Home » Success Story: संघर्षात्मक आयुष्यावर मात करुन IAS झालेले के जयगणेश

Success Story: संघर्षात्मक आयुष्यावर मात करुन IAS झालेले के जयगणेश

आयुष्यात संघर्षावर मात करुन जो पुढे जाण्याचा मार्ग नेहमीच ठरवत असतो त्याला आयुष्यात नक्कीच यश मिळते. जगभरात असे अनेक व्यक्तीमत्त्व आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक संघर्षांचा सामना केला.

by Team Gajawaja
0 comment
Success Story
Share

Success Story: आयुष्यात संघर्षावर मात करुन जो पुढे जाण्याचा मार्ग नेहमीच ठरवत असतो त्याला आयुष्यात नक्कीच यश मिळते. जगभरात असे अनेक व्यक्तीमत्त्व आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक संघर्षांचा सामना केला. पण आज ते यशाच्या शिखरावर उभे आहेत. मात्र त्यांच्या आयुष्याची पार्श्वभूमी पाहिली असता अंगावर काटे येतील. अशातच भारतातील कानाकोपऱ्यातून अनेक लोक युपीएससीची तयारी करत असतात. प्रत्येकाकडे काही ना काही सुख-सुविधा असतात. मात्र काहींचे संघर्षात्मक आयुष्य असते आणि त्यावरच मात करत ते युपीएससी परिक्षेत टॉप करण्याचे स्वप्न पाहत असतात.

त्यापैकीच एक असलेल्या के. जयगणेश यांच्या आयुष्याची कथा एखाद्याला प्रेरणादायी ठरेल. एका गरिब परिवारात वाढलेले के. जयगणेश हे युपीएससी परिक्षेत सहा वेळा नापास झआले. त्यांनी परिक्षेत पास होण्यासाठी खुप प्रयत्न केल्यानेच त्यांना आईबीची नोकरी मिळाली. खरंतर के. जयगणेश यांना आयएएस बनायचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा हिंम्मतीने सातव्यांदा प्रयत्न करुन 156 व्या रँकिंगसह आयएएस अधिकारी बनले.

आयएएस अधिकारी असलेल्या के. जयगणेश यांचा जन्म तमिळनाडू मधील वेल्लोर जिल्ह्यात झाला. विनावमंगलम मधील एका लहान गावात ते रहायचे. परिवाराची स्थिती आर्थिक रुपात फार बिकट होती. वडिल एका फॅक्ट्रीत काम करायचे. घर चालवण्यासाठी किती खर्च होतो आणि त्यासाठी कायकाय करावे लागते अशा सर्व गोष्टींची जाणीव के. जयगणेश यांना होती. त्यांनी परिवारातील गरिबी दूर करण्याचे स्वप्न तर बालपणीच पाहिले होते. यासाठी त्यांनी शिक्षण कधीच सोडले नाही.(Success Story)

के.जयगणेश यांनी आपले दहावी पर्यंतचे शिक्षण गावातून पूर्ण केले आणि नोकरी मिळेल अशा अपेक्षेने त्यांनी एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिक्षणात नेहमीच हुशार असलेले जयगणेश यांनी 91 टक्के गुणांसह कॉलेजमध्ये पहिली डिग्री मिळवली. पुढील शिक्षणासाठी ते तांठी पोरियार इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीत मॅकेनिकल इंजिअरिंग करण्यास गेले.

येथे सुद्धा त्यांनी उत्तम गुणांसह आपले शिक्षण पूर्ण केले आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्यांना 2500 रुपयांची नोकरी मिळाली. खुप मेहनत केल्यानंतर नोकरी मिळाल्याचा आनंद खुप होता पण ऐवढ्याशा पैशांमध्ये घरातील गरिबी जाणार नव्हती हे त्यांना माहिती होते. त्यामुळे खुप आधीपासूनच त्यांनी आपण आयएएस व्हायचे असे ठरवले होते. त्यामुळे नोकरी सोडली आणि युपीएएसीच्या तयारीला लागले.

प्रत्येक देशात लाखो तरुण मंडळी सिविल सेवेच्या परिक्षेसाठी स्वत: ला तयार करत असतात. मात्र पहिल्याच फेरीत यश मिळणे हे प्रत्येकाच्या नशीबात नसते. अशातच के. जयगणेश यांनी सुद्धा युपीएएसीची तयारी करण्यास सुरुवात केली पण जो पर्यंत आपण पास होत नाही तो पर्यंत परिक्षा देत रहायचे असे त्यांनी ठरविले होते.याची सहावेळा परिक्षा दिली पण यश मिळाले नाही. पराभवाने खचून न जाता के. जगणेश पुन्हा अभ्यास करायचे. याच दरम्यान परिवाराच्या आर्थिक समस्येमुळे आणि मानसिक दबावामुळे त्यांना लहान-मोठे काम करावे लागले. अभ्यासासाठी ते आवर्जून वेळ काढायचे. सहाव्या परिक्षेनंतर त्यांची इंटेलिजेंस ब्युरोच्या परिक्षेसाठी निवड झाली. (Success Story)

आयएएस के. जयगणेश यांनी इंटेलिजेंस ब्युरोची नोकरी करण्याऐवजी युपीएएसीचीच निवड केली. त्यांच्यासाठी हा निर्णय घेणे फार कठीण होते. मात्र आयुष्यातील संघर्षांवर मात करत सातव्यांदा पुन्हा युपीएएससीची परिक्षा दिली. मेहनतीची पराकाष्ठा काय असते हे त्यांना सातव्या परिक्षेनंतर कळले. ते या परिक्षेत यशस्वी झाले आणि 156 व्या रँकसह ते पास झाले.

हेही वाचा- Success Story: पद्म भूषण पुरस्काराने गौरवलेल्या सत्य नडेला यांच्या आयुष्याचा प्रवास

आजची बहुतांश तरुण मंडळी युपीएससी परिक्षेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या परिक्षेत नापास झाल्यानंतर त्याचा विचार सोडून देतात. मात्र लाखो तरुणांसाठी आयएसएस अधिकारी असलेले के. जयगणेश यांच्या आयुष्याचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरेल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.