Home » ट्रेनमध्ये विकल्या पेपरमेंटच्या गोळ्या, तर कधी केली ड्रायव्हरची नोकरी… पहा मेहमूदच्या आयुष्याची ट्राजीडी

ट्रेनमध्ये विकल्या पेपरमेंटच्या गोळ्या, तर कधी केली ड्रायव्हरची नोकरी… पहा मेहमूदच्या आयुष्याची ट्राजीडी

फिल्म इंडस्ट्रीचा खरा भाईजानने तेव्हा एन्ट्री केली होती जेव्हा सलमान खानचा जन्म सुद्धा झाला नव्हता. फिल्म इंडस्ट्रीचा खरा भाईजान हा मुंबईतील एका परिसरातला दादा होता, जो हफ्ता वसूली करायचा.

by Team Gajawaja
0 comment
Comedian mehmood
Share

बॉलिवूडमध्ये आज जेव्हा कधी ‘भाईजान’ असा उल्लेख केला जातो तेव्हा सर्वात प्रथम नाव सलमान खानचेच येते. मात्र तुम्हाला माहितेय का, फिल्म इंडस्ट्रीचा खरा भाईजानने तेव्हा एन्ट्री केली होती जेव्हा सलमान खानचा जन्म सुद्धा झाला नव्हता. फिल्म इंडस्ट्रीचा खरा भाईजान हा मुंबईतील एका परिसरातला दादा होता, जो हफ्ता वसूली करायचा. मात्र फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर त्याला सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले.३०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये झळकलेल्या या अभिनेत्याने सिनेमात येण्यापूर्वी ड्रायव्हरची नोकरी ते ट्रेन मध्ये सामान विक्री करण्याचे सुद्धा काम केले होते. (Comedian mehmood)

खरंतर हा अभिनेता म्हणजे प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता महमूद. महमूद सिनेमात येण्यापूर्वी खरंतर मुलूंड मधील एका परिसराचा दादा होता. जो लोकांकडून हप्ते वसूली करायचा. त्याला सर्वजण भाईजान असे म्हणायचे. महमूदला केवळ ९ व्या वर्षी आपला पहिला सिनेमा ‘किस्मत’मिळाला होता. १९४३ मध्ये अशोक कुमार आणि मुमताज शांति यांचा सिनेमा किस्मत त्यावेळी सुपरहिट सिनेमा ठरला होता. मात्र सिनेमातील शुटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या लाइट्सला कंटाळून तो या फिल्मी इंडस्ट्रीपासून दूर राहिला.

Comedian mehmood

Comedian mehmood

महमूद सिनेमांपासून तर दूर झाला पण नशीबाला ते मान्य नव्हते. त्यावेळी प्रसिद्ध अभिनेते आणि वडील मुमताज अळी हे दारुच्या नशेल असे बुडून गेले होते की, सर्वकाही उद्धस्त झाले होते. कमावण्याची वेळ आली तेव्हा महमूदने ट्रेनमध्ये पेपरमेंटची विक्री करण्यास सुरुवात केली. १९७८ मध्ये एका मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीत महमूदने सांगितले होते की, मुंबईतील त्या ट्रेनमध्ये पेपरमिंट विक्री करायचो ज्या केवळ सबबर्न मध्ये चालायच्या. जेणेकरुन वडिलांनी त्याला पाहू नये. तारुण्यात आल्यानंतर हळूहळू मुंबईतील मुलूंडचा दादा झालो आणि व्यापाऱ्यांकडून हप्ता वसूली सुरु केली. मात्र त्याचे म्हणणे एकच होते की, तो एक चांगला गुंड होता. जसे सिनेमातील हिरो असतात. महमूदने काही वर्ष ड्रायव्हरची नोकरी सुद्धा केली. (Comedian mehmood)

गरिबीत दिवस काढताना काही कामं करावी लागत होती. त्याच दरम्यान पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीशी त्यांना जोडले जावेसे वाटू लागले. पीएल संतोषीचे असिस्टेंट प्रोडक्शनचे मॅनेजर झाले. एक दिवस जेव्हा ज्युनिअर कलाकार आला नाही तेव्हा तीन दिवसांसाठी एक लहान भुमिका महमूद यांना दिली गेली. त्यासाठी ३०० रुपये सुद्धा मिळाले. तेव्हा कळले की, जी मी आता नोकरी करत आहे त्याच्या ४ महिन्याचा पगार हा या कमाई ऐवढा आहे. केवळ तीन दिवसांसाठी ऐवढे रुपये. तेव्हा कळले की, मला नक्की काय करायचे आहे. मला कलाकार व्हायचे आहे.

हेही वाचा- वडिलांनी बालपणीच सोडली साथ, शाळेत ही गेली नाही ‘ही’ अभिनेत्री

१९५८ ते १९७३ च्या काळात फिल्म इंडस्ट्री मध्ये महमूद टॉपवर होता. तर ‘बॉम्बे टू गोवा’, पडोसन कुवारा बाप, भूत बंगला, गुमनाम, सबसे बडा रुपैया सारख्या काही दमदार सिनेमांत केले. महमूदची कॉमेडी ऐवढी प्रेक्षकांना आवडत होती की, जेव्हा सिनेमातील कोणताही हिरो महमूद यांच्यासमोर भुमिका करायचा तर तो फिका पडायचा. चार दशकांच्या आपल्या करियरमध्ये महमूदने ३०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केले. महमूदने मीना कुमारी हिची बहिण मधु हिच्याशी लग्न केले होते. गायक लकी अली हा मेहमूद याचाच मुलगा आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.