निसर्गानं सौदर्यांची उधळण केलेल्या उत्तराखंड राज्यातील अल्मोडा येथील कासार गावातील कासार देवी मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त भाविकांनी गर्दी केली आहे. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांनी या मंदिरात काही काळ साधना केली होती. अल्मोडाच्या जवळ असलेल्या या मंदिरात चैत्र नवरात्रौत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. या मंदिराचा सर्व परिसर निसर्गानं सजलेला आहे. अत्यंत शांत वातावरण आणि संपन्न निसर्ग यामुळे मंदिराच्या सौदर्यात भर पडते. या देवीची मोठी महिमा आहे. स्वतः स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांनीही या मंदिराच्या परिसरात काही काळ वास्तव्य केल्यानं मंदिराला आगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. आता नवरात्रैत्सवानिमित्त भाविक देवीची पूजा करण्यासाठी गर्दी करीत आहेत. मंदिरात माता दुर्गेच्या आठ रूपांपैकी एक देवी कात्यायनीची पूजा केली जाते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे चुंबकीय शक्तीचे केंद्र आहे. अगदी नासाच्या शास्त्रज्ञांनीही यासाठी मंदिर परिसरात येऊन शोध मोहीम केली आहे.
कासार हे उत्तराखंडमधील अल्मोडा जवळचे गाव आहे. या गावावरुन येथील देवीला कासार देवी म्हणून आळखले जाते. माता कात्यायनीचे हे मंदिर भाविकांमध्ये मोठे प्रसिद्ध आहे. चैत्र नवरात्रौस्तवानिमित्त येथे हजारो भाविक भेट देतात. यात परदेशी भाविकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. उत्तराखंडमध्ये अशी अनेक मंदिरे आहेत की, ज्यांचे स्वतःचे महत्त्व आहे. परंतु अल्मोडा येथील कासार देवीचे ऐतिहासिक महत्त्व वेगळे आहे हे मंदिर चुंबकीय प्रभावासाठी प्रसिद्ध आहे. याचा शोध घेण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ मंदिर परिसरात अनेकदा येतात. मात्र अजूनही त्यांना कोणताही शोध लावता आला नाही. कासार देवी मंदिरात स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांनीही ध्यान केले होते. स्वामी विवेकानंद काही काळ या मंदिर परिसरात राहिले होते. तेव्हापासून या मंदिराची लोकप्रियता वाढली आहे. स्वामी विवेकानंदांना ही जागा इतकी आवडली की त्यांनी त्यांच्या लिखाणातही मंदिराचा उल्लेख केला आहे. कासार देवी मंदिराला बॉब डिलन, जॉर्ज हॅरिसन, कॅट स्टीव्हन्स, अॅलन गिन्सबर्ग आणि टिमोथी लीरी सारख्या काही प्रसिद्ध व्यक्तींनी भेट दिली आहे. 70 च्या दशकात हिप्पी संस्कृतीच्या काळात येथील हिप्पी हिल प्रसिद्ध होते.
कासार देवी मंदिर हे भारताची देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उत्तराखंडच्या अल्मोडा डोंगरावर वसलेले आहे. स्थानिकांची भावना आहे की, येथे देवी प्रत्यक्ष आली होती. असे म्हटले जाते की भारतातील हे एकमेव ठिकाण आहे जिथे चुंबकीय शक्ती आहेत. मंदिराच्या आजूबाजूला अनेक ठिकाणे आहेत, जिथे पृथ्वीच्या आत मोठ्या भूचुंबकीय पिंड आहेत. कासार देवी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर व्हॅन अॅलन बेल्ट आहे. याचा नेमका शोध लावण्यासाठी नासाचे शास्त्रज्ञही येथे आले होते, पण शेवटी त्यांना रिकाम्या हाताने जावे लागले. या परिसरातील ध्यान धारणा केल्यास मानसिक शांती लागते, असे भाविक सांगतात. त्यामागे मंदिराभोवती असलेले चुंबकीय वातावरणच असल्याचे सांगितले जाते.
याशिवाय कासार देवी मंदिरापासून वन्यजीव अभयारण्य अगदी जवळ आहे. या अभयअरण्यात अनेक पक्षी पाहायला मिळतात. पाइन आणि ओकच्या जंगलांनी वेढलेला हा परिसर नितांत सुंदर आहे. त्यामुळे नवरात्रौत्सव आणि येत्या सुट्ट्यांमध्ये या परिसरात भाविकांची आणि पक्षीमित्रांचीही मोठी गर्दी होते. कश्यप पर्वतावर असेलेले कासार देवी मंदिर त्यांच्या बांधणीसाठीही प्रसिद्ध आहे. हे मंदिर कश्यप टेकडीच्या माथ्यावर एका गुहेसदृश जागेवर बांधलेले आहे. कासार देवी मंदिरात माता दुर्गेच्या आठ रूपांपैकी एक देवी कात्यायनीची पूजा केली जाते. याच ठिकाणी अडीच हजार वर्षांपूर्वी शुंभ-निशुंभ नावाच्या दोन राक्षसांना मारण्यासाठी माता दुर्गेनं कात्यायिनी देवीचे रुप घेतल्याचे सांगण्यात येते. माता दुर्गेने, देवी कात्यायनी मातेचे रूप घेऊन राक्षसांचा वध केला. दुसऱ्या शतकात बांधलेल्या या मंदिरात 1970 ते 1980 या काळात काही डच भिक्षूंही मोठ्याप्रमाणात वास्तव्यास होते.
======
हे देखील वाचा : चैत्र नवरात्रीचा उपवास धरणाऱ्यांच्या आयुष्यात होणार बदल
======
कासारदेवी मंदिराचे सर्वात मोठे आश्चर्य येतील चुंबकीय शक्ती मानली जाते. शास्त्रज्ञांच्या मते, कासार देवी मंदिर आणि दक्षिण अमेरिकेतील पेरू येथे स्थित माचू-पिचू आणि इंग्लंडचे स्टोन हेंगयांच्यात आश्चर्यकारक साम्य आहे. येथे अद्वितीय चुंबकीय शक्तीचे केंद्र असल्याचे दाखले नासाच्या शास्त्रज्ञांनी दिले आहेत. अशा जागृत मंदिरात चैत्र नवरात्रौत्सवानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
सई बने