कपड्यांची योग्य निवड करणे हे व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग असतो. याची निवड आपण ऑफिससाठी कोणते कपडे, एखाद्या लग्नसोहळ्यासाठी किंवा एखाद्या ऋतूनुसार केली जाते. परंतु पावसाळ्यात नक्की कोणते कपडे घालायचे असा प्रश्न पडत असेल तर पुढील काही टीप्स तुमच्या कामी येतील. (Monsoon fashion tips)
सुती कपडे घाला
पावसाळ्यात कॉटन म्हणजेच सुती कपडे घालू शकता. खरंतर पावसाळ्यात ओलावा अधिक असतो. त्यामुळे सुती कपडे घातल्यास ओलावा शोषून घेण्यास मदत होते. अशातच तुम्ही पावसात थोडेसे जरी भिजलात तर त्यामुळे होणाऱ्या समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकता. परंतु भिजल्यानंतर ते लगेच सुकतात असे नाही. त्यामुळे याची काळजी घ्यावी.
नाइलॉन फॅब्रिक घाला
पावसाळ्यात भिजलात तरीही टेंन्शन वाटणार नाही असे कपडे म्हणजे नाइलॉन फॅब्रिक. या कपड्यांमधील पाणी लवकर सुकते. त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही असे कपडे घालण्याचा विचार करु शकता. परंतु हे कपडे अंगाला अगदीच फिट होतील तसे घालणे टाळा.
अतिघट्ट कपडे घालणे टाळा
पावसाळ्यात अधिक घट्ट किंवा स्किन फिटिंग असणाऱ्या कपड्यापासून दूर रहा. कारण ओलाव्यामुळे ते लगेच पारदर्शक होतात. अशातच तुमचे इनरवेअर ही अशा कपड्यांमधून दिसू शकतात. या व्यक्तिरिक्त सर्दी सुद्धा होऊ शकते.
जॉर्जेट किंवा शिफॉन
या कपड्यांची खासियत अशी की, ते भिजल्यानंतर लगेच सुकतात. खरंतर हे पारदर्शी असतात. पण तुम्ही व्यवस्थितीत आणि योग्य इनरवेयर यामध्ये घातले तर पावसाळ्यात नक्की असे कपडे घालू शकता. (Monsoon fashion tips)
स्कार्फ सोबत ठेवा
पावसाळ्यात तुम्ही जे काही कपडे घालता त्याचसोबत एक त्याला मॅचिंग असा किंवा कलरफुल स्कार्फ अथवा दुपट्टा सोबत ठेवा. खासकरुन तुमचे कान, केस किंवा तुम्ही घालतलेल्या कपड्यांसाठी तो कामी येईल.
डार्क कलर घाला
पावसाळ्यात फ्लोरल प्रिंटचे कपडे खासकरुन घातले जातात. कारण पावसाळ्यात सर्वत्र हिरवगार झालेले असते. अशातच डार्क रंग यावेळी उठून दिसतात.
हेही वाचा- थंड की गरम पाणी, अंघोळीसाठी बेस्ट पर्याय कोणता?
बहुतांश तरुणांना जीन्स घालणे पसंद असते. त्यामध्ये त्यांना कंम्फर्टेबल वाटते. परंतु पावसाळ्यात जीन्स भिजल्याने त्याचे वजन वाढले जाते. अशातच तुम्हाला अनकंम्फर्टेबल वाटू शकते. त्यामुळे पावसाळ्यात जीन्स घालणे टाळा. ती धुणे आणि सुकणे सुद्धा मुश्किल होते. त्याचसोबत पावसाळ्यात सफेद रंगाचे कपडे घालणे ही टाळा.