Home » भारतातील ‘या’ पहिल्या बँकेबद्दल माहितेय का?

भारतातील ‘या’ पहिल्या बँकेबद्दल माहितेय का?

by Team Gajawaja
0 comment
India First Bank
Share

बँकिंग व्यवस्था ही प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. जर बँकांवर एखादे संकट आल्यास देशाच्या अर्थकरणाला फटका बासतो. सध्याच्या दिवसाक अमेरिकेतील बँकिंग संकटामुळे जगभरात झालेल्या हालचालीमुळे आपल्याला बँकांचे महत्व कळू शकते. भारतात शासकीय आणि खासगी बँका असून यावर नियंत्रण ठेवण्याचे काम आरबीआयकडून केले जाते. मात्र तुम्हाला माहिती आहे का, भारतातील सर्वात प्रथम बँक कोणती होती? देशात्या बँकिंग व्यवस्थेची सुरुवात इंग्रजांच्या काळापासूनच सुरु झाली होती.(India First Bank)

भारतातील सर्वात पहिली बँक १७७० मध्ये स्थापन करण्यात आली होती. त्यावेळी देशाची राजधानी असलेल्या कोलकाता येथे ती सुरु झाली होती. स्वातंत्र्यापूर्वी भारतात जवळजवळ ६०० बँक रजिस्टर्ड होत्या, पण त्यापैकी काही बँकाच राहिल्या आणि अन्य बंद झाल्या, तर जाणून घेऊयात भारतातील बँकिंग व्यवस्थेच्या इतिहासाबद्दल अधिक.

भारतात बँकिंग सिस्टिमला ३ हिस्स्यांमध्ये विभागले गेले. यामध्ये पहिला हिस्सा १९४७ रोजी मिळालेल्या स्वातंत्र्यापूर्वी, दुसरा टप्पा १९४७ ते १९९१ आणि तिसरा टप्पा १९९१ नंतर ते आतापर्यंतचा कालावधी. १९४७ मध्ये इंग्रजांकडून मिळालेल्या स्वातंत्र्यांपू्वी भारतात ६०० पेक्षा अधिक बँका सक्रिय होत्या. भारतातील पहिली बँक ‘बँक ऑफ हिंदुस्तान’ मध्ये सुरु करण्यात आली होती. या कालावधीत जनरल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास सुद्धा सुरु झाली.

बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रासला प्रेसिडेंशियल बँक असे म्हटले जायचे. या ३ बँकांचे १९२१ मध्ये एकीकरण करण्यात आले आणि याच्या विलयानंतर इंपीरियल बँक ऑफ इंडिया असे म्हटले गेले. दरम्यान, इंपीरियल बँक ऑफ इंडियाला देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९५५ मध्ये राष्ट्रीयकृत करण्यात आले आणि याचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असे ठेवले गेले. तर देशात बँकिंग व्यवस्थेत सधार, त्रुटी, सिस्टिममध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने आरबीआयची स्थापना करण्यात आली.(India First Bank)

सध्याच्या काळात देशात एसबीआय सार्वजनिक क्षेत्रातील सर्वाधिक मोठी बँक आहे. इलाहाबाद बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडौदा सुद्धा इंग्रजांच्या काळात स्थापन करण्यात आल्या होत्या. आजही या बँकांचे कामकाज सुरु आहे. १९४७ ते १९९१ दरम्यान काही बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

हे देखील वाचा- नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात रोबोट, माणसांसाठी धोका… बिल गेट्स यांनी AI बद्दल दिला इशारा

१९९१ मध्ये झालेल्या आर्थिक सुधारानंतर देशात खासगी बँकांची एन्ट्री झाली. या दरम्यान सरकार आणि आरबीआयने खासगी बँकांच्या कामकाजाला परवानगी दिली. यामध्ये ग्लोबल ट्रस्ट बँक Global Trust Bank, ICICI, HDFC, Axis Bank, इंडसइंडसह काही खासगी बँकांचा समावेश आहे. तर सरकारने काही परदेशी बँकांना सुद्धा भारतात काम करण्यास परवानगी दिली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.