लोकं नाचायला सुरुवात करतात. काही तास, काही दिवस, काही आठवडे नाचत राहतात पायातून रक्त येतं पण लोकं थांबत नाहीत. तहान भूक विसरून ते नाचत राहतात बेशुद्ध होऊन पुन्हा उठल्यानंतर सुद्धा नाचत राहतात त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातो पण कुठलाच उपाय त्यांना थांबवू शकत नाही. ना कोणत गाणं वाजत असतं ना कोणत संगीत तरी ते बेभान होऊन नाचत राहतात. कुणालाच कळत नाही त्या नाचणाऱ्या लोकांना झालं तरी काय ? हा कुठला आनंद आहे जो त्यांना नाचण्यापासून थांबू देतं नाहीये का त्यांना भुताने झपाटलय जो त्यांना नाचवतोय ? ही त्यांनी केलेल्या पापाची शिक्षा आहे का ? असे अनेक प्रश्न त्यांना पहाणाऱ्या लोकांना पडले. डान्सिंग प्लेग एक असा आजार ज्यांने लोकांना मरेपर्यंत नाचवलं. हा भयाण साथीचा रोग कुठे पसरला ? तो पसरण्याची कारण काय होती ? (Dancing Plague)
साल १५१८, फ्रान्स देशात असणाऱ्या स्टारबर्ग शहरात Frau Troffea एक महिला जी घरातून बाहेर येऊन एका चौकात बेभान होऊन नाचू लागते. सुरुवातीला लोकांना वाटतं तिला काहीतरी खुशखबर मिळाली आहे आणि ती त्या आनंदात नाचते. थोडा वेळ जातो ती नाचतच असते लोकांना वाटत ती नशेत आहे म्हणून नाचते आहे. सकाळची संध्याकाळ होते तरी ती थांबत नाही. तिचा नवरा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो तरी थांबत नाही आणि अचानक ती बेशुद्ध होऊन खाली पडते तिचा नवरा तिला उचलून घरी घेऊन जातो. पण होतं काय दुसऱ्या दिवशी ती न खाता न पिता पुन्हा नाचायला लागते. दोन तीन दिवस सलग असं होत राहतं. तिच्या नवऱ्याला तिची काळजी वाटते आणि तो तिला डॉक्टर कडे घेऊन जातो. आणि पाहतो तर काय तिथे असेच नाचणारे आणखी ३० ३५ लोकं असतात. आणि अशा प्रकारे सुरुवात होते एका भयाण आजाराची डान्सिंग प्लेगची ! (International News)
ऑगस्ट महिन्यापर्यंत असं बेभान होऊन नाचणाऱ्यांची संख्या १०० च्यावर गेली होती. डान्सिंग प्लेग एक असा आजार होता ज्यामध्ये माणूस एकदा नाचायला सुरुवात करायचा आणि मग थांबायचाच नाही तोपर्यंत जोपर्यंत तो बेशुद्ध होत नाही किंवा मरत नाही. नाचणाऱ्यांची संख्या दिवसे न दिवस वाढत होती. जेव्हा नाचण्यामुळे १५ जणांचा मृत्यू झाला तेव्हा प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं. पहिले डॉक्टरना वाटलं हा एखादा नैसर्गिक आजार आहे ब्लड टेंपरेचर वाढल्यामुळे हे होतयं. पण जेव्हा नाचणाऱ्यांची संख्या वाढून एकेकावर उपचार करणं अवघड जात होतं. तेव्हा डॉक्टरांनी सुचवलं की ह्यांना असंच नाचू द्यावं जेव्हा ह्यांच बॉडी टेंपरेचर कमी होईल ते आपोआप थांबतील. तेव्हा नाचणाऱ्यांसाठी एक वेगळी सोय केली गेली. एका मोकळ्या जागेला डांस फ्लोर मध्ये बदलण्यात आलं काही Professional डान्सरस सुद्धा नेमले गेले जे ह्या नाचणाऱ्या लोकांसोबत नाचतील पण ह्याचा फायदा झाला नाही उलट आणखी लोकं यामुळे दगावली. (Dancing Plague)
त्याकाळात तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हत लोकं अंधविश्वासू होते, जेव्हा काहीच कळायला मार्ग नव्हता तेव्हा लोकांनी असच अंधश्रद्धा पसरवायला सुरुवात केली. त्यांच्या म्हणण्यानुसार हे सेंट वाईटस च्या श्रापामुळे होतयं. सेंट वाईट्स खूप वर्षांआधी फ्रान्स मध्ये एक संत होते. त्यांच्याबद्दल अशी मान्यता होती की ते नाचून गाऊन लोकांना आजारातून बरं करायचे. या अंधश्रद्धेमुळे लोकं नाचणाऱ्या लोकांना सेंट वाईट्स च्या प्रार्थनास्थळवर घेऊन गेले. त्यांच्या हातात क्रॉस देऊन त्यांना तिथे नाचवलं जाऊ लागलं आणि त्यांच्या अंगावर होली वॉटर सुद्धा शिंपडल जाऊ लागलं, ज्यांने लोकं ठीक होऊ लागली. पण हा प्रकार कावळा बसायला आणि फांदी तुटायला असा होता, कारण काही लोकं काहीच न करता सुद्धा बरे होत होते. (International News)
======
हे देखील वाचा : जपानमध्ये मृतदेह घरात कुजतात !
======
काही वैज्ञानिकांनी या डांसिंग आजारच कारण गहू आणि मक्क्यावर आढळणाऱ्या Ergot Fungi Toxic या पिकांच्या जैविक आजारा ला मानलं. हे फंगस डोक्यात जाऊन ड्रग्स सारख कामं करत, ज्यामुळे लोकांना हेलूसिनेशन होऊ लागतात आणि त्यांचा स्वतावरचा कंट्रोल सुटतो. पण ह्या थियोरी ला लेखक जॉन वॉलर ने पूर्ण पणे चुकीच मानलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हा डांसिंग आजार जिथे सुरू झाला, तिथलचे लोकं खूप अंधश्रद्धाळू होते, दुष्काळा आणि अन्न कमतरतेमुळे त्यांच्या वर मानसिक परिणाम झालेला म्हणून ते लोकं अशा प्रकारे वागत होते. या लेखकाने या घटनेवर पुस्तक सुद्धा लिहिली”A Time To Dance A Time Time To Die’ आणि ‘The Dancing Plague: The Strange, True Story of an Extraordinary Illness’. अशा या डान्सिंग आजाराने ४०० जणांचा बळी घेतला आणि २ महीने थैमान घातल्यानंतर तो शांत झाला. पण हा आजार आणि त्याच कारण आजपर्यंत कोणालाच कळू शकलं नाही. (Dancing Plague)