भारताला पुढची वर्ष ही तीव्र उष्णतेच्या लाटांचा सामना करणारी असतील. मानवी सहनशक्तीच्या मर्यादेपलीकडे या उष्णतेच्या लाटा असतील असा अहवाल ‘इंडिया क्लायमेट अँड डेव्हलपमेंट पार्टनर्स‘ च्या बैठकीत काही दिवसांपूर्वी देण्यात आला आहे. हा भीतीदायक अहवाल आला असला तरी भारत आणि आशियामधील बदलत्या हवामानाचे भविष्य १५ व्या शतकात लिहून ठेवले आहे, असे सांगितल्यास आश्चर्य वाटेल. (Nostradamus)
मात्र प्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेक्ता नॉस्ट्राडेमस यांनी आपल्या पुस्तकात भारतातील या वाढत्या हवामानाचा उल्लेख केला आहे. एप्रिल महिन्यापासून भारतातील अनेक शहरात पारा चाळीच्या पार गेला. उन्हानं तापलेल्या या शहरांबाबत या ज्योतिषवक्त्यानं केलेली भविष्यवाणी ही चिंता व्यक्त करणारी आहे. या भविष्यवाणीसह नॉस्ट्राडेमसनं आणखी एक रहस्यमय भविष्यवाणी केली आहे. त्याच्या मते भारतात हिमालयातील साधू प्रकट होणार आहे. नॉस्ट्राडेमसची ही भविष्यवाणीही खरी होणार का याबद्दल चर्चा चालू आहे. (Nostradamus)
फ्रेंच ज्योतिषवक्ता नॉस्ट्राडेमस याच्या भविष्यवाणीची चर्चा प्रत्येक वर्षात केली जाते. नववर्ष सुरु होण्याआधी या वर्षात काय होणार याचा अंदाज नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीवरुन घेण्यात येतो. नॉस्ट्राडेमसने १५व्या शतकाच्या आसपास आपल्या ‘लेस प्रोफेसीज‘ या पुस्तकात लिहिलेली अनेक भाकीते खरीही झाली आहेत. त्यात जागतिक युद्धांबाबत संकेत दिले होते. अमेरिकेच्या ट्विन्स टॉवरवरील हल्ल्याचेही संकेत होते. ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय हिच्याबाबतही नॉस्ट्राडेमसने आधीच सांगून ठेवले होते.
त्यामुळेच नॉस्ट्राडेमसची (Nostradamus) भविष्यवाणी खरी होते, असे अनेकजण मानतात. याच नॉस्ट्राडेमसने भारताच्या बदलत्या हवामानाचाही उल्लेख आपल्या लेस प्रोफेसीज या पुस्तकात केला आहे. नॉस्ट्रॅडॅमसने भारताच्या भौगोलिक परिस्थितीबद्दल केलेली ही भाकीते आहेत. यात नैसर्गिक आपत्ती, बदलते हवामान, कडक उष्मा, भूकंप, चक्रीवादळे यांचा समावेश आहे. नॉस्ट्राडेमसच्या या भविष्यवाणीनुसार भारतात २०२४ ते २०२५ ही वर्ष सर्वाधिक उष्म्याची असणार आहेत. त्यानुसार एप्रिल सुरु होताच भारतातील अनेक शहरात अचानक उष्म्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून पुढच्या मे महिन्यात यापेक्षाही अधिक कडक उन्हाळा असणार हे स्पष्ट झाले आहे.
नॉस्ट्रॅडॅमसने (Nostradamus) त्याच्या भविष्यवाणीत बदलत्या हवामानाचा हा फटका असल्याचे सांगितले आहे. याशिवाय नॉस्ट्राडेमसने नैसर्गिक आपत्तींचे हे वर्ष असल्याचेही सांगितले आहे. तसेच आकाशातून मोठे संकट कोसळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. नॉस्ट्राडेमसच्या मते, धूमकेतू आकाशातून पृथ्वीवर पडू शकतो. यामुळे प्रचंड मोठा विनाश होणार आहे. पृथ्वीवर मोठे वादळ येईल. त्यात मोठी मनुष्यहानी होईल. अनेकांचा संपर्क तुटेल असेही त्यांनी भविष्यात सांगितले आहे. याशिवाय दुसऱ्या परग्रहावरील लोकांचा हल्लाही पृथ्वीवर होण्याची भविष्यवाणी नॉस्ट्राडेमसने केली आहे.
अर्थात परग्रही केव्हा येतील तेव्हा येतील, मात्र सध्यातरी नॉस्ट्राडेमसची भविष्यवाणी खरी होऊ पहात आहे. भारतासह जगभरातील वातावऱणात मोठे बदल होत आहेत. नॉस्ट्राडेमसने या वर्षी अनेक ठिकाणी पूर आणि काही ठिकाणी दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली आहे. नॉस्ट्राडेमसने जपानच्या किनारी शहरांबाबत इशाराही दिला होता. त्याप्रमाणे गेल्या महिन्यात जपानमध्ये मोठा भुकंप आला आहे. या भुकंपाचा परिणाम म्हणून जपानचा समुद्र किनारा दोन फुटबॉलचे अंतर होईल, एवढा मागे सरकला आहे. याशिवाय नॉस्ट्राडेमसने चक्रीवादळे विक्रमी संख्येने येतील असेही सांगितले आहे.
============
हे देखील वाचा : सौदी अरेबियामधील महिला मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी
============
सध्या अमेरिकेमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. पाच राज्यांमध्ये ९५ हून अधिक वादळांची नोंद झाली आहे. वादळामुळे शेकडो घरे आणि इमारती जमीनदोस्त आहेत. काही शहरात आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. याशिवाय नॉस्ट्राडेमसने काही काळ पृथ्वीवर अंधार होईल अशीही भविष्यवाणी केली आहे. त्याला अमेरिकेत झालेले ग्रहण जोडून घेण्यात येत आहे.
याशिवाय नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीमधील २०२४ साठी एक भाग उत्सुकतेचा आहे, तो म्हणजे, पूर्वेकडील देशात दैवी ऋषी-मुनी तपश्चर्या करत हिमालयात जाईल. त्यांच्या रहस्यांची आणि चमत्कारांची चर्चा जगभर होईल. हा दिव्य पुरुष हजारो वर्षांपासून जिवंत आहे. हा पूर्वेकडील देश म्हणून भारताचा उल्लेख असल्याचे काहींचे म्हणणे आहे. नॉस्ट्राडेमसच्या या भविष्यवाणीनुसार भारातील तापमानाची पारा सध्या वाढलेला आहे. आता त्याची भारताबाबतची दुसरी भविष्यवाणी कधी खरी होईल, याची उत्सुकता आहे.
सई बने