Home » दुबईतील या 4 मस्जिदची जगभरात होते चर्चा

दुबईतील या 4 मस्जिदची जगभरात होते चर्चा

दुबईत एकापेक्षा एक सुंदर अशी धार्मिक स्थळे आहेत. त्यापैकीच काही मस्जिदची जगभरात चर्चा केली जाते.

by Team Gajawaja
0 comment
Dubai Famous Mosques
Share

Dubai Famous Mosques : दुबईच्या सौंदर्यात अनेकजण पडतात. येथे एकापेक्षा एक उत्तम अशी फिरण्यासारखी ठिकाणे आहेत. याशिवाय दुबई एक इस्लामिक देश असून तेथे सुंदर अशी मस्जिदे आहेत. अशातच दुबईतील चार अशा मस्जिदबद्दल जाणून घेऊयात ज्याची जगभरात चर्चा केली जाते.

जुमेइराह मस्जिद
जुमेइराह मस्जिद दुबईतील सर्वाधिक मोठे आणि आला दर्जाचे मस्जिदीपैकी एक आहे. पांढऱ्या दगडापासून तयार केलेले मस्जिद अनेकांना आपल्या मोहात पाडते. या मस्जिदला इस्लाम धर्मातील शैली फातिमिद वास्तुकलेनुसार तयार करण्यात आले आहे. यामध्ये मोठे घुमट, खांब्यांवर बारीक नक्षीकाम अत्यंत खास आहेत. हे मस्जिद जुमेइराहच्या रस्त्यांवर आहे. याची मोठी खासियत अशी की, मस्जिदमध्ये नॉन-मुस्लिम व्यक्तींनाही परवानगी आहे.

ग्रँड बुर दुबई मस्जिद
ग्रँड बुर दुबई मस्जिदही अत्यंत सुंदर आहे. दुबईतील सर्वाधिक जुन्या मस्जिदीपैकी ग्रँड बुर दुबई मस्जिद आहे. हे दुबईतील धार्मिक आणि आध्यात्मिक आयुष्याचे केंद्र आहे. याची वास्तुकला पारंपारिक आणि आधुनिक तत्त्वांवर साकारण्यात आली आहे. सध्या मस्जिदमध्ये 45 लहान घुमट आणि 9 मोठे घुमट आहेच. याच्या खांबाची उंची 70m उंच आहे. हे मस्जिद मूळ रुपात 1900 मध्ये उभारण्यात आले होते. पण 1960 मध्ये पाडले गेले आणि पुन्हा 1998 मध्ये बांधण्यात आले. येथे 1200 जण बसतील ऐवढी मस्जिदची क्षमता आबे.

अल फारुक ओमार बिन अल खत्ताब मस्जिद
अल फारुक ओमार बिन अल खत्ताब मस्जिदचे नाव उमर बिन अल खत्ताब यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. जे पैगंबर मुहब्बत यांचे मित्र हते आणि अबू धाबीनंतर दुसरे खलीफा झाले. या मस्जिदला इस्तांबुलच्या निळ्या मस्जिदीच्या प्रेरणेवरुन उभारण्यात आले आहे. यामध्ये सुंदर वास्तुकला आणि नक्षीकाम अत्यंत खास आहे. मस्जिदचे बांधकाम वर्ष 2011 मध्ये पूर्ण झाले होते आणि याचे उद्घाटन शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम द्वारे करण्यात आले होते. (Dubai Famous Mosques)

शेख जायेद ग्रँड मस्जिद
शेख जायेद ग्रँड मस्जिद जगातील सर्वाधिक मोठ्या मस्जिदीपैकी एक मानले जाते. याचे सौंदर्य पाहून तुम्ही दंग व्हाल. या मस्जिदीत तुम्हाला इस्लामिक शैली आणि वास्तुकलेचा उत्तम संगम पहायला मिळेल. याचे डिझाइन वेगवळ्या इस्लामिक आर्किटेक्चर शैलींचे संगम आहे. यामध्ये मुघल आणि फारसीचा समावेश आहे.


आणखी वाचा :
ऑलिंपिक २०२४ वर दहशतवादी सावट ?
ट्रिप प्लॅन करताना या गोष्टी चुकूनही विसरु नका, अन्यथा उद्भवेल समस्या

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.