Home » चक्क हत्तीणीनं दिला जुळ्या बाळांना जन्म

चक्क हत्तीणीनं दिला जुळ्या बाळांना जन्म

by Team Gajawaja
0 comment
Thailand Elephants
Share

थायलंड या देशाला त्याच्या संस्कृतीसाठी ओळखले जाते. जगभरातून पर्यटक थायलंडमध्ये येतात.  येथील निसर्ग, विस्तृत समुद्र किनारे आणि जंगले ही पर्यटकांच्या आवडीची स्थाने आहेत. सोबत थायलंडमधील हत्तींसाठी केलेले विशेष केंद्रही पाहण्यासाठी हजारो पर्यटकांची गर्दी असते. 

आता याच थायलंडमधील हत्ती सुविधा केंद्रामध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. त्याची चर्चाच एवढी झाली की, थायलंडच्या या हत्ती सुविधा केंद्राला भेट देणा-या पर्यटकांची संख्या दुप्पटीनं वाढली आहे. (Thailand Elephants)

तर या थायलंडमधील हत्ती सुविधा केंद्रातील एका हत्तीणीनं चक्क जुळ्या बाळांना जन्म दिला आहे.  ही आत्तापर्यंतची सर्वात आश्चर्यकारक घटना म्हटली जाते. ज्या हत्तीणीला हे दुसरं बाळ झालं, तिलाही हा प्रकार नवीन होता.  एका पिल्लाला गोंजारत असलेल्या हत्तीणीला काहीवेळानं दुसरं पिल्लू झाले. त्याला पहाताच ही हत्तीणही गोंधळून गेली. हत्तींना जुळे होणे ही दुर्मिळ घटना मानली जात आहे.  त्यामुळे या जुळ्या हत्तीच्या पिल्लांना पहाण्यासाठी पर्यटकांची एकच गर्दी उसळली आहे. (Thailand Elephants)  

थायलंडमध्ये हत्तींना विशेष महत्त्वाचे स्थान आहे.  येथे हत्तीची पुजा केली जाते.  त्यामुळे हत्तींसाठी येथे हत्ती सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.  याच हत्ती सुविधा केंद्रामध्ये एक हत्तीणीवर उपचार चालू होते.  ही हत्तीण पिलाला जन्म देणार होती, म्हणून तिच्यावर उद्यानातील कर्मचा-यांनी लक्ष ठेवले होते. (Thailand Elephants)

या हत्तीणीच्या बाळंतपणाची वेळ आल्यावर मात्र या कर्मचा-यांची दाणादाण उडाली.  कारण या हत्तीणीने  चक्क जुळ्या पिल्लांना जन्म दिला. थायलंडमध्ये हत्तींना अतिशय पवित्र मानले जाते.  त्यातच  हत्तींना जुळी पिल्लं होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. 

त्यामुळेच हा एक चमत्कार मानला गेला आहे. ही जुळी हत्तींची जोडी सुख आणि समृद्धीचे प्रतिक असल्याचे मानण्यात येत आहे.  पण ज्या हत्तीणीनं या जुळ्यांना जन्म दिला, ती मात्र सुरुवातीला घाबरली होती. तीनं घाबरुन दुस-या पिल्लाला मारण्याचीही प्रयत्न केला.  

हत्तींच्या प्रजातींमध्ये जुळी पिल्लं होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना मालनी जाते.  थायलंडमध्ये एका हत्तीणीने जुळ्यांना जन्म दिला जगभरातील प्राणी प्रेमींमध्ये पसरली आणि सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. थायलंडच्या हत्ती सुविधा केंद्रात हत्तींची काळजी घेण्यासाठी खास कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Thailand Elephants)

या कामगारांच्या मते हा त्यांच्या आजवरच्या आय़ुष्यातील सर्वात मोठा चमत्कार आहे.  चामचुरी असे या हत्तीणीने जुळ्या पिल्लांना जन्म दिला आहे.  तिचे वय  ३६ वर्षे आहे. तिने जुळ्यांना जन्म देणे अपेक्षित नव्हते.  या केंद्रात वैद्यकीय सुविधाही असून ज्या हत्तीणींना बाळ होणार आहे, त्यांची तपासणही करण्यात येते. 

