ऐकटे राहणे हे फार कठीण असते. परंतु काही लोक ही लोकांच्या गर्दीत ही स्वत:ला एकटे समजतात. मानसिक रुपात ऐकटेपणा अनुभवण्याचा परिणाम हा तुम्हाला आजारपणाकडे घेऊन जातो. हेल्थ तज्ञांनुसार ऐकटेपणामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात याबद्दल जाणून घेऊयात. (Mental health care)
इम्युनिटी कमजोर होते
जर तुम्ही दीर्घकाळ ऐकटे राहत असाल तर तुमच्या शरिराला एखाद्या आजाराशी लढणे मुश्किल होते. ऐकटेपण शरिराद्वारे तयार केलेल काही हार्मोन्स ट्रिगर करते. याच कारणास्च तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ लागते.
ब्लड प्रेशर वाढणे
जर तुम्ही ऐकटे असाल, खासकरुन ४ वर्षांपेक्षा अधिक काळ तर यामुळे तुमचे ब्लड प्रेशऱ वाढण्याची शक्यता असते.
फिजिकल अॅक्टिव्हिटी
एक सक्रिय लाइफस्टाइल तुमचे शरिर आणि मन स्वस्थ राहण्यास मदत करते. जर तुम्ही एकटे असाल तर स्वत:ला गुंतवणून ठेवण्यासाठी फिजिकल अॅक्टिव्हिटी जरुर करा.
मानसिक स्थिती कमजोर
तुम्हाला एकटेपण वाटत असेल तर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी किंवा वयानुसार गोष्टी लक्षात ठेवणे फार कठीण होते. यामुळे अल्जाइमर सारखा आजार होण्याची अधिक संभावना असते.

धुम्रपान
जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा धुम्रपानाची सवय लागण्याची फार शक्यता असते. यामुळे मधुमेह, हृदयरोग आणि फुफ्फुसासंदर्भात आजार होतात. ऐवढेच नव्हे तर शरिरातील अन्य अवयव ही यामुळे प्रभावित होतात. तणावाखाली असलेल्या व्यक्ती अधिक धुम्रपान करतात.
हार्ट हेल्थ
जेवढं तुम्ही एकटेपणात आयुष्य घालवता तेवढीच अधिक वाईट परिणाम तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर होते. ज्या महिला एकट्या राहतात त्यांना कोरोनरी हृदय रोग होण्याची अधिक शक्यता असते. (Mental health care)
एकटेपणापासून दूर राहण्यासाठी तुम्ही या गोष्टी करु शकता-
-क्लब किंवा ग्रुप्स मध्ये सहभागी व्हा
आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या एखाद्या क्लब किंवा ग्रुपचा शोध घ्या आणि त्यांच्यामध्ये सहभागी व्हा. यामुळे तुम्हाला दुसऱ्यांसोबत बातचीत करता येईल. तुमच्या काही गोष्टी शेअर करता येईल. अशातच तुमचे कम्युनिकेशन होत राहिले तर तुम्ही स्वत:ला ऐकटे जाणवणार नाहीत.
-पुस्तक वाचा
तुम्हाला पुस्तक वाचण्याची आवड निर्माण झाली की, कळणार नाही वेळ कसा निघून जातोय. पुस्तकांमधून काही नव्या गोष्टी शिकायला मिळतात, काही गोष्टी कळतात. त्याचा आयुष्यात कुठे ना कुठे तुम्ही वापर करुन तुमच्यातील एकटेपणा दूर करु शकता.
हेही वाचा- प्रत्येक गोष्टीचा राग करणे तुमच्या आयुष्यासाठी ठरेल धोकादायक
-नवे छंद जोपासा
काहीतरी नवे करण्याची इच्छा बाळगा. एखादी नवी भाषा, छंद, किंवा ऑनलाईन कोर्स करा. यामुळे तुमचा एकटेपणा दूर होईल.