चॅट जीपीटीने (ChatGPT) आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या जगात धुमाकूळ घातला आहे. OpenAI द्वारे विकसित करण्यात आलेल्या एआय चॅटबोटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा दररोज २.५ कोटी युजर्स कोणत्या ना कोणत्या कामासाठी वापर करतात. ऐवढ्या मोठ्या संख्येने चॅटजीपीटीचा वापर जरी केला जात असला तरीही अद्याप याचे अधिकृत अॅप लॉन्च करण्यात आलेले नाही. सध्या तुम्ही ते वेबसाइटच्या माध्यमातूनच वापरु शकता. अशातच काही असे सुद्धा पर्याय आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही चॅटजीपीटीचा वापर करु शकता. मोबाईलमध्ये चॅटजीपीटीचा वापर कसा करायचा याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Hey GPT वर मिळेल चॅटजीपीटी
आयफोन युजर्ससाठी चॅटजीपटीचा वापर करणे अगदी सोप्पे झाले आहे. या टूलमध्ये सीरिला हटवून चॅटजीपीटीचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच आयफोन युजर्स आता जीपीटीच्या माध्यमातून चॅटजीपीटीचा वापर करु शकतात. याला अॅक्टिव्हेट केल्यानंतर युजर्सला ईमेल लिहिणे ते रिपोर्ट तयार करण्यासाठी मदत होणार आहे.

WhatsApp वर कसे वापराल
जर तु्म्हाला याचा वापर व्हॉट्सअॅपवर करायचे असेल तर तो करु शकता. यासाठी BuddyGPT ही अशी एक सर्विस आहे ज्याच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅपवर एआय चॅटबॉट वापरु शकता. या टूलच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअॅप व्यतिरिक्त टेलीग्रामवर ही चॅटजीपीटीचा वापर करु शकता. (ChatGPT)
Microsoft Start वर चॅटजीपीटीचा उत्तम अनुभव
मायक्रोसॉफ्ट स्टार्ट एक ऑल इन वन सर्च अॅप आहे. येथे युजर्सला काही प्रकारचे पर्याय मिळतात. यामध्ये Bing AI चा सपोर्ट ही दिला जात आहे. ही टेक्नॉलॉजी GPT-4 वर आधारित आहे. म्हणजेच चॅटजीपीटीचा सर्वाधिक वापर तुम्ही येथे करु शकता.
हे देखील वाचा: ‘या’ टीप्सने होईल तुमचा फोन सुपर Secure
SwiftKey वर सुद्धा चॅटजीपीटी
सिफ्टकी कीबोर्ड असा पर्याय आहे जेथे तुम्ही चॅटजीपीचा वापर अगदी सहज करु शकता. येथे तुम्हाला चॅटजीपीटी-४ याच्या मदतीने कोणत्याही अॅपमध्ये चॅटजीपीटीचा वापर करु शकता. स्विफ्टकीला गुगल प्ले स्टोर अथवा अॅप्पल अॅप स्टोरच्या माध्यमातून डाउनलोड केले जाऊ शकते.
दुसऱ्या बाजूला मस्क हे ओपनआय चॅटजीपीटी आण गुगलच्या बार्ड यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. कारण त्यांनी टेक्सासयेथे एक्स.एआय नावाच्या कंपनीची नोंदणी नुकतीच केली आहे. नेवादा येथे त्याचे मुख्य कार्यालय असणार आहे. मस्क हे स्वत: कंपनीचे एकमेव लिस्टेड संचालक असून त्यांचा फॅमिली ऑफिसचे संचालक जेरेड बिर्चेल यांना कंपनीचे सचिव पद देण्यात आले आहे.