आफ्रिकेतील सातवा सर्वात मोठा देश असलेल्या मालीमध्ये पाण्याची आणीबाणी निर्माण झाली आहे. या देशातील तापमानाचा पारा ४८ अंश सेल्सिअस पार झाला असून तो पन्नाशीपर्यंत जाईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. या परिस्थितीत तेथील जलस्त्रोतही आटल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फार काय मालीमध्ये एका पावाच्या किंमतीपेक्षा एक कप बर्फाची किंमत जास्त आहे. मालीची राजधानी असलेल्या बामाको येथेही पाण्याची कमालीची कमतरता जाणवत आहे. (Africa)
त्यातच बामाकोचे तापमानही ४८ अंशाच्या पुढे गेले आहे. जगातील सर्वात गरीब देशांमध्ये माली या देशाचा समावेश आहे. सोन्याच्या खाणी असलेल्या या देशात पाण्याच्या अभावामुळे मात्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मालीची ही परिस्थिती आफ्रिका आणि आशिया देशांसाठी एक आरसा असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. येथील सर्व देशांमध्येही उष्म्याचे प्रमाण वाढले असून पाण्याचे स्त्रोत आटत आहेत. (Africa)
माली, या अफ्रिकेतील आणखी एका देशावर तीव्र उष्णतेमुळे भीषण परिस्थिती ओढावली आहे. येथे चक्क बर्फाच्या तुकड्यासाठी नागरिक आपापसात लढत आहेत. बर्फाचे दरही गगनाला भिडले आहेत. पाण्याच्या तुटवड्यामुळे येथील बहुतांशी विद्युत निर्मिती केंद्र बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे विजेअभावी घरांमधील रेफ्रिजरेटर आणि पंखेही बंद असतात. अशावेळी थंड पाणी किंवा बर्फासाठी मोठ्या दुकानांचा नागरिकांना आसरा घ्यावा लागतो. येथे एका पावाच्या तुकड्यापेक्षा बर्फाची किंमत जास्त आहे. बर्फ घेण्यासाठी येथील दुकानांच्या समोर लांबच लांब रांगा लागलेल्या असतात आणि याच बर्फावरुन येथे आता वादविवाद होत आहेत. या सर्वात मालीमधील महिलांना सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (Africa)
मालीमधील हवामान गेल्या काही वर्षापासून बदलत आहे. येथील तापमानाचा पारा कायम चाळीशीपार असतो. आता उन्हाळ्याच्या दिवसात हा पारा ४८ अंश सेल्सिअस पार झाला आहे. उच्च तापमान आणि वारंवार येणा-या उन्हाळी लाटांमुळे येथील मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडला आहे. पाणी आणि अन्नव्यवस्थेची साखळी पूर्णपणे तुटली आहे.
जवळजवळ एक चतुर्थांश लोकसंख्येला अपुरे अन्न मिळत आहे. २०२३ पासून ही परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की येथील घराघरात पाण्याचा ठराविक साठा दिला जात आहे. घरातील सर्वच विद्युत साधने विजेअभावी बंदच असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सार्वजनिक सेवांवर नागरिकांना अवलंबून रहावे लागत आहे. या सेवाही पुरेशा नाहीत. येथील नागरिक बर्फासाठी एकमेकांशी भांडणे करत असल्याचे दृश्य आता नेहमीचे झाले आहे. (Africa)
राजधानी बामाकोमध्ये दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे घराघरातील रेफ्रिजरेटर्स बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे राजधानीत असलेल्या बर्फ निर्माण करणा-या कारखान्यासमोर नागरिक रांग लावत आहेत. येथील परिस्थिती एवढी भयानक आहे की, येथील महिलांना रोज अन्न शिजवा असे सांगायची वेळ आली आहे. फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न विजेअभावी वाया जात आहे. त्यातच अन्नधान्याचाही येथे होणारा पुरवठा कमी होत चालला आहे. त्यामुळे रोज थोडे अन्न शिजवा असा प्रचार आता करण्यात येत आहे. मार्चपासून, मालीच्या काही भागांमध्ये तापमान ४८ अंश सेल्सियसच्या वर गेले आहे, त्यामुळे १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बामाको येथील युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये उष्म्याच्या त्रास होणा-यांसाठी विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. (Africa)
===========
हे देखील वाचा : सुनीता विल्यम्स पुन्हा करणार अंतराळ प्रवास
============
या सर्वात काळजीची गोष्ट अशी की, वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशन म्हणजेच WWAच्या शास्त्रज्ञांच्या मते अशीच परिस्थिती काही वर्षात मालीच्या शेजारील अन्य देशांमध्येही होणार आहे. तसेच आशियामधील देशांनाही अशाच उष्म्यासाठी तयार व्हावे लागणार आहे. या देशात पुढच्या काही वर्षात तापमानाचा पारा हा ५० च्या पुढे जाईल, ही नित्याची बाब होणार आहे.
या देशांमध्ये अपघातापेक्षा सर्वाधिक मृत्यू हे उष्माघातानं होणार आहेत. तसेच या देशांमध्ये पाण्याचीही तीव्र टंचाई निर्माण होणार आहे. आफ्रिकासह आशियातील देशांची परिस्थिती एवढी गंभीर होईल की, तिथे पाण्याअभावी अन्नधन्य उत्पादनातही कमालीची घट होणार आहे. या देशांमधील पाण्याची पातळी ही खालावली आहे. यासाठी ठराविक महिन्यात येणा-या पावसाचा थेंब आणि थेंब साठवण्याची गरज आहे. अन्यथा सर्वच देशात मालीसारखी पाण्याची आणीबाणी जाहीर कऱण्याची वेळ येणार आहे.
सई बने