जगभरात लग्नाच्या प्रथा या वेगवेगळ्या असतात. हिंदूमध्ये सात फेरे घेतले जातात तर मुस्लिम बांधवांमध्ये निकाहची पद्धत वेगळी असते. परंतु लग्नापूर्वी दोन्ही परिवाराकडून एकमेकांबद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल अधिक माहिती काढली जाते. पण चीन मध्ये नवरदेव अशा पार्टनरचा शोध घेतायत ज्यांना सख्खा भाऊ नाही. पण नक्की ते असं का करतायत याच बद्दल आपण जाणून घेऊयात.(Weird Chinese Society)
चीनी मीडियानुसार, आता चीनमध्ये अशा अविवाहित पुरुषांची संख्या वाढत आहे, जे लहान भाऊ नसलेल्या महिला पार्टनरचा शोध घेत आहेत. खरंतर त्यांना अशी भीता वाटते की, महिलेचा लहान भाऊ त्याच्यावर आर्थिक बोझा म्हणून प़डेल. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला चीन मध्ये ४ हजारांहून अधिक अविवाहितांनी एका कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमात अविवाहितांची माहिती आणि डेटिंगच्या आधारावर सार्वजनिक रुपात तो आयोजित केला होता.लोक असा बायोटेडा पाहून हैराण झाले की, ज्यामध्ये अविवाहित पुरुषांची अशी मागणी होती ज्या महिला पार्टनरचा लहान भाऊ नाही त्यांच्याशीच ते लग्न करतील.
९० च्या दशकातील पुरुष करतायत ही मागणी
अविवाहितांच्या या कार्यमक्रमात शेडोंग प्रांतामधील १९९० च्या दशकात जन्मलेल्या एका पुरुषाने असे म्हटले होते की, त्याला अशी गर्लफ्रेंड हवीय जिच्याकडे एक स्थायी नोकरी, एक कार आणि एक फ्लॅट ही असला पाहिजे. त्याचसोबत तिचा लहान भाऊ अथवा बहिण नसावी. प्रांताची राजधानी जिनान मध्ये १९९८ मध्ये जन्मलेल्या आणखी एक व्यक्ती भावी पार्टनर शोधत होता. त्याने अशी मागणी केली होती की, त्याला अशी पत्नी हवीय जी कोमल आणि विचारशील असेल. पण त्याचसोबत तिला लहान भाऊ अथवा बहिण नसावी.(Weird Chinese Society)
महिलांना सुद्धा माहितेय पुरुषांची ही मागणी
चीनमध्ये अविवाहित महिलांना सुद्धा नववधूंची काय मागणी आहे हे माहिती असते. त्याचसोबत महिलांनी सुद्धा त्यांना लहान भाऊ अथवा बहिण नाही असे स्पष्टपणे लिहिण्यास सुरुवात केली आहे. एका २७ वर्षीय महिलनेने व्यक्तीग सुचना बोर्डाला असे म्हटले होते की, तिला एक लहान भाऊ आहे. पण ती एका उच्च युनिव्हर्सिटीची विद्यार्थीनी आहे. ती अभ्यासात ही फार हुशार आहे. ऐवढेच नव्हे तर तिला सुद्धा ‘फू डि मो’ बनायचे नाही. पण फू डि मो म्हणजे नक्की काय?
हे देखील वाचा- राजापेक्षा सुनेची लोकप्रियता जास्त…
‘फु डि मो’ हा चीनमध्ये आलेले एक नवा शब्द आहे. याचा शाब्दिक अर्थ असा होतो की, लहान भावाचे समर्थन करणारा राक्षस. हा शब्द अशा महिलांसाठी वापरला जातो जी आपल्या लहान भावासाठी खुप काही करते. चीनमध्ये काही महिलांचे पालक त्यांना आपल्या भावाला आर्थिक रुपात समर्थन करण्यास भाग पाडतात. चीनची पारंपरिक संस्कृती पुरुष मुलांना महिलांच्या तुलनेत अधिक महत्व देते.