Home » पर्यटनासाठी सर्वोत्तम समजले जाणारे ठिकाण

पर्यटनासाठी सर्वोत्तम समजले जाणारे ठिकाण

by Team Gajawaja
0 comment
Best Place
Share

दिवाळीची चाहूल लागली की, पर्यटनाला कुठे जायचे याची तयारी सुरु होते.  नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे तीन महिने पर्यटनासाठी सर्वोत्तम समजले जातात. या महिन्यात पडणारी थंडी आणि बर्फानं झाकलेले डोंगरमाथे, हे बघण्यासाठी हजारो नागरिक परदेशात जातात.  पण परदेशात जाण्यापूर्वी आपल्या देशातील काही ठिकाणे नक्कीच बघण्यासारखी आहे.  त्यातील हिमाचल प्रदेश हे राज्य पर्यटकांसाठी पर्वणी आहे.  ज्यांना बर्फाचा आनंद लुटायचा आहे, त्यांनी या तीन महिन्यात हिमाचल प्रदेशला नक्कीच भेट द्यावी.  हिमाचल प्रदेशमध्ये अनेक व्हॅली असून त्यांचे सौदर्य हे स्वर्गीय असेच आहे.  त्यापैकीच एक व्हॅली म्हणजे, कांगडा व्हॅली.  (Best Place)

हिमाचल प्रदेश सध्या पर्यटकांसाठी नंदनवन ठरत आहे.  या राज्यात एकूण 14 व्हॅली असून या सर्व नैसर्गिक सौदर्यांनं परिपूर्ण आहेत.  घनदाट झाडी, पक्षाचे वास्तव्य आणि शांतता हे या भागातील वैशिष्ट पर्यटकांना आकर्षून घेत आहे.  त्यातील कांगडा व्हॅली हे लोकप्रिय ठिकाण आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि साहसाची आवड असलेले अनेक पर्यटक सध्या कांगडा व्हॅलीमध्ये गर्दी करत आहेत.  (Best Place)

कांगडा व्हॅलीमध्ये ट्रेकिंग, वॉटर स्पोर्ट्स आणि पॅराग्लायडिंग या साहसी खेळांची मोठी सुविधा उपलब्ध आहे.  कांगडा व्हॅलीचा संपूर्ण परिसर हा चालत बघता येऊ शकतो.  त्यामुळे येथे अनेक ट्रेकर्स आलेले असतात. याशिवाय कांगडा व्हॅली अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक घटनांची साक्षीदार आहेत.  येथील मंदिरे आणि किल्ल्याला भेटी देण्यासाठीही गर्दी होत आहे.  पर्यटकांचा वाढता ओघ बघता, सरकारनंही विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.  तसेच कांगडा व्हॅलीमध्ये पोहचण्यासाठी थेट ट्रेन सुविधाही उपलब्ध करुन दिल्यामुळे या भागाकडे येणारा पर्यटकांचा ओघ वाढला आहे.  

संपूर्ण कांगडा व्हॅली ही नैसर्गिक सौदर्याने परिपूर्ण आहे.  येथील वृक्षसंपदा पर्यटकांना आवडते.  याशिवाय या व्हॅलीमध्ये  काही खास स्थळे आहेत, जी बघतांना पर्यटकांना परदेशातील पर्यटन स्थळांची आठवण येते.  त्यापैकीच एक म्हणजे, महाराणा प्रताप सागर. व्यास नदीवर बांधलेल्या धरणामुळे हा तलाव तयार झाला. महाराणा प्रताप सागर 1983 मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित झाले आहे.  या तलावाचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे, याच्या आसपास  हजारो पक्षांचे निवासस्थान आहे. सकाळी आणि सायंकाळी तलाव परिसरात असे हजारो पक्षी बघायला मिळतात.  सुमारे 220 पक्ष्यांच्या प्रजाती या भागात असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय याच भागात कारेरी नावाचे सरोवर देखील आहे.  या तलावातही अनेक पक्षांचे थवे बघायला मिळतात.  (Best Place)

कांगडा व्हॅली जे देवी म्हणून ब्रजेश्वरी देवीचा उल्लेख करण्यात येतो.  या ब्रजेश्वरी देवीचे मंदिर अतिशय सुंदर असून तिथे कायम भक्तांची गर्दी असते.  माता ब्रजेश्वरी देवी मंदिर हे एक शक्तीस्थळ आहे.  अत्यंत प्राचीन काळापासून असलेले मंदिर एकेकाळी अतिशय समृद्ध होते.  मात्र परकीय आक्रमणकर्त्यांनी या मंदिराला अनेकवेळा लुटले.  येथील सोने आणि रत्न, माणिक, पाचू यांनी तयार केलेली आभुषणे लुटून नेली.   मात्र देवीच्या मुर्तीला आक्रमक काहीही करु शकले नाही.  आता देवी ब्रजेश्वरी ही कांगडा व्हॅलीची देवी म्हणून ओळखली जाते.  या मंदिराशिवाय येथे अनेक प्रसिद्ध आहेत.  माता चामुंडा देवी, माता ज्वालाजी मंदिर,  महाकाल मंदिर, भगवान श्री कृष्ण आणि मीरा यांचे मंदिर, आशापुरी मंदिर,  माता बगलामुखी मंदिर पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. (Best Place)

कांगडा व्हॅलीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, येथील पॅराग्लायडिंगचे पॉईंट.   पॅराग्लायडिंग साइट, बैजनाथ हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पॅराग्लायडिंग टेक ऑफ पॉईंट आहे. येथे पर्यटन खात्यातर्फे अत्यंत चांगली सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  या पॅराग्लायडिंग पॉईंटवरुन पॅराग्लायडिंग करण्यासाठी अनेक परदेशी पर्यटकही गर्दी करतात.  याशिवाय कांगडामध्ये इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम,  कांगडा आर्ट म्युझियम, दाल लेक, भागसुनाग वॉटर फॉल आदी स्थळेही बघण्यासारखी आहेत.  कांगडा व्हॅलीमध्ये देवदाराची जंगले मोठ्या प्रमाणात आहेत.  वातावरण अतिशय छान असल्यामुळे कितीही चालले तरी त्रास होत नाही. 

===========

हे देखील वाचा : अखेर अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान होणार

==========

त्यामुळेच ज्यांना पायी भटकंती करण्याची आवड आहे, असे पर्यटक कांगडा व्हॅलीली पसंती देतात. येथील डोंगरकड्यांवरुन हिमाचल पर्वत बघण्यासाठीही गर्दी होते.  मनाला शांत करणारा हा अनुभव आयुष्यात एकदा घ्यावा असाच आहे.  मुख्य म्हणजे, कांगडा व्हॅलीमध्ये रस्त्यांची सुविधाही अतिशय चांगली आहे.  पर्यटकांसाठी अनेक धर्मशाळाही उपलब्ध आहेत. हॉटेल आणि बंगलेही या भागात पर्यटकांना सहज मिळतात.  आता कोरोना काळानंतर या व्हॅलीमध्ये रात्रीची ट्रेन सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.