आपण सर्वजण रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतो. प्रवासादरम्यान आपण रेल्वे स्थानकात काही काळ्या रंगाचे डब्बे ठेवलेले पाहिले असतील. या डब्ब्यांवर विविध नावे लिहिलेली असतात. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का हे डब्बे नक्की कोणत्या कारणस्तव असतात आणि का ते ठेवले गेले आहेत? याच बद्दलची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. (line box Indian railway)
खरंर या डब्ब्यांना रेल्वेच्या भाषेत लाइन बॉक्स असे म्हटले जाते. इंडियन रेल्वेमध्ये तुम्ही लोको पायलट आणि ट्रेनच्या गार्ड अथवा मॅनेजरला हे लाइन बॉक्स दिले जातात. ट्रेनला व्यवस्थित आणि सुरक्षित चालवण्यासाठी या गोष्टींची गरज असते. याच काळ्या बॉक्स बद्दल अधिक पाहूयात.
ट्रेनला व्यवस्थितीत आणि सुरक्षित पद्धतीने चालवण्यासाठी ट्रेनचे गार्ड आणि लोको पायलट यांना काही सामानाची गरज असते. रेल्वेच्या भाषेत या सामानाला व्यक्तिगत भंडार असे सुद्धा म्हटले जाते. यापैकी काही सामान सामान्य कार्यांसाठी आवश्यक असतात तर काही सामान हे आपत्कालीन स्थितीवेळी कामी येते. हे सामान गार्ड आणि लोको पायलट या दोघांच्या गरजेनुसार विविध असते. हेच सामान त्यांना भारतीय रेल्वेकडून दिले जाते.
आपल्या आपल्या बॉक्सची ओळख करण्यासाठी गार्ड आणि लोको पायलट यावर सफेद रंगाने मोठ्या अक्षरात आपले पूर्ण नाव, पदाचे नाव आणि मुख्यालयाचे नाव लिहितात. त्याचसोबत काही चिन्ह सुद्धा काढतात. त्यामुळे ज्यामुळे बॉक्स बॉयला योग्य ट्रेनमध्ये योग्य क्रू चा लाइन-बॉक्स चढवण्यास मदत होईल आणि ट्रेन या कारणास्तव उशिराने धावू नये असा ही प्रयत्न केला जातो.
या काळ्या डब्ब्यात गार्डसाठी मेमो बुक असते. या व्यतिरिक्त आपत्कालीन वैद्यकीय उपचारासाठी फर्स्ट एड बॉक्स, २ लाल आणि १ हिरवा झेंडा, पॅड लॉक आणि किल्ली असते. एलईडी लॅम्प आणि टेल बोर्ड, जे रात्रीच्या वेळी वापरले जाऊ शकतात. या व्यतिरिक्त १० डेटोनेटर म्हणजेच आपत्कालीन फटाका सिग्नल असतात. तक्रार पुस्तिका आणि सेलसह एक टॉर्च सुद्धा असते. एअर ब्रेक कोचचा अलार्म चैन पुलिंगला रिसेट करण्याची चावी सुद्धा असते. (line box Indian railway)
हेही वाचा- टायटॅनिकपेक्षा पाच पटींनी विशाल असणाऱ्या ‘या’ क्रुजची खासियत माहितेय का?
या व्यतिरिक्त स्थानकात पिवळ्या रंगाच्या बोर्डावर काळ्या रंगाने लिहण्यामागे सुद्धा काही कारण आहे. जेणेकरुन सर्वांना तो बोर्ड दूरवरुन सुद्धा स्पष्टपणे दिसू शकेल. या व्यतिरिक्त रेल्वे स्थानकातील पिवळा बोर्ड ड्रायव्हरला सतर्क करण्याचे सुद्धा काम करतो. काही ट्रेन नॉन-स्टॉप असतात आणि प्रत्येक स्थानकात थांबत नाही. दरम्यान, लावण्यात आलेल्या पिवळ्या रंगाचा बोर्ड ड्रायव्हरला सतर्क राहण्यासाठी तयार करतो. पिवळ्या रंगावरुन ड्रायव्हरला कळते की, पुढे स्थानक आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून सुद्धा अशा प्रकारचे बोर्ड लावले जातात.