Voting in election : भारत लोकशाही देश आहे. जेथे नागरिकांना आपले सरकार निवडण्याची संधी मिळते. अशातच तुम्हाला माहितेय का, काही लोक अशी असतात ज्यांना भारतात राहूनही मतदान करता येत नाही. खरंतर असे भारताचे संविधान सांगते. याचबद्दल जाणून घेऊया सविस्तर….
भारतातील ही लोक करू शकत नाहीत मतदान
-भारतात अशी काही लोक असतात ज्यांचे नाव मतदार यादीत असते पण त्यांना मतदान करता येत नाही. भारताच्या संविधानात याचा उल्लेखही आहे. जसे की, एखादा व्यक्ती मानसिक रुपात आजारी असल्यास त्याला मतदान करण्याचा अधिकार नाही. अशातच मानसिक आजारी असणाऱ्या व्यक्तीला निवडणुकीत मतदान करता येत नाही.
-याशिवाय भारताच्या संविधानानुसार अशा नागरिकांनाही मतदान करण्याची परवानगी नाही जे परदेशात स्थायिक झाले आहेत. जसे की, तुम्ही विदेशात स्थायिक झाले असाल आणि तेथील नागरिकत्व घेतले असल्यास तुम्हाला भारतात होणाऱ्या मतदानावेळी मतदान करता येत नाही.
-तुमचे वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे आणि तुमचे नाव मतदार यादीत नसल्यास तुम्हाला मतदान करता येत नाही. एकवेळ तुमचे मतदान कार्ड हरवल्यास तुम्ही मतदान करू शकता. पण मतदार यादीत नाव नसल्यास मतदान करण्याची परवानगी दिली जात नाही. (Voting in election)
-एखाद्या गुन्ह्याखाली तुरुंगात गेले असल्यास आणि तुरुंगात बंद असल्यास तरीही मतदान करण्याचा अधिकार नसतो. दरम्यान, काही कैद्यांना मतदान करण्यासाठी सूटही दिली जाते.