प्रत्येकालाच आयुष्यात आनंदी रहायचे असते. आपली स्वप्न पूर्ण करायची असतात. मात्र हिच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर धडपड केली जाते. सध्याची स्थिती पाहता या स्पर्धात्मक जगात स्वत: ला सिद्ध करण्यासाठी नुसती चढाओढ सुरु आहे. परंतु जेव्हा हातात अपयश येते तेव्हा नैराश्य अधिक वाढले जाऊ शकते. नैराश्याची कारणे ही वेगवेगळी असू शकतात. पण दीर्घकाळ नैराश्यात राहिल्याचा परिणाम हा आयुष्यावर होतो हे समजून घेतले पाहिजे. हे बोलणे चुकीचे ठरणार नाही की, आनंदी राहिल्याने आपण हेल्दी आयुष्य जगतो. मात्र याउलट स्थिती असेल तर त्याचा तुमच्या एकूणच आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. हे ऐकणे थोडसं विचित्र वाटेल पण असे होते. यामुळे तुम्हाला काही प्रकारच्या हेल्थ संबंधित समस्या उद्भवू शकतात. (Grief Health Effects)
-झोपेची समस्या
तुम्ही जर सतत दु:खी असाल तर तुमच्या मनाला आणि शरीराला पुरेसा आराम मिळत नाही. यामुळे तुम्ही सतत थकलेले राहता. अशातच झोपेची समस्या उद्भवते आणि रात्री वारंवार जाग येत राहते. पुरेशी झोप न झाल्याने तुमचे दिवसभर कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही.
-थकवा
दु:खी राहत असल्याने त्याचा तुमच्यावर भावनात्मक रुपात फार परिणाम होतो. तुम्हाला कोणतीच गोष्ट करण्याचे मन होत नाही. तुम्ही थकलेले राहता आणि या स्थितीत तुम्ही व्यवस्थितीत जेवत सुद्धा नाहीत. त्यामुळे मित्रपरिवाराशी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
-रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होते
सततच्या नैराश्यामुळे तुमचे शरीर आजारांचा सामना करू शकत नाही. तुमच्यामधील रोगप्रतिकारकशक्ती यामुळे कमजोर होतो. दीर्घकाळ डिप्रेशन मध्ये राहिल्यास तर याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होईल.
-सूज येणे
हे तेव्हा घडते जेव्हा तुमची रोगप्रतिकारक प्रणाली धोका म्हणून पाहणाऱ्या एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देते आणि तुमच्या शरीरातील ऊती फुगतात. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की दु:ख जितके जास्त तितकी सूज तितकीच तीव्र. (Grief Health Effects)
हेही वाचा- किडल्टिंग म्हणजे काय? मेंदूच्या आरोग्याशी याचा संबंध असतो का?
-चिंता
दु:खामुळे घडणाऱ्या घटना तुम्हाला असा अनुभव देते की, तुमचे तुमच्याच आयुष्यावर नियंत्रण नाही. यामुळे तुम्हाला एंग्जायटीची समस्या होऊ शकते. जर तुम्ही काही महिन्यांपासून चिंतेत असाल किंवा घरातील काम करताना सुद्धा तुम्ही स्ट्रेस मध्ये असाल तर वेळीच मानसिक तज्ञांची भेट घ्या. अन्यथा तुमच्या मानसिक हेल्थवर त्याचा परिणाम होऊ शकतो.