Instagram tips : सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवर आजच्या काळात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक फोटो-व्हिडीओ पहायला मिळतात. या खाली दिलेले कॅप्शनही आवर्जुन वाचले जाते अथवा सेव्हही केले जाते. पण कधीकधी परफेक्ट कॅप्शन शोधण्यासाठी वेळ लागतो. ज्यावेळी कॅप्शन शोधण्यास समस्या येते तेव्हा इंस्टाग्राम तुम्हाला स्वत:हून कॅप्शन आता तयार करून देणार आहे. याच फीचरबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
इंस्टाग्राम करणार कॅप्शन शोधण्यास मदत
सोशल मीडियावर फोटो अपलोड करणे आजकाल कोट्यावधी युजर्सची पसंत आहे. जेवणाआधी ते फिरण्यापर्यंतचे फोटो बहुतांश युजर्स अपलोड करतात. जेव्हा एखादा व्यक्ती सेल्फी काढतो तेव्हा सर्वप्रथम इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर पोस्ट करतो. याखाली एक कॅप्शनही लिहिले जाते. जेणेकरुन लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला जाईल. अशातच कॅप्शन सर्च करण्यासाठी इंस्टाग्रामवर आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा वापर करू शकता. (Instagram tips)
एआयच्या मदतीने असे लिहा कॅप्शन
-एआयच्या मदतीने इंस्टाग्रामवर कॅप्शन लिहिण्यासाठी सर्वप्रथम सर्च बारमध्ये जाऊन मेटा एआय शोधा.
-एआय चॅट बॉक्स सुरू झाल्यानंतर नियम आणि अटी वाचून मान्य करा.
-आता Meta Ai सोबत चॅट करू शकता.
-आता टायपिंग बारमध्ये टाइप करा आणि फोटोसंदर्भातील कॅप्शन हवेय ते सांगा
-आता काही सेकंदामध्ये चॅट बॉक्समध्ये 10 कॅप्शन लिहून येतील.
-यामधील एक तुमच्या फोटोसाठी कॅप्शन निवडू शकता.