Health Care : जगभरात प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिण्याऱ्यांची संख्या दिवसागणिक वेगाने वाढत चालली आहे. प्रवास करताना, फिरताना तुम्ही देखील प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पित असालच ना? खरंतर मोठ्या प्रमाणात घरात देखील पाणी स्टोअर करण्यासाठी प्लास्टिकच्या बॉटलचा वापर केला दातो. पण असे करणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असा खुलासा झाला आहे की, एक लीटर प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटलमध्ये जवळजवळ 24 हजार नॅनो प्लास्टिकचे तुकडे असतात. जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. हे कण ऐवढे लहान असतात की, व्यक्तीच्या रक्तात मिक्स होऊ शकतात.
प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अॅकेडमी ऑफ साइंसेज (PNAS) जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे. संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना दावा केलाय की, प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटलमध्ये आढळणारे कण अत्यंक बारीक असतात. हे कण आपल्या शरीरातील पेशी आणि रक्तात मिक्स होऊन शरीरातील अवयवांना नुकसान पोहोचवू शकतात. ऐवढेच नव्हे तर प्लास्टिकचे हे कण गर्भात असलेल्या बाळाच्या आरोग्यालाही नुकसान पोहोचवू शकतात. प्लास्टिकमधील हे कण आपल्या केसांच्या रूंदीच्या 17व्या हिस्स्यापेक्षाही लहान असतात. ते उघड्या डोळ्यांनी पाहणे शक्य नाही.
प्लास्टिकच्या बॉटलमध्ये दोन लाखांपेक्षा अधिक कण असले तरीही कोणालाही दिसू शकत नाहीत. या अभ्यासाच्या आधारावर असे म्हटले जाऊ शकते की, प्लास्टिकच्या बॉटल मधील पाणी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. यामुळे आपल्या शरीरात लाखोंच्या संख्येने प्लास्टिकचे कण शिरकाव करू शकतात. हा अभ्यास कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि रटगर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. यापूर्वीही काही अभ्यासातून प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटलमध्ये नॅनो प्लास्टिक असल्याची बाब समोर आली होती. (Health Care)
दरम्यान, प्लास्टिक प्रदूषण पृथ्वीवर सर्वत्र आहे. यमुळे प्लास्टिकच्या बॉटलमधील पाण्यासंदर्भात वैज्ञानिक अधिकाधिक संशोधन करत आहेत. याशिवाय प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटलमधील कण मानवाच्या शरिरात जाऊ शकतात. वर्ष 2022मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असे समोर आले होते की, प्लास्टिकच्या बॉटलमधील पाण्याता माइक्रो प्लास्टिकचे कंसंट्रेशन हे नळातील पाण्याच्या तुलनेत अधिक होती. याशिवाय वर्ष 2021 मध्ये एका रिपोर्टमध्ये म्हटले होते की, प्लास्टिकची पाण्याची बॉटल उघडली किंवा बंद केल्याने प्लास्टिकचे लहान कण पाण्यात मिक्स होऊ शकतात. यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
