अलीकडल्या काळात हार्ट अटॅकचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. हसत-खेळत असलेल्या व्यक्तिला सुद्धा हार्ट अटॅक काय येतो आणि तो आपल्यातून निघून जातो. अशातच डॉक्टरांना सुद्धा याबद्दल विचार करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे सध्याच्या घडीला फार महत्वाचे झाले आहे. कोविडनंतर अचानक हार्ट अटॅक येण्याची प्रकरण अधिक वाढली गेली आहेत. त्यामुळे खासकरुन तरुणांनी आरोग्याची कशी काळजी घ्यावी याबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.(Heart Attack Treatment)
हार्ट अटॅक आल्यानंतर एखाद्याचा मृत्यू त्याचवेळी होतो किंवा त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही होतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखणे हे आपल्या हातात आहे.
-हिरव्या भाज्या खा
हृदयाची काळजी घेण्यासाठी हिरव्या भाज्या खाणे फायदेशीर ठरेल. हिरव्या भाज्यांमध्ये काही प्रकारचे पोषक तत्व असतात. जे हृदयासह शरिरालासुद्धा तंदुरस्त ठेवतात.त्यामुळे हिरव्या पालेभाज्या आणि हेल्दी फूड्सचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
-तणाव कमी करा
तणावाखाली असल्याने त्याचा थेट परिणाम कधीकधी हृदयावर पडू शकतो. हेच कारण तुमच्या हार्ट अटॅकसाठी जबाबदार ही मानले जाऊ शकते. जर तुम्ही एखाद्या तणावाखाली असेल तर त्यावर तोडगा काढा. यासाठी अधिकाधिक वेळ तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत घालवा. जेणेकरुन ताण कमी होईल. त्याचसोबत मेडिटेशन, योगाभ्यास ही करा.

-हेल्दी डाएट खा
सध्याची स्थिती पाहता लोकांची लाइफस्टाइल ही पूर्णपणे बदलली गेली आहे. लोक बाहेरचे तळलेले पदार्थ अधिक खातात. अशातच तुम्ही पाकिट बंद पदार्थ खाणे कमी करा. त्याऐवजी हेल्दी डाएट खा, फळं, हिरव्या भाज्या खा. कारण त्यामध्ये पोषक तत्व अधिक प्रमाणात असते. त्याचसोबत धुम्रपान आणि दारु पिण्याच्या सवयीपासून ही दूर रहा.(Heart Attack Treatment)
-वेळोवेळी आरोग्याची तपासणी करा
जर तु्म्ही वयाची चाळीशी ओलांडली असेल तर वेळोवेळी बेसिक टेस्ट करुन घेत रहा. जसे की, शुगर, ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉलची चाचणी केली पाहिजे. यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्यासंबंधित माहिती मिळत राहिल.
हे देखील वाचा- महिलांमध्ये लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच काळजी घ्या
-व्यायाम करा
हार्ट अटॅकचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यायाम करणे फार फायदेशीर ठरते. व्यायाम आणि योगाभ्यास केल्याने हृदयासह शरिर ही तंदुरस्त राहते. परंतु यावेळी अशी काळजी घ्या की, व्यायाम हा आपल्याला झेपेल ऐवढाच करा. त्याचसोबत अधिक वेळ व्यायाम करणे टाळा.याचा ताण तुमच्या हृदयावर पडू शकतो.