मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेकदा आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही स्त्रियांच्या शरीराला सूज येते, तर काहींना असह्य वेदना होऊ लागतात. मासिक पाळीदरम्यान महिलांना दोन प्रकारच्या वेदना होतात. पहिल्याला प्राथमिक डिस्मेनोरिया आणि दुसऱ्या याला सेकेंडरी डिस्मेनोरिया म्हणतात. प्राथमिक डिस्मेनोरियामुळे पोटाच्या खालच्या भागात वेदना होतात परंतु हा आजार नाही. ही वेदना मासिक पाळीच्या सुरुवातीला होते आणि २ ते ३ दिवसांत बरी होते. या काळात पोटाच्या खालच्या भागात आणि मांडीत वेदना जाणवतात आणि गर्भाशयात फायब्रॉइड्स, पेल्विक इंफ्लेमेटरी डिसीज किंवा एंडोमेट्रिओसिस सारखा कोणताही आजार असेल तर मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना होतात आणि त्याला सेकेंडरी डिसमेनोरिया म्हणतात. मासिक पाळी सुरू होण्याच्या आठवडाभर आधी ही वेदना वाढते आणि काही वेळा यामुळे बद्धकोष्ठता, गॅसच्या तक्रारीही होतात. 40% स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या दुखण्याबरोबरच अंगाला सूज येणे, स्तन दुखणे , पोटात खुप दुखणे , एकाग्रता कमी होणे, मूड बदलणे, थकवा अशी काही लक्षणे आढळतात.तुम्हाला किंवा तुमच्या घरात असलेल्या माता – बहिणींना हा त्रास होत असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी आहे. आज आपण मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना घरच्या घरी कशा कमी करू शकू हे जाणून घेणार आहोत.(Period Pain Home Remedies)
![Period Pain Home Remedies](https://gajawaja.in/wp-content/uploads/2023/07/th-2-2.jpg)
Period Pain Home Remedies
![Period Pain Home Remedies](https://gajawaja.in/wp-content/uploads/2023/07/th-1-2.jpg)
Period Pain Home Remedies