मात्र चामचुरीला जुळं होणार आहे, याचा अंदाजही या तपासणीत आला नाही.  आयुथया एलिफंट पॅलेस आणि रॉयल क्रॅलमधील कर्मचाऱ्यांना मात्र तिला जुळं पिल्लू झाल्यावर मोठा धक्काच बसला.  चामचुरी हत्तीणीला पहिले पिल्लू झाले, तो नर हत्ती होता.  त्या पिल्लाला बाजुला काढून साफसफाई करत असतांना चामचुरी हत्तीण पुन्हा अस्वस्थ झाल्याचे त्यांनी पाहिले. (Thailand Elephants)

तिला वेदना होत असाव्यात असा विचार करत त्यांनी नुकत्याच झालेल्या लहान पिल्लाला स्वच्छ करुन चामचुरीच्या ताब्यात दिले. पण तेवढ्यात एक मोठा आवाज झाला आणि चामचुरीच्या दुस-या पिल्लाचा जन्म झाला. या आवाजानं चामचुरी हत्तीणही घाबरलेली दिसली.  तिनं नवजात पिल्लाला मारण्याचाही प्रयत्न केला. त्याच्यावर पाय ठेवणार इतक्यात चामचुरीची केएर टेकर असलेल्या ३१ वर्षीय माहूत चारिन सोमवांग यांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. 

यात चामचुरीचा पाय त्यांच्या पायावर पडला. सोमवांग याच्या पायाला मोठी दुखापत झाली असली तरी त्यांना त्यांच्या वेदना जाणवल्या नाहीत.  कारण चामचुरीच्या दुस-या पिल्लाला वाचवल्याचा आनंद त्यांना अधिक आहे.  सेव्ह द एलिफंट्स संस्थेच्या म्हणण्यानुसार, हत्तींमध्ये  जुळी पिल्ल होण्याचे प्रमाण फक्त एक टक्का आहे. 

या सर्व वेळ  पशुवैद्य असलेले लार्डथॉन्गटारे मीपनही तेथे उपस्थित होते. हत्तीणीच्या दोन्ही पिल्लांना एकत्र बघणे हा मोठा आनंद आणि चमत्कार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. थायलंडमध्ये, हत्तींना पवित्र मानले जाते.  हत्ती हे तेथील राष्ट्रीय चिन्ह आहे.अशा देशात हत्तीणीनं जुळ्या पिल्लांना जन्म दिला ही बातमी सर्वदूर गेल्यावर या पिल्लांना बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. (Thailand Elephants)

=============

हे देखील वाचा : मिथुन चक्रवर्तींच्या एका खोटेपणामुळे ऋषी कपूर यांना गमवावा लागला असता जीव, वाचा किस्सा…

=============

उद्यानानं या जुळ्या पिल्लांचे छायाचित्र सोशल मीडियावरही शेअर केले आहे. या पिल्लांचे नाव ठेवण्याचा विधी आता मोठ्या समारंभात केला जाणार आहे.  थायलंडमधील प्रथेनुसार सात दिवसांनी त्यांचे नाव ठेवण्यात येईल.  यावेळी मोठी पुजाही करण्यात येणार आहे.  

थायलंडच्या संस्कृतीत हत्तींना समृद्धीचे प्रतिक मानले जाते. येथील राजघराण्यानंही हत्तींना मानाचे स्थान दिले आहे.  थायलंडचा स्वदेशी असलेला पॅचीडर्म हा आशियाई हत्ती आहे. 20 व्या शतकाच्या सुरुवातीस थायलंडच्या जंगलात सुमारे ३००००० वन्य हत्ती आणि १००००० पाळीव हत्ती होते.  आता ही संख्या कमी झाली आहे. थायलंडमध्ये फक्त सहा हजार हत्ती शिल्लक आहेत.   त्यामुळे या हत्तींना वाचवण्यासाठी थायलंड सरकार हरप्रकारे प्रयत्न करीत आहेत.  आता त्यात या दोन पिल्लांची भर पडल्यानं आनंद व्यक्त होत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.