Home » जॉब व्यतिरिक्त करू शकता ‘ही’ कामे

जॉब व्यतिरिक्त करू शकता ‘ही’ कामे

काही वेळेस असे होते की, कितीही प्रयत्न केला तरीही उत्तम नोकरी मिळत नाही. काही लोकांचे एखाद्या खास, आवडीच्या कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न असते.

by Team Gajawaja
0 comment
Work life tips
Share

काही वेळेस असे होते की, कितीही प्रयत्न केला तरीही उत्तम नोकरी मिळत नाही. काही लोकांचे एखाद्या खास, आवडीच्या कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न असते. ते पूर्ण व्हावे म्हणून प्रयत्नही करतात. पण केवळ इच्छा असून काहीही होत नाही. कधीकधी इंटरव्यू देऊन सुद्धा आपण त्यात पास होत नाही. अशा स्थितीत खुपजण निराश होतात. (Work Life Tips)

त्यावेळी असे होते ड्रिम जॉब शिवाय आपण काहीही विचार करू शकत नाही. पण असे जर तुम्ही करत असाल तर तुमचेच नुकसान होईल. जेवढा वेळ तुम्ही फुकट घालवाल तो कधीच परत मिळणार नाही हे लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या पसंदीची नोकरी मिळत नसेल पण पुढील काही गोष्टी जरुर ट्राय करू शकता.

फ्रिलांसिंग करा

11 Tips to Landing Your Dream Job | The Motley Fool
जर तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नसेल तर तुम्ही फ्रिलांसिंग करण्याचा पर्याय निवडू शकता. आपले काम आणि फिल्ड संबंधित कंपन्यांमध्ये एकाचवेळी फ्रिलांसिंग करू शकता. याचे काही फायदे सुद्धा आहेत. सर्वात प्रथम तुम्ही कामात व्यस्त रहाल. जेणेकरुन मनात येणारे नकारात्मक विचार दूर राहतील. याव्यतिरिक्त तुम्ही काही अतिरिक्त पैसे कमावू शकता. ऐवढेच नव्हे तर यामधून तुम्हाला कामाचा अनुभवही मिळेल. याचा फायदा नक्कीच तुमच्या भविष्यातील कामात होईल.

अभ्यास करा

Study Tips for People that Didn't Have to Study in High School
एक उत्तम नोकरी मिळण्यासाठी तुमचे क्वालिफिकेशन आवश्य पाहिले जाते. जर नोकरी मिळत नसेल तर हायर स्टडीजसाठी विचार करा. पुढे जाऊन उत्तम कंपनीत ऑफर नक्कीच मिळेल.तसेच आपल्या कामासंबंधित स्किल्स शिकवणारे फ्री-वर्कशॉप्स किंवा शॉर्ट टर्म कोर्स जॉइन करा.

चुकांकडे लक्ष द्या

Corrections and Comments: Who Does What, When?
जर तु्म्ही काही कंपन्या शॉर्टलिस्ट केल्या असतील आणि कोणत्याही कंपनीत तुमचे काम झाले नसेल तर याचा अर्थ असा होतो की, तुम्ही तुमचे काही चुकत आङे. अशातच आपल्या आवडीचा जॉब मिळवण्यासाठी अशा चुकांकडे लक्ष द्या ज्यामुळे तुम्ही मागे पडत आहात. यासाठी थोडावेळ घ्या, विचार करा तुम्ही नक्की कुठे मागे पडत आहात. (Work Life Tips)

ब्लॉग सुरु करा

7 Ways Businesses Benefit from Blogging
जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही तुमच्या कामात उत्तम आहात आणि भले नोकरी मिळत नसेल तर अशातच स्वत:चा ब्लॉग सुरु करा. यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मची मदत घेऊ शकता. आपल्या फिल्ड संदर्भातील स्किल्स यामुळे अधिक डेव्हलप होऊ शकतात. याचा सर्वाधिक मोठा फायदा असा होईल की, जेव्हा तुमच्या फिल्ड संबंधित एखादी कंपनी तुमचे काम पाहिल तेव्हा ते नक्कीच तुम्हाला कामासाठी विचारतील.


हेही वाचा- इंस्टाग्रामसाठी ट्रेंडिंग हॅशटॅग वापरण्याची सोप्पी ट्रिक


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.