आपण बहुतांशवेळा ऐकतो की, पाणी प्यायल्याने हाइड्रेट राहण्यासह काही आजारांपासून दूर राहतो. त्यामुळे दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास तरी पाणी प्यावे असा सल्ला दिला जातो. परंतु पाणी पिण्याची चुकीची पद्धत आणि चुकीच्या वेळेमुळे फायदा होण्याऐवजी नुकसानकारक ठरू शकते. (Health Care Tips )
– सकाळी पाणी पिणे फायदेशीर
सकाळी जेव्हा तुम्ही झोपून उठथा तेव्हा पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आयुर्वेद आणि हेल्थ कोच असे मानात की, सकाळच्या पहिल्या प्रहरात स्वत:ला हाइड्रेट करण्याची उत्तम वेळ आहे.
कारण रात्रभर तुमचे शरीर हे उपवासाच्या स्थितीत असते. जर तुम्ही यावेळी एक ग्लास गरम पाणी प्यायल्यात तर आरोग्याला काही पटींनी फायदा होतो. आरोग्य उत्तम रहावे आणि शरीरात अँन्टीऑक्सिडेंट फाइटोन्युट्रिएंट्स, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम वाढवण्यासाठी सकाळी तुम्ही एक ग्लास पाण्यात अर्धा लिंबू, एक चमचा घी आणि एक चिमुटभर दालचिनी मिक्स करू शकता.
-जेवणापूर्वी
डॉक्टर असे म्हणतात की, जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट स्वच्छ होतो. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पाचनक्रिया सुधारली जाते. त्यामुळे शरिराला खाल्लेले पदार्थ योग्य प्रकारे पचवण्यास मदत होते.त्याचसोबत जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील हाइड्रेशनचा स्तर कायम राहतो, जेणेकरुन शरीराचे कार्य सुरळीत पार पाडण्यास मदत होते.
-झोपण्यापूर्वी पाणी प्या
बहुतांश अभ्यासातून समोर आले आहे की, हृदयविकाराचा झटका हा रात्रीच्या वेळेस बहुतांशवेळा येते. त्यामुळे झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने अशा आजारापासून दूर राहता येते. त्याचसोबत तुम्ही रात्रभर हाइड्रेट ही राहता. शरिरातील काही विषारी पदार्थ बाहेर जातात.
-अंघोळ करण्यापूर्वी पाणी प्या
अंघोळ करण्यापूर्वी एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने शरीरातील ब्लड प्रेशरचा स्तर संतुलित राखण्यास मदत होते. अंघोळ किंवा शॉवर घेण्यापूर्वी एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने तुमचे शरीर आतमधून गरम होते. (Health Care Tips)
हेही वाचा- देशातील 70 टक्के लोकांना ‘या’ कारणास्तव सतावते पचनासंबंधित समस्या
-या गोष्टी करण्यापूर्वी प्या पाणी
घाम आल्यानंतर, मसाज केल्यानंतर, वाफ घेतल्यानंतर, व्यायामापूर्वी आणि नंतर पाणी प्यावे. कारण असे करणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु जेवताना पाणी पिऊ नये असे नेहमीच सांगितले जाते. तरीही आपण तसेच करतो. असे केल्याने खाल्लेले पदार्थ पचण्यास समस्या उद्भवते.
(या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)