Home » टीनएज माइग्रेनची ‘ही’ आहेत लक्षणे

टीनएज माइग्रेनची ‘ही’ आहेत लक्षणे

डोकेदुखी सध्याच्या काळात एक सामान्य समस्या झाली आहे. लहान मुलं ते वयोवृद्ध या समस्येचा सामना करत आहेत. सर्वसामान्यपणे डोकेदुखीमुळे त्रास होणे कॉमन बाब आहे.

by Team Gajawaja
0 comment
teenage migraine
Share

डोकेदुखी सध्याच्या काळात एक सामान्य समस्या झाली आहे. लहान मुलं ते वयोवृद्ध या समस्येचा सामना करत आहेत. सर्वसामान्यपणे डोकेदुखीमुळे त्रास होणे कॉमन बाब आहे. पण माइग्रेनमध्ये होणारी डोकेदुखी अत्यंत भयंकर असते. सध्याच्या दिवसात कमी वयातील तरुणांमध्ये माइग्रेनचा त्रास अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच तुमचे मुलं सुद्धा माइग्रेनच्या समस्येचा सामना करत असेल तर त्याच्या शरीरात काही प्रकारचे बदल दिसून येऊ शकतात. जाणून घेऊयात टीनएज माइग्रेनची नक्की लक्षणे काय आहेत त्याबद्दलच अधिक. (Teenage migraine)

लक्षणे काय आहेत?
-भयंकर डोके दुखणे
-झोपेची समस्या
-चक्कर येणे
-एकाग्रतेची कमतरता
-चिंता
-डिप्रेशन

Teenage Migraine - AGA Clinical Trials

कारणे काय आहेत?
माइग्रेन नक्की कोणत्या कारणामुळे होतो या बद्दल कोणातीही रिसर्च अद्याप समोर आलेला नाही. काही रिपोर्ट्सनुसार टीनएममध्ये होणारा माइग्रेन अनुवांशिक असू शकतो. जर तुमच्या परिवारातील एखाद्या व्यक्तीला माइग्रेनची समस्या असेल तर पुढे जाऊन मुलांना सुद्धा त्याचा सामना करावा लागतो. मुख्य रुपात आई-वडिलांना माइग्रेन असेल तर ७० टक्के शक्यता असते की, मुलांना सुद्धा तो त्रास होऊ शकतो.

तसेच काही रिसर्च असे ही म्हणतात, पुरुषांच्या तुलनेत महिला या समस्येचा अधिक सामना करतात. टीनएज मध्ये महिलांना माइग्रेनची समस्या होऊ शकते. पुरुषांमध्ये टीनएजमझ्ये होणारी माइग्रेनची शक्यता फार कमी असते. (Teenage migraine)

उपचार काय?
जर तुमचे मुलं माइग्रेनच्या समस्येचा सामना करत असेल तर अशा स्थितीत तु्म्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर माइग्रेनच्या उपचारासाठी काही प्रकारच्या ट्रिटमेंट किंवा अँन्टी इंफ्लेमेंटरी औषध देतात. तर उलटी रोखणारी औषधे सुद्धा घेण्याचा सल्ला देतात. या व्यतिरिक्त लाइफस्टाइलमध्ये बदल करावा असे ही सांगितले जाते. जसे की,
-खाण्यापिण्यात कमीत कमी साखरेच्या पदार्थांचा समावेश करावा
-उत्तम आणि पुरेशी झोप घ्यावी
-माइग्रेनला ट्रिगर करणाऱ्या गोष्टींपासून दूर रहावे


हेही वाचा- Bottle Gourd Juice Benefits: मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी गुणकारी आहे दूधी भोपळ्याचा रस !


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.