Home » ब्रिटनमध्ये स्थलांतरितांविरोधात अघोषित युद्ध

ब्रिटनमध्ये स्थलांतरितांविरोधात अघोषित युद्ध

by Team Gajawaja
0 comment
Britain's War on Immigrants
Share

यापुढे आम्हाला स्थलांतरितांचा लोंढा नको. आम्ही स्थलांतरितांना सहन करणार नाही अशा आशयाचे फलक घेऊन ब्रिटीश नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. ब्रिटनमध्ये गेल्या काही वर्षात स्थलांतरितांची संख्या वाढली आहे. या स्थलांतरितांच्या अतिरिक्त लोंढ्यामुळे आमच्या देशातील अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था बिघडत असल्याचा आरोप करीत आता ब्रिटीश नागरिक या लोंढ्याविरुद्ध रस्त्यावर आले आहेत. यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून ब्रिटनमध्ये दंगली सुरु आहेत. स्थलांतरित आणि निर्वासितांविरोधातील संताप येथे शिगेला पोहोचला आहे. लंडनसह देशातील अनेक राज्यांत गुन्हेगारीचा आलेख पाहता यात स्थलांतरितांची संख्या अधिक आहे. त्यातच एका नृत्य शाळेतील तीन अल्पवयीन मुलींची हत्या झाली. या घटनेनं या संतापात अधिक भर पडली आहे. अशा परिस्थितीत स्थानिक लोकांनी मास्क घालून अल्पसंख्याकांच्या वस्त्यांवर हल्ला करण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये आता मास्क विरुद्ध हिजाब असा लढा सुरु झाल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. (Britain’s War on Immigrants)

ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसापासून स्थलांतरितांविरोधात मोठ्या प्रमाणत आंदोलने होत आहेत. आता या आंदोलनाचे पुढचे पाऊल पडले असून या स्थलांतरितांना सरकार हाकलणार नसेल तर ब्रिटनचे नागरिक त्यांना हाकलावून लावतील अशा आशयाचे मेसेज येथील सोशल मिडियामध्ये फिरत आहेत. तुम्ही त्यांना थांबवले नाही तर ते येतच राहतील. स्थलांतरितांना यापुढे सहन केले जाणार नाही. असे फलक आता लंडनच्या रस्त्यावर दिसू लागले आहेत. लंडनमध्ये स्थलांतरितांच्या विरोधात तीव्र मोहीम सुरू झाली आहे. यातून अनेक सोशल मिडिया ग्रुप तयार झाले आहेत. लंडनमधील स्थलांतरांच्या छावण्यांवर हल्ला करण्याची धमकीही देण्यात आली आहेत. फक्त स्थलांतरित नाही, तर त्यांना ब्रिटनची द्वारे खुली करणा-या, इमिग्रेशन करणाऱ्या वकिलांच्या ठिकाणांवरही हल्ले करण्यात येतील असा इशारा स्थानिक तरुणांनी दिला आहे. हे हल्ले करतांना चेह-यावर मास्क लावा असे आवाहनही या संदेशात केले आहे. त्यामुळे लंडनमध्ये मास्क विरुद्ध हिजाब असे वातावरण तयार झाले आहे.

याच आंदोलनाची छळ ब्रिटनच्या सर्वच शहरात पसरली आहे. ब्रिटनमधील अनेक शहरांमध्ये स्थलांतरितांविरोधात हिंसक निदर्शने सुरू आहेत. गेल्या काही महिन्यापासून ब्रिटनमधील गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याचा अहवाल आहे. त्यात स्थलांतरितांचा आकडा जास्त आहे. ब्रिटनच्या शांत वातावरणात स्थलांतरितांनी गुन्हेगारी आणली अशी ओरड होत असतानाच काही दिवसांपूर्वी साउथपोर्ट शहरातील एका नृत्य शाळेत तीन अल्पवयीन मुलींना निघृणपणे मारण्यात आले. या हत्याकांडामध्ये आणखीही पाच मुली गंभीर आहेत. या सर्वांमुळे स्थलांतरितांविरोधात असलेल्या संतापात वाढ झाली. स्थानिक तरुण मोठ्या संस्खेनं रस्त्यावर उतरले. परिणामी ब्रिटनच्या १७ शहरांमध्ये जाळपोळ आणि आंदोलनाच्या घटना घडल्या आहेत. या आंदोलनकांना विरोध करणा-या पोलीसांवरही हल्ला करण्यात आला आहे. (Britain’s War on Immigrants)

त्यातच लंडनमध्ये जवळपास ३० ठिकाणी हल्ले होणार असल्याची बातमी सोशल मिडियाच्या मार्फत पसरवण्यात आली. मुखवटाधारी हल्लेखोर हे हल्ले करणार असल्याचेही सांगण्यात आले होते. संपूर्ण ब्रिटनमध्ये स्थलांतरित मुस्लिमांची संख्या मोठी आहे. या स्थलांतरितांबाबत स्थानिकांमध्ये संताप होता. आता वाढत्या गुन्हेगारीमुळे हा संयमाचा बांध फुटला असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या लंडनमध्ये स्थानिक विरुद्ध स्थलांतरित असे अघोषित युद्ध सुरु आहे. या आंदलनात सहभागी झालेल्या ४०० नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मात्र या अटकेनंतरही ही आंदोलनची धग कमी झाली नाही. बॉलीमेना, न्यूकॅसल, लिव्हरपूल, श्रुजबरी, सॅलफोर्ड, टाँटन, बर्मिंगहॅम, डोव्हर, बोर्नमाउथ आणि ग्लासगो या शहरात मोठ्या प्रमाणात स्थानिक रस्त्यावर उतरले असून स्थलांतरितांना परत पाठवा अशा घोषणा देत आहेत.

=================

हे देखील वाचा : जातीय दंगलींनी राजाचा देश बेजार !

================

काही आंदोलकांनी जाळपोळ करुन दुकानांना आगी लावल्या आहेत. या घटना रोखण्यासाठी आलेल्या पोलीसांवरही हल्ले करण्यात येत आहेत. ब्रिटनमध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या झपाट्याने कमी असल्याचा अहवाल गेल्यावर्षी जाहीर करण्यात आला होता. २०२१ मध्ये येथे झालेल्या लोकसंख्येच्या अभ्यासातून ब्रिटनमध्ये ‘कोणताही धर्म नसलेली’ लोकसंख्या ख्रिश्चनांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर एका दशकात मुस्लिमांची संख्या ४४ टक्क्यांनी वाढली असल्याचा अहवाल राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केला आहे. या सर्वांमुळेच ब्रिटनमधून स्थलांतरितांना त्वरित बाहेर काढावे अशी मागणी करण्यात येत आहे. (Britain’s War on Immigrants)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.