ब्युटी ब्लेंडरचा (Beauty Blender )वापर कोणतेही ब्युटी प्रोडक्ट लावताना केला जातो. त्याचा सतत वापर जरी केला तरीही ते स्वच्छ करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. कारण ब्युटी ब्लेंडर तुम्ही थेट तुमच्या चेहऱ्यावरील त्वचेवर वापरता. यामुळे त्या संदर्भात अधिक हाइजीनची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. जर तुम्ही ब्युटी ब्लेंडरचा वापर करत असाल तर तो वेळोवेळी स्वच्छ सुद्धा ठेवला पाहिजे. अथवा आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ केला पाहिजे. यामुळे तुमचा ब्युटी ब्लेंडर हा दीर्घकाळ ही टिकून राहिल. त्याचसोबत ब्लेंडरवर बॅक्टेरिया सुद्धा तयार होणार नाहीत. तर जाणून घेऊयात ब्युटी ब्लेंडर नक्की स्वच्छ कसा करायचा.
पाण्यात भिजवा
सर्वात पहिली स्टेप म्हणजे तुमचा ब्युटी ब्लेंडर पाण्यात भिजवा. पाणी त्यामध्ये पूर्णपणे शोषले जात नाही तो पर्यंत तो पाण्यातच ठेवा. त्यानंतर तुमचा ब्लेंडर तुम्हाला आकाराने वाढलेला दिसेल. यावेळी स्वच्छ पाणी घ्या. तसेच पाणी अधिक गरम किंवा थंड नसावे. केवळ कोमट पाण्यात तो भिजवा.
जेंटल लिक्विड साबण वापरा
ओल्या ब्लेंडरवर थोड्या प्रमाणात एखादा जेंटल साबण लावा. जर तुम्ही लिक्विड सोपचा वापर करत असाल तर तो अधिक स्वच्छ होईल. यासाठी त्यावर तीन ते चार थेंब हे एखाद्या उत्तम लिक्विड सोपचे टाका.

Beauty Blender
ब्लेंडर स्वच्छ धुवा
ब्लेंडरवर साबण लावल्यानंतर तो स्वच्छ धुवा. जो पर्यंत त्यामधील पाणी आणि साबणाचा फेस निघून जात नाही तो पर्यंत तो धुवा. जेणेकरुन ब्लेंडरला लागलेले ब्युटी प्रोडक्ट्स व्यवस्थितीत निघतील.स्वच्छ धुताना काळजी घ्या की, तो अधिक जोरात पिळू नका. यामुळे तो खराब होऊ शकतो.
स्वच्छ पाणी वापरा
ब्लेंडरमधील साबण पूर्णपणे निघून गेल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा स्वच्छ पाणी टाका. जो पर्यंत त्यामधील डस्ट बाहेर पडत नाही तो पर्यंत तो स्वच्छ धुवा. जेव्हा स्वच्छ पाणी त्यामधून निघेल तेव्हा त्यावर पुन्हा पाणी टाकू नका. (Beauty Blender)
टॉवेलने पुसून घ्या
आता स्पंज तुमचा स्वच्छ धुवून झाल्यानंतर टॉवेलने तो पुसून घ्या. त्यामधील अतिरिक्त पाणी काढून टाका. तसेच असे करताना त्यामधील सर्व ओलावा बाहेर पडेल.
हेही वाचा- केसांना शॅम्पू लावताना तुम्ही सुद्धा ही चुक करता का?
सुकण्यासाठी हवेशीर ठिकाणी ठेवा
टॉवलेने व्यवस्थितीत पुसून घेतल्यानंतर तो हवेशीर ठिकाणी सुकण्यासाठी ठेवा. कारण त्यामधील ओलावा पूर्णपणे असे केल्याने निघून जाईल. मात्र टॉवेलने पुसल्यानंतर तो लगेच बंद डब्यात ठेवून नका. यामुळे त्याला दुर्गंधी येऊ शकते. असा ब्युटी ब्लेंडर पुन्हा तुम्हाला वापरता येणार नाही. त्याचसोबत चेहऱ्यावरील स्किनसाठी तो तुम्ही वापरलात तर एक्ने आणि पिंपल्स येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच तुमचे मेकअप ब्रश किंवा स्पंज हे स्वच्छ केले पाहिजेत.