राजस्थान मधील कोटा येथे राहणाऱ्या नंदिनी गुप्ताने आपल्या डोक्यावर मिस इंडियाचा क्राउन घातला. नंदिनी गुप्ता ही केवळ १९ वर्षाची आहे. मिस इंडियाच्या ग्रँन्ड फिनालेमध्ये दिल्लीतील श्रेया पूंजा ही पहिली रनर अप राहिली. तसेच मणिपुर मधील थौनाओजम स्ट्रेला लुवांग ही दुसरी रनर-अप होती. मिस इंडियाचा क्राउन मिळाल्यानंतर नंदिनीवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आगे. दरम्यान, नंदिनी गुप्ताने एका मुलाखतीदरम्यान तिच्या यशाचे गुपित सांगितले आहे.मिस इंडिया २०२३ जिंकणारी नंदिनी गुप्ताने एका मुलाखतीत बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा आणि रतन टाटा यांचे नाव घेतले. तिने असे म्हटले की, ती या दोघांना आपले आदर्श मानत होती.(Miss India 2023)
कोटामध्ये राहणाऱ्या नंदिनी गुप्ता बिझनेस मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेत आहे. आपल्या मुलाखतीत तिने आपल्या आयुष्याच्या सर्वाधिक महत्वाच्या लोकांबद्दल सांगितले. तेव्हा तिने रतन टाटा यांचा उल्लेख केला. त्यांनी मानवतेसाठी खुप काम केले. ते नेहमीच चॅरिटी करतात. त्यांना लाखो लोक पसंद करतात. तरीही त्यांचे पाय जमिनीवरच असतात असे ती म्हणाली.
रतन टाटा यांच्या व्यतिरिक्त नंदिनीने बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा हिचे सुद्धा नाव घेतले. नंदिने असे म्हटले की, कमी वयातच प्रियंका चोपडाने २००० मध्ये मिस वर्ल्डचा पुरस्कार पटकावला होता. त्याचसोबत अभिनेत्री म्हणून ही तिने नेहमीच उत्तम काम केले आहे. ती नेहमीच लोकांना प्रेरणा देत असते. तिचा सेंस ऑफ ह्युमर सुद्धा खुप उत्तम आहे.
नंदिनीने पुढे असे म्हटले की, केवळ वयाच्या १० व्या वर्षातच तिने मिस इंडिया बनण्याचे स्वप्न पाहिले होते. नंदिनेने असे म्हटले की, तिला मिस इंडियात सहभागी व्हायचे होते. जशीजशी मोठी झाली तेव्हा कळू लागले की, हा केवळ एक पुरस्कार नसून त्यापेक्षा ही काहीतरी मोठे आहे. हा एक असा प्रवास आहे ज्याचा फार कमी लोकांना अनुभवता येतो. मिस इंडिया हा एक असा मंच आहे जेथे तुम्हाला उंच उडण्यासाठी पंख देते.(Miss India 2023)
हे देखील वाचा- इथे महिला ६५ व्या वर्षीदेखील मुलांना जन्म देऊ शकतात!!
नंदिनी गुप्ता हिचे वडील एक शेतकरी आहेत. तिच्या वडिलांची कोटा जिल्ह्याजवळील सांगोदाजवळील भांडाहेडा येथे शेती आहे. नंदिनीची आई घरीच असते. तिची लहान बहिण अनन्या सुद्धा ९ वी इयत्तेत शिकत आहे.नंदिनीच्या घरातील मंडळी असे सांगतात की, तिला लहानपणापासून मॉडेल बनण्याचे स्वप्न होते. तर ११ फेब्रुवारीला झालेल्या मिस राजस्थानमध्ये तिची निवड झाली होती. त्यानंतर तिने फेमिना मिस इंडियाच्या स्पर्धेत भाग घेत ती त्यात यशस्वी झाली.