Eye Care in Summer : कडाक्याचे ऊन आणि उष्माघातामुळे आरोग्यासंबंधित काही समस्या सुरू होतात. कधीकधी शरिरातील पाणी कमी झाल्यास त्याचा प्रभाव डोळ्यांच्या आरोग्यावर झाल्याचे दिसून येते. अशाकच हिट वेवचा आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दलही जाणून घेणार आोत.
उन्हाळ्यात डोळ्यांची घ्या काळजी
गेल्या दिवसांपासून संपूर्ण भारतातील काही ठिकाणी उष्णतेने आपला पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार गाठला आहे. अशातच सनस्ट्रोक आणि डिहाइड्रेशनच्या समस्येचा धोका अधिक वाढला गेला आहे. याशिवाय कडक उन्हाचा संपर्क थेट डोळ्यांशी येत असल्यानेही त्याच्यावरही परिणाम होत आहे. सनस्क्रिन किंवा फेस मास्क लावला तरीही उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ इनवायरमेंट हेल्थ अँड पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, कडाक्याच्या उन्हाचा आरोग्याला होणारा त्रास अधिक वाढला गेला आहे. हेच कारण आहे की, उन्हाळ्यात डोळ्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.
उष्णतेच्या लाटेमुळे डोळ्यांमध्ये दिसतात ही लक्षणे
डोळे कोरडे होणे
जर तुमचे डोळे जळजळ करत असतील तर हे एक इंफेक्शनचे लक्षण असू शकते. खरंतर उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ होऊ लागते. गरम हवेमुळे डोळ्यांचा ओलसरपणा कमी होतो. यामुळेच डोळे कोरडे होण्याची समस्या अधिक वाढली जाते.
डोळ्यासंबंधित अॅलर्जी
डोळ्यातून सातत्याने पाणी येत असल्यास अथवा भूरकट दिसत असल्यास डोळ्यासंबंधित अॅलर्जी झाल्याचे हे लक्षण आहे.
डोळे सूजणे
कडक उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ होण्यासह त्यांना खाजही येते. याच कारणास्तव डोळ्यांना सूज येते. सातत्याने डोळ्यांतून पाणी येणे देखील इंफेक्शनचे एक कारण असू शकते. याशिवाय व्हायरल कंजंक्टिवाइटिस एक बॅक्टेरियल इंफेक्शन आहे. हे इंफेक्शन झाल्यास डोळ्यांना सूज येते. यामुळेच डोळ्यांनी भूरकट दिसते. अशा व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तुम्ही देखील संक्रमित होऊ शकता. (Eye Care in Summer)
टेरिजियम
टेरिजियम अशी एक हेल्थ कंडीशन आहे जेथे डोळ्यांमधील सेल्सची अधिक वाढ होऊ लागते. याच कारणास्तव डोळ्यांना स्पष्टपणे दिसणे कमी होते. डोळ्यांचा अल्ट्रावॉयलेट किरणांसोबत संपर्क येतो. याच कारणास्तव टेरिजियमचा धोका वाढला जातो.