Haka Dance : न्युझीलँडमधील खासदार हाना-राहिती माइपे क्लार्कची (Hana-Rawhiti Maipi-Clarke) चर्चा होत आहे. तिने न्युझीलँडच्या संसदेत केलेल्या हाकाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हाना राहिती, न्युझीलँडमधील सर्वाधिक तरुण खासदार आणि माओरी जातिमधील आहे. माओरी भाषेत हाकाचा अर्थ नृत्य असा होतो.
हाका हे काही समान्य नृत्य नाही. हा एक प्राचीन नृत्याचा प्रकार आहे. या नृत्यामधून माओरी जातीचा गौरव, सन्मान आणि एकात्मतेचे उग्र प्रदर्शन दाखवले जाते. याबद्दलच जाणून घेऊया अधिक….
सूर्यदेवांच्या मुलापासून हाकाची निर्मिती
माओरीमधील पौराणिक कथांनुसार, सूर्य देवत तम-नुई-ते-रा यांच्या दोन पत्नी होत्या. एक हिन-रौमती आणि दुसरी हिन ताकुरुआ. हिन रौमती ही उन्हाळ्याची आणि ताकुरुआ ही हिवाळ्याच्या ऋतूची देवता होती. हिन रौमतीपासून तम-नुई-ते-रा को यांना एक मुलं झाले. याचे नाव ताने-रोर असे ठेवण्यात आले. हाका डान्सच्या उत्पत्तीचे श्रेय तान-रोर याला दिले जाते. ताने-रोर आपल्या आईसाठी डान्स करायचा. यामुळे हवेत अशी कंपने निर्माण व्हायची जशी उन्हाळ्यावेळी असायची. या कंपनांना हाकाद्वारे हातांच्या इशाराने दाखवले जायचे.
पारंपारिक रुपात हाका हे युद्धासाठी जाणाऱ्या योद्ध्यांना उत्साहित करण्याचे काम करायचे. हे एक शारीरिक कौशल्याचे प्रदर्शन असायचे. त्याचसोबत सांस्कृतिक गौरव, शक्ती आणि एकतेचे प्रतीकही असायचे.
New Zealand natives’ speech in parliament pic.twitter.com/OkmYNm58Ke
— Enez Özen | Enezator (@Enezator) January 4, 2024
हाका नक्की आहे तरी काय?
हाका डान्समध्ये जोरजोरात ओरडण्यासह जमीनीवर पाय मारणे, जीभ बाहेर काढणे आणि लयबद्ध पद्धतीने शरिराची हालचाल करणे. हाका हा जनजातीच्या क्षेत्रानुसार वेगवेगळा असतो. काही हाका ईवी (जात)च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांची कथा सांगतात. हाकाचे अशीही काही रूपे आहेत, हा डान्स हत्यांसोबत देखील केला जातो. (Haka Dance)
आज हाका डान्सला सन्मानाच्या रुपात ओळखळे जाते. तो खेळ, एखादा कार्यक्रम, लग्न आणि पांरपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या स्वागतावेळी केला जातो.
न्युझीलँडमधील रगबी टीमही करायची हाका डान्स
न्युझीलँडमधील रगबी टीम परदेशात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये हाका डान्स करायचे. 1986 पासून हाका देशाअंतर्गत सामान्यांमध्ये करण्यास सुरूवात झाली. असे मानले जाते की, याची रचना 1800 च्या दशकाच्या सुरूवातीला माओरी वॉरियर प्रमुख ते रौपराहा यांनी केली होती.