल्या धमक्या मिळत आहेत. बांगलादेशातील कट्टरवाद्यांनी हिंदू समाजाला दुर्गा पूजा साजरी करु नका असा सल्ला दिला आहे. आणि हा सण साजरा केलात कर त्याची किंमत मोजावी लागेल असा इशाराही जाहीरपणे दिला आहे. एवढ्यावरच या विरोधकांचे समाधान झाले नाही, तर दुर्गापुजेसाठी देण्यात येणारी सुट्टीही रद्द करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे. (Durga Pooja)
कारण या कट्टरवाद्यांच्या मते बांगलादेशमध्ये हिंदू हे अल्पसंख्यांक आहेत. अल्पसंख्यांकांच्या सणासाठी सुट्टी कशाला हवी असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. बांगलादेशात रहाणा-या हिंदूंच्या घरी याबाबत धमक्या देणारी पत्रही पाठवण्यात येत आहेत. यातून दुर्गापूजेचा सण उघडपणे साजरा न करण्यासोबतच हिंदूंना देवीच्या मूर्ती विसर्जनात सहभागी न होण्याचेही सांगण्यात आले आहे. असे सांगूनही दुर्गापूजेचे आयोजन केलेच तर ते योग्य होणार नाही, अशी पत्रे हिंदू मंदिरांना मिळत असल्यामुळे बांगलादेशातील हिंदूची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. कट्टरतावादी घटकांच्या वर्चस्वामुळे धार्मिक सण साजरे करणे कठीण झाले आहे. याबाबत बांगलादेशातील हिंदूनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनाही विनंती केली होती. मोहम्मद युनूस यांनी हिंदू मंदिरांचा दौरा करुन बांगलादेशमध्ये हिंदू सुरक्षित आहेत, अशी घोषणा केली. मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नसल्याचे उघड आहे. (International news)
आता बांगलादेशात दुर्गापूजेसारखा सण कसा साजरा करायचा हा प्रश्न हिंदूंना पडला आहे. बांगलादेशच्या ढाका आणि खुलना येथील चार हिंदू मंदिरांना कट्टरवाद्यांच्या धमकीचे पत्र मिळाले आहे. त्यात दुर्गापूजा करायची असल्यास पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मंदिर प्रशासनानं पोलीसांकडे धाव घेतली. पण पोलीसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुले चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ढाका येथे अतिरेकी संघटनांनी मोर्चा काढून दुर्गापुजेला विरोध नोंदवला आहे. तसेच या मोर्चाचे व्हिडिओ सर्वत्र शेअर करत हिंदूंना धमकी दिली आहे. बांगलादेशातील ‘इन्साफ कीमकारी छात्र-जनता’ नावाच्या संघटनेने हिंदू धर्मियांनी दुर्गा पुजा करु नये, यासाठी मोर्चे काढले आहेत. (Durga Pooja)
=====
हे देखील वाचा : जाणून घ्या शारदीय नवरात्राची आणि घटस्थापनेच्या संपूर्ण माहिती
======
दुर्गा पुजा करु नका, मुर्तीचे विसर्जन करु नका, असे सांगणारे फलक घेत हे मोर्चे काढण्यात आले. एवढेच नाही तर पर्यावरणाची हानी होत असल्याचे सांगत सार्वजनिक पूजा आणि मूर्ती विसर्जनावर बंदी घालण्याची मागणी करणारे 16 कलमी मागणी पत्रही या गटाने दिले आहे. दुर्गा पुजेचा उत्सव 9 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. दरवर्षी बांगलादेशात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मात्र यावर्षी या पुजेवर बांगलादेशातील सत्तांतराचे सावट आले आहे. या सत्तातरांमध्ये अनेक हिंदू मंदिरांना लक्ष कऱण्यात आले. आता दुर्गापुजेतही असाच हैदोस कट्टरवाद्यांनी घातला तर त्यांना कोण अटकाव करमार असा प्रश्न बांगलादेशच्या हिंदूंना पडला आहे. (International news)
सई बने