राजस्थानमधील चित्तौडगड किल्ला हा आपल्या देशातील सर्वात मोठा किल्ला आहे. हा किल्ला ( Forts )राजस्थानच्या चित्तौडगडमध्ये भिलवाडापासून काही अंतरावर आहे. या किल्ल्याची बांधणी आणि त्यातील ऐतिहासिक इमारती, मंदिरे, तलाव हे बघण्यासाठी आज लाखो पर्यटकांची गर्दी या किल्ल्यावर होते. भारतीय वास्तुशास्त्राचा अजोड नमुना म्हणून या किल्ल्याकडे बघितले जाते. या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. 1568 पर्यंत चित्तौडगड ही मेवाडची राजधानी होती. या किल्ल्याची स्थापना सिसोदिया घराण्याचे शासक बाप्पा रावल यांनी केली. चित्तौडगडचा इतिहास या किल्ल्याप्रमाणेच हजारो वर्षांचा असल्याचे मानले जाते. या किल्ल्यावर अशी अनेक स्थाने आहेत, ज्याबाबत अनेकवेळा चर्चा होते. चित्तौडगड किल्ला राजपूतांच्या शौर्य, त्याग, बलिदानाचे प्रतीक आहे. चित्तौडगडचा हा किल्ला राजपूत शासकांच्या पराक्रमाच्या, त्यांच्या वैभवाच्या, साहसाच्या अनेक कथा आजही अभिमानानं सांगतो. 7 व्या शतकातील हा किल्ला ( Forts ) चित्रकूट नावाच्या टेकडीवर बांधला गेला आहे. या किल्ल्यावर अनेक अशी रहस्यमयी स्थाने आहेत, ज्यांच्याबाबत जनसामान्यांमध्ये कायम उत्सुकता राहिली आहे. त्यापैकीच एक स्थान म्हणजे, गोमुख कुंड.
गोमुख कुंड हे चित्तौडगड किल्ल्यातील अनेक जलकुंडांपैकी एक आहे. या कुंडाला आजतागायत सतत पाण्याचा प्रवाह मिळतो. अगदी हा किल्ला (Forts) खूप उंचावर असला आणि राजस्थानध्ये कितीही पाणीटंचाई असली तरी या कुंडामधील नैसर्गिक स्त्रोत कधीही थांबलेले नाही. हे कुंड नैसर्गिक झ-यातून येणा-या पाण्यानं सदैव भरलेलं असतं. या जलाशयाचे पाणी जेथून येते त्याच्या आकारानुसारच याला गोमुखं कुंड असे नाव पडले आहे. या गोमुख कुंडातील पाण्याचा सतत अभिषेक येथे असलेल्या शिवलिंगावर होतो. या शिवलिंगाची महती अनेक वर्षापासून राजस्थानमध्ये सांगितली जाते.
या शिवलिंगांचे दर्शन घेण्यासाठी फक्त राजस्थानमधूनच नाही तर जगभरातून शिवभक्त एकदा तरी या चित्तौडगड किल्ल्याला ( Forts ) भेट देतात. इतिहासातील सर्वात रक्तरंजित लढाईचा साक्षीदार असलेल्या चित्तौडगड किल्ल्यातील गोमुख कुंड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहेत. त्यांच्यामुळे येथील प्राचीन शिवलिंगावर सतत पाण्याचा अभिषेक होत असतो. काही वेळा तर संपूर्ण शिवलिंग पाण्याखाली जाते. गौमुख कुंड हे चित्तोडगड किल्ल्यातील अनेक जलकुंडांपैकी एक आहे. या कुंडाला कुठून पाणीपुरवठा होतो, हे कोडंही अद्याप सुटलेलं नाही. या कुंडांमुळेच चित्तौडगड किल्ला वॉटर फोर्ट या नावाने प्रसिद्ध आहे. किल्ल्याचा ( Forts ) सुमारे चाळीस टक्के भाग तलावाच्या स्वरूपात जलकुंभांनी व्यापलेला आहे. मुळ चित्तौडगड किल्ला सातशे हेक्टर क्षेत्रात पसरलेला आहे. त्यात सुरुवातीला 64 जलाशय बांधण्यात आले होते. मात्र त्यातील 22 जलकुंडच आता चांगल्या स्थितीत आहेत.
या किल्ल्यावर पूर्वी हजारो नागरिक राहत होते. साधारण पन्नास हजार नागरिकांची तब्बल चार वर्ष तहान भागवू शकणारा जलसाठा या किल्ल्यावर होता, हे या किल्ल्यावरील सर्वात मोठे आश्चर्य आहे. या किल्ल्यावरील ( Forts ) गोमुख कुंड हे सर्वाधिक पाण्याचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. गौमुख कुंड हे चित्तौडगडचे ‘तीर्थराज‘ म्हणूनही ओळखले जाते. भारतातील विविध पवित्र स्थळांची यात्रा केल्यानंतर, हिंदूंना त्यांची पवित्र यात्रा पूर्ण करण्यासाठी चित्तौडगडमधील गायमुख कुंडला भेट दिल्यास ही संपूर्ण यात्रा अधिक सफल होते, अशी मान्यता आहे.
======
हे देखील वाचा : मध्यप्रदेशचे अजिंठा-एलोरा अशी ‘या’ मंदिराची ओळख
======
या गोमुखातील पाणी शिवलिंग आणि देवी लक्ष्मीच्या मुर्तीवर पडते. या जलाशयात असंख्य मासे राहतात. पर्यटक चित्तौडगढ किल्ल्यावर आल्यावर या गोमुख कुंडावर जाऊन भगवान शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतातच शिवाय या कुंडात असलेल्या माशांना खाऊही घालतात. पावसाळ्यात या कुंडातील पाण्याचा ओघ एवढा वाढतो की संपूर्ण मंदिरच पाण्याखाली जाते. हे शिवलिंग असलेले मंदिर खोल जागेत आहे. जवळापस 12 फूट खाली असलेली हे मंदिर पावसाळ्यात पूर्णपणे पाण्यानं भरुन जाते. या गोमुख कुंडाची मुळ जागा आहे, आणि जिथून पाणी येते तिथे दोन मोठे खडक आहेत. ही जागा सुमारे 60 फूट खोल आहे. ब-याचवेळा पावसाळ्यात या गोमुखातून येणा-या पाण्याचा अभिषेक ज्या शिवलिंगावर पडतो, त्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मशिन लावून पाणी उपसले जाते. मात्र कितीही उपसा केले तरी पाणी कमी होत नाही. त्यामुळेच पावसाळ्यात, विशेषतः श्रावण महिन्यात या शिवलिंगाचे दर्शन जरी झाले तरी ते पवित्र मानले जाते. आज अनेक शोध लागले असले तरी या चित्तौडगड किल्ल्यातील ( Forts ) गोमुख कुंडाचे रहस्य हे अद्यापही तसेच आहे.
सई बने