Home » एका वर्षात मोडले होते लग्न, बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाला हा अभिनेता

एका वर्षात मोडले होते लग्न, बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाला हा अभिनेता

बॉलिवूडमधील असा एक अभिनेता ज्याने 2000 च्या दशकात आपल्या लुकमुळे सलमान खानला टक्कर दिली जात होती. अभिनेत्याने इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. तरीही हाती अपयश आले.

by Team Gajawaja
0 comment
Bollywood
Share

Bollywood : सलमान खान आजही सिनेसृष्टीत आपल्या अभिनय आणि लुकमुळे नेहमीच चर्चेत असतो. वर्ष 2000 च्या दशकात बॉलिवुडमध्ये असा एक अभिनेता होता ज्याच्या लुकवर अनेकजण फिदा व्हायचे. खरंतर, ‘स्टाइल’ आणि ‘एक्सक्यूज मी’ सारख्या सिनेमामधून शरमन जोशीसोबत झळकलेला साहिल खानला इंडस्ट्रीमध्ये अपयश आले. म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून रातोरात स्टार झालेल्या साहिल खानला काही सिनेमांमध्येही कास्ट करण्यात आले होते. पण अभिनयातही तो अपयशी ठरला.

टायगर श्रॉफच्या आईसोबत जोडले गेले नाव
अभिनेता साहिल खान आपल्या सिनेमांसह खासगी आयुष्यामुळेही लाइमलाइटमध्ये असायचा. साहिल खानचे नाव एका वादातही आले होते. ज्यावेळी टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफने त्याच्यावर पैशांसंबंधित फसवणूक केल्याचा आरोप लावला होता. या आरोपानंतर मीडियामध्ये आयशा आणि साहिलच्या अफेअरची चर्चा झाली.

एका वर्षात मोडले लग्न
अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्याने वर्ष 2004 मध्ये मॉडल नीगार खानसोबत लग्न केले होते. पण एका वर्षातच दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. लग्नानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले हते. अखेर प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचले होते. (Bollywood)

बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून कमावतो पैसे
सिनेसृष्टीत यश मिळवण्यासाठी अभिनेता साहिल खानने अभिनय आणि ग्लॅमरच्या जगाला कायमचे अलविदा केले होते. सध्या साहिल खान सिनेसृष्टीच्या मोठ्या पडद्यापासून दूर झाला असून बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात सक्रिय आहे. याच्या माध्यमातून साहिल तगडी कमाई करतो.

(अशाच मनोरंजनासंबंधितच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)

आणखी वाचा :
उदरनिर्वाहासाठी केली होती टुथपेस्टच्या रिकाम्या डब्याची विक्री… आज आहे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री
वर्ष 1977 मधील ‘या’ ब्लॉकबस्टर सिनेमाने बॉक्स ऑफिसच नव्हे तर परदेशातही केली होती जबरदस्त कमाई
4-5 वर्ष बेरोजगारी, गटरात झोपून घालवल्या रात्री पण नंतर असे बदलले आयुष्य!

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